'' कोपरा ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 11 April, 2013 - 02:28

कायदा जाणायचा आहे मला
कायदा मोडायचा आहे मला

जीवनाच्या गोल चाकोरीतला
कोपरा शोधायचा आहे मला

आसवांचा बांध फुटतो सारखा
सारखा बांधायचा आहे मला

काळरात्री किर्र अंधारामधे
काजवा सोडायचा आहे मला

जाहलो ‘’कैलास’’ ......नव्हते व्हायचे
भोग हा भोगायचा आहे मला

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखनगर्भ निष्ठा>>>>>>
पुन्हा तुमचा प्रा. सतीश देवपूरकर (एक दिवंगत मायबोली आयडी ) होणार असे दिसते आहे !!!!
आवरा प्लीज

तिलकधारी आला आहे.

काळरात्री किर्र अंधारामधे
काजवा सोडायचा आहे मला

चांगला शेर आहे. एखाद्या नवोदीत उर्दू गझल्याने काजवा 'शोधायचा' आहे असे म्हणून उस्तादाची शाबासकी आणि रसिकांच्या टाळ्या मिळवल्या असत्या. अस्सल मराठी बाणा असलेल्या मराठी भाषिकाकडून आत्मविश्वासपूर्ण असाच शेर अपेक्षित असतो आणि तसाच मिळाला.

तिलकधारी निघत आहे.

Pages