अक्षय नाते...

Submitted by पुरंदरे शशांक on 16 April, 2013 - 01:09

अक्षय नाते...

इथेच आहे कृष्ण अजुनही
राधासखीही इथेच रुळली
देहाची आसक्ती सुटता
मधुराभक्ति तरी गवसली

दिव्यप्रेम हे जीवाशिवाचे
अजून फुलते असे धरेवर
गाथेमधुनी कधी बरसते
ज्ञानेशाच्या ओवीतून झरझर

राजघराणे त्यागून मीरा
वाट चालते वृंदावनची
लोभावून हरि धावत मागे
जनाईसंगे शेण्या वेची

समर्पणाची मस्ती आगळी
'माझे-मीपण' काही नुरते
देवभक्त ते एकचि होता
कान्हा-राधा अक्षय नाते...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समर्पणाची मस्ती आगळी
'माझे-मीपण' काही नुरते
देवभक्त ते एकचि होता
कान्हा-राधा अक्षय नाते...
>>>>>>
छानच आवड्ली

समर्पणाची मस्ती आगळी
'माझे-मीपण' काही नुरते
देवभक्त ते एकचि होता
कान्हा-राधा अक्षय नाते...

सुंदर !!!

नेहमीप्रमाणेच उत्तम कविता!

दोन ओळी लिहाव्याशा वाटतात...
मानव जगताला शाप असंख्य ,या जगतातील प्रेमही नश्वर
तरी नेणतो किती नांदती ,आम्हा मध्येही 'उमा -महेश्वर'
(पार्वतीने केलेल्या तपश्चर्येवर केली होती ही कविता ..विषय सेम असल्याने आठवली.)

सुरेख !!