'' कोपरा ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 11 April, 2013 - 02:28

कायदा जाणायचा आहे मला
कायदा मोडायचा आहे मला

जीवनाच्या गोल चाकोरीतला
कोपरा शोधायचा आहे मला

आसवांचा बांध फुटतो सारखा
सारखा बांधायचा आहे मला

काळरात्री किर्र अंधारामधे
काजवा सोडायचा आहे मला

जाहलो ‘’कैलास’’ ......नव्हते व्हायचे
भोग हा भोगायचा आहे मला

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळरात्री किर्र अंधारामधे
काजवा सोडायचा आहे मला<<< व्वा

जाहलो ‘’कैलास’’ ......नव्हते व्हायचे
भोग हा भोगायचा आहे मला<<< मस्त

कोपराही मस्तच

जीवनाच्या गोल चाकोरीतला
कोपरा शोधायचा आहे मला<<<<<<<<

गोल चकोरीतला म्हटल्यावर कोपरा शब्द खटकला गणितीयदृष्टया!......वै.म.

गोल चकोरीतला म्हटल्यावर कोपरा शब्द खटकला गणितीयदृष्टया!......वै.म.

गणितीयदृष्ट्या त्यात खटकण्यासारखं काहीच नाही.
non-Euclidean geometry मध्ये अश्या गोष्टी साधारण आहेत:
काही भूमितींमधील सर्कल हा चौकोनी असतो.
काही भूमितींमध्ये समांतर रेषा छेद करतात.
अश्या काही भूमिती आधुनिक भौतिकशास्त्रात मोठे महत्त्व राखतात.

जीवनाच्या गोल चाकोरीतला
कोपरा शोधायचा आहे मला

सटल आहे.

समीर थोडी फोड करून सांगशील का?
तू गणिताचाच प्रोफेसर आहेस म्हणून पुसले!

अवांतर: अवैज्ञानिक/असत्य अशा गोष्टी शक्यतोवर गझलेत येऊ नयेत असा माझा भाबडा समज आहे!
हे इब्राहिम फैज यांनी आम्हास शिकवले!

गोल चाकोरीतला कोपरा.......या शेराची बांधणी अशी करता यावी......वै.म.

जीवनाच्या गोल चाकोरीतला
आसरा शोधायचा आहे मला

स्वत: रचनाकाराला काही प्रतिसाद दखलपात्र वाटत नाहीत हे पाहून चकीत झालो आहोत!
प्रतिसाद वाचण्याची तसदी घेतल्याबद्दल धन्यवाद!

प्रोफेसर,
जीवनाच्या गोल चाकोरीला कोपरा नसतो.....
आणि मी अशी नसलेली गोष्ट ( पक्षी: कोपरा:) शोधत आहे.

आशा आहे तुम्हाला समजले असेल.

यावरुन एक विनोद आठवला तो सांगतो....

हाउ टु मेक अ सरदार बिझी?
पुट हिम इन अ सर्क्युलर रुम अँड आस्क टु सिट इन द कॉर्नर. Happy

जीवनाच्या गोल चाकोरीला कोपरा नसतो.....
आणि मी अशी नसलेली गोष्ट ( पक्षी: कोपरा:) शोधत आहे.

आशा आहे तुम्हाला समजले असेल.

यावरुन एक विनोद आठवला तो सांगतो....

हाउ टु मेक अ सरदार बिझी?
पुट हिम इन अ सर्क्युलर रुम अँड आस्क टु सिट इन द कॉर्नर. <<<<<<<<<<<<

विनोद समजला! पण विधानाच्या वैज्ञानिक/गणितीय सत्यतेबद्दल काय? अशी विधाने काव्यात यावीत का?
आम्हाला विचाराल तर नाही, अशी विधाने गझलेत/काव्यात येऊ नयेत!

वैज्ञानिक/गणितीय सत्याला बाधा न पोचता त्यातील काव्य अभिव्यक्त करावे असे वाटते!

शेर व वरील विनोद या दोन गोष्टी फारच वेगळ्या आहेत! विनोदाने क्षणभर माणूस हसतो!
पण कामयाब/सकस/सशक्त व निर्दोष गोटीबंद शेर जो सत्याच्या जवळ पोचणारा असतो, तो माणसाच्या चिरकाल स्मरणात रहातो!.........वै. म.

आता आमचा विषय गणित नसल्याने गणितात हे बसते का ते गणित विभागात जाऊनच ताडावे लागेल!

टीप:
जीवनाच्या गोल चाकोरीतला
आसरा शोधायचा आहे मला
या पर्यायावर काही वदला नाहीत, कैलासराव?
चाकोरीचा शब्दश: अर्थ चाकाने उमटलेला मार्ग!
तो गोल आहे म्हटले की, त्यात नुसतेच गोल गोल फिरायला होते, असा भाव निर्माण होतो, गोल शब्दामुळे!
म्हणजेच जीवनाच्या चाकोरीत घडीभर विसावा घ्यायला कुठे कोपरा/आसरा शोधायचा म्हटले तर अशक्य आहे, असे काव्य आपल्या शेरात आम्ही न्याहाळले!

आता गोल आकारात कोपरा शब्द जर अवैज्ञानिक म्हणून टाळायचा असेल व आपल्याला स्फुरलेल्या मूळ काव्यालाही धक्का लावायचा नसल्यास, तिथे आसरा शब्द चपखल बसतो असे आम्हास वाटते कारण विसावा घ्यायला, कोपरा हवा किंवा आसरा हवा दोन्हीत भावार्थ साधारणपणे सारखाच येतो असे आम्हास वाटते!
हा शेर विनोदानेच लिहिला आहे असे असेल तर तो विनोद या शेरात प्रशस्त वाटत नाही..........वै.म.

पण विधानाच्या वैज्ञानिक/गणितीय सत्यतेबद्दल काय?

असत्य काय आहे?

चाकोरीच्या शेरास पर्यायाची गरजच नाही ( हे वैयक्तिक मत नाही !! )

___________________________________________
............ पण विधानाच्या वैज्ञानिक/गणितीय सत्यतेबद्दल काय? अशी विधाने काव्यात यावीत का?
आम्हाला विचाराल तर नाही, अशी विधाने गझलेत/काव्यात येऊ नयेत!>>>>>>>

१)आपणास विचारतो कोण ?
२) आपल्या शंकेच्या निरसनार्थ समीरजींनी दिलेला नॉन यूक्लीडियन भूमीतीची माहीती देणारा प्रतिसाद वाचावा
३) बरे ; अशी विधाने गझलेत / काव्यात का नसावीत ???? उलट असायला हवीत !!!! ही काव्याची भाषाच आसते ती असेच बोलते ...जगावेगळे !!!! (त्यामुळेच की काय काव्य हे एक स्वतंत्र शास्त्रच आहे )
४)मध्यंतरी मी एका लेखात एका शात्रज्ञाचे मत वाचले होते की जे शास्त्रज्ञ नंतर शोधतात ते एखाद्स्या कवीने साहित्यिकाने आधीच मनःचक्षूंनी पाहून ठेवले असते..लिहून ठेवलेले असते ....... आता बोला आपले काय मत ???

आपणास विचारतो कोण ?
नंगेसे खुदाभी डरता है!
वैज्ञानिक/गणितीय सत्याला बाधा न पोचता त्यातील काव्य अभिव्यक्त करावे असे वाटते!

हे मत आमचे नसून ख-या ख-या थोरांचे आहे ज्यांच्याबद्दल आम्हास नितांत आदर आहे! मग त्यांना कुठल्याही सोम्यागोम्याने विचारो वा न विचारो!

झोपलेल्या वा दारे, खिडक्या बंद करून घेतलेल्या माणसाला सूर्यप्रकाश कसा कळावा?

आपल्या शंकेच्या निरसनार्थ समीरजींनी दिलेला नॉन यूक्लीडियन भूमीतीची माहीती देणारा प्रतिसाद वाचावा
<<<<<<<<<<
तो वाचूनच वरील प्रतिसाद खरडला होता!
बरे ; अशी विधाने गझलेत / काव्यात का नसावीत ???? उलट असायला हवीत !!!! ही काव्याची भाषाच आसते ती असेच बोलते ...जगावेगळे !!!! (त्यामुळेच की काय काव्य हे एक स्वतंत्र शास्त्रच आहे )

<<<<<<<<<<<,

हे तुझे वै.म. झाले!

जगावेगळे वेगळे व विक्षिप्त वेगळे!
त्यामुळेच की काय काव्य हे एक स्वतंत्र शास्त्रच आहे<<<<<<<<<<<

काव्यशास्त्राची पुस्तके न वाचता केलेले विधान इतकेच आम्ही तूर्तास म्हणतो!

मध्यंतरी मी एका लेखात एका शात्रज्ञाचे मत वाचले होते की जे शास्त्रज्ञ नंतर शोधतात ते एखाद्स्या कवीने साहित्यिकाने आधीच मनःचक्षूंनी पाहून ठेवले असते..लिहून ठेवलेले असते ....... आता बोला आपले काय मत ???<<<<<<<<<<<

हे विधान करणा-याने कल्पक/प्रतिभावान/प्रज्ञावान कवीं बद्दल केलेले दिसते, ज्यांना अंतिम सत्याचा ध्यास असतो! भ्रमिष्टांबद्दल नाही ज्यांना कोणतेही बिनबुडाचे भास/आभास होतात!

भ्रमिष्टांबद्दल नाही ज्यांना कोणतेही बिनबुडाचे भास/आभास होतात!<<< Rofl

कर्दनकाळ रॉक्स!

वैवकु, हे पर्सनली घेऊ नयेत, मला फक्त त्या वाक्याचे हसू आले इतकेच.

बिनबुडाचे म्हणालो कारण प्रतिभावान/प्रज्ञावान/कल्पक कवींच्या कल्पनाविलासाला काव्यात्मक प्रत्ययांचा पाया/बूड असते, म्हणूनच त्यांच्या कलाकृतीतली लेखनगर्भ निष्ठा पदोपदी डोळ्यात भरते, कारण तिथे कुठलाच आव/आवेश/पवित्रा नसतो! जे काव्य हृदयात लकाकले ते आणि तेच कलाकृतीत उमटले, असे असते अशा कवींच्याबाबतीत!

Pages