तळलेले द्राक्ष घड

Submitted by _प्राची_ on 15 April, 2013 - 10:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गव्हाच्या कुरड्या किंवा तांदुळाच्या पळीपापड्या किंवा साबुदाण्याच्या चिकोड्या करताना उरलेला आणि जरा घट्ट झालेला चिक - वाटीभर
हिरवा रंग
द्राक्ष खाल्यावर ऊरणार्‍या काड्या (घडाचा सांगाडा)
आवड

क्रमवार पाककृती: 

आपण (किंवा आई किंवा सासुबाई) जेव्हा गव्हाच्या कुरड्या किंवा तांदुळाच्या पळीपापड्या किंवा साबुदाण्याच्या चिकोड्या करतो तेव्हा त्या करता करता शेवटी थोडा चिक उरतो. जो बर्‍यापैकी घट्ट होतो. तसा १ वाटी घ्यावा. त्यात हिरवा रंग मिसळून घ्यावा.
द्राक्षाच्या काड्यांवर द्राक्षाच्या जागी याचे छोटे छोटे गोळे करून लावावे.
उन्हात मस्त २-३ दिवस वाळू द्यावेत.
खास दिवशी तळावेत.
ओला घड
DR3.jpg

वाळल्यावर
DR4.jpg

तळल्यावर
DR2.jpg

पानात वाढल्यावर
DR1.jpg

वाढणी/प्रमाण: 
एकास एक !
अधिक टिपा: 

रुखवतावर ठेवायला पण हा प्रकार छान दिसतो.

माहितीचा स्रोत: 
नक्की आठ्वत नाही पण बहुदा मंगला बर्वेंच पुस्तक. आई कडे हे फार वर्षांपूर्वी होतं.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतायत. गोल योग्य जाडीचे लावणे ही खास बाब छान जमलीये. त्यामुळे तळल्यावरही 'फील' झकास आलाय.

वा छान दिपा.
मंगला बर्वेंच्या मला वाटत अन्नपुर्णा ह्या पुस्तकात दिवाळीच्या फराळातील द्राक्षाचा घड आहे त्याची आठवण झाली. तोही असाच द्राक्षाच्या काड्या जमवून करतात.

आधी मला खरीच द्राक्षे तळलीत की काय असे वाटले होते.

एका आइसक्रीमच्या दुकानात आईसक्रीमची भजी तळून देत होते, तसं काही केलंय की काय असे वाटले.

छान दिसतोय घड !
हो मंगला बर्वेंच्या पुस्तकातच आहे हा प्रकार. ही वाळवणाची कामे व्हायची उन्हाळ्यात आणि द्राक्षे त्यावेळी मिळायची फक्त हिवाळ्यात, त्यामूळे कधी करणेच झाले नाही.

इब्लिसदादा +१
(तुम्ही संगितल्यावर मी पण जाऊन पाहून आले आणि आजुबाजुचे सगळेच पदार्थ पाहून तोंपासु..)

दिनेश, द्राक्षं एप्रिलमधेपण मिळतात. निदान आमच्या घरच्या बागांमधे तरी मार्च शेवटापर्यंत / एप्रिलच्या मध्यापर्यंत माल निघतो (निघायचा). द्राक्षाला गोडी येण्यासाठी उन्हाची आवश्यकता असते. त्यामुळे मार्चमधे जो माल निघतो तो जास्त गोड म्हणून जास्त भाव असं समीकरण असायचं.

मिष्टेक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार इब्लिस, सुधारली आहे. मस्त दिसतय हे मात्र खरं.

हो अंजली, नंतर मिळायला लागली पण मग आईचा आणि माझाही उत्साह मावळला. त्या पुस्तकात चिकाची गुलाबाची फुले पण होती.

वा!

मस्त दिसताहेत द्राक्षघड. बच्चेकंपनीला आवडतील एकदम. सजवलेले ताटही मस्तय. थोडक्यात गोडी. Happy

मीही बर्वेबाईंच्य पुस्तकात वाचलीय ही रेसिपी. पण प्रत्यक्षात कोणी करेल असे वाटले नव्हते Happy

तो डब्यात ठेवलेला द्राक्षघड.... काय मस्त तोंपासू दिसतोय Happy ... मस्त रेसिपी...

ऑस्सम! Happy

मीही बर्वेबाईंच्य पुस्तकात वाचलीय ही रेसिपी. पण प्रत्यक्षात कोणी करेल असे वाटले नव्हते. >>>> Biggrin

पाककृतीची पुस्तकं ही 'विरंगुळा' या सदराखाली मोडतात असं मला मायबोलीवर येईपर्यंत वाटायचं. म्हणजे नेहमीच्या पुस्तकांपेक्षा जरा वेगळा रुचीपालट म्हणून वाचायची. मनातल्या मनात आनंद घ्यायचा आणि छानपैकी विसरून जायचं. इथे आल्यावर स्वयंपाकघरातली 'करणसार' लोकं पाहून डोळेच दिपले होते. Happy

कल्पना मस्तय. पण इथे रोजच्या जेवण करून उत्साह संपतो... तर चिक, पापड करणे म्हणजे मारामार आहे...

कधीच होणे नाही आपल्या हातातून हि खात्री म्हणून लांबून नमस्कार अश्या रेसीपींना.

पाककृतीची पुस्तकं ही 'विरंगुळा' या सदराखाली मोडतात असं मला मायबोलीवर येईपर्यंत वाटायचं. >>>> हाहाहा

मस्तच दिसतय, करायला पायजे.

Pages