निसर्ग निर्मीत ब्लू कुरास्सो - याची झिंग काही औरच

Submitted by हर्पेन on 9 April, 2013 - 14:19

इतक्यातच अमेय यांचा ब्लू कुरास्सो - कॉकटेल की मॉकटेल वरचा एक धागा बघण्यात आला आणि काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

काही वर्षांपूर्वी, काही महिने कामानिमित्त मालदीव्स बेटांवर व्यतीत करण्याचा योग आला होता, त्यावेळी हालावेली नामक बेटाला भेट दिली असताना काढलेली काही प्रकाशचित्रे.

आशा करतो आहे की आपल्याला आवडतील आणि शीर्षकातल्या माझ्या म्हणण्याला पुष्टी द्याल. Happy

DSC05459 copy.jpgDSC05461 copy.jpgDSC05462 copy.jpgDSC05463 copy.jpgDSC05464 copy.jpgDSC05465 copy.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचँप - शेकी मला तर नाही वाटत आहेत. (खरेच वाटत असल्यास) वाटण्याचे कारण मीही फोटो काढताना दुसर्‍या एका बोटीतच होतो, हे असू शकेल,

पण मॅक्सचे उत्तर पैकीच्या पैकी गुण, एकदम सही जवाब....:) धन्यवाद मॅक्स - पैकीच्या पैकी गुणांचे उत्तर माझ्यावतीने दिल्याबद्दल,

जागूकडे तर उलटा चुंबक असावा जो मासे, समुद्र, अशा पोस्ट पडल्या रे पडल्या की आकृष्ट होतो,

भारती, मस्त कविता
"निळाई अशी ही अपारा उदारा, न आटे न ओलांडते वा किनारा" ही ओळ विशेष आवडली.

कापो, चैत्राली, झरा, शशांक धन्यवाद....

नजरेने सुद्धा पिता येऊ शकणारा निळाशार समुद्र! क्या बात है. लक्की आहात्.:स्मित:

बाय द वे या निळ्या रंगालाच मरिन ब्लु असे म्हणतात ना?

दक्षिणा, माधवी, जाई, मार्को पोलो, टुनटुन, दिनेशदा, मोनालीप, नंदिनी धन्यवाद,

बाय द वे या निळ्या रंगालाच मरिन ब्लु असे म्हणतात ना?>>> हो हो अगदी अगदी.
(त्या चित्रांमधे इतक्या काही छटा आहेत त्यातल्या कोणत्यातरी एका छटेला नक्कीच 'मरिन ब्लु' म्हणत असावेत). Happy दिवे घेणे
गंभीर मोडात - नक्की माहीत नाही. अधिक जाणकारांनी प्रकाश टाकावा.

दिनेशदा - मस्त लेख, प्रतिसादांमधली चित्रे पण सुर्रेख....

मोनालीप - डोळे निळे झाले बघताना >>> उतरतोच हा रंग आपल्या डोळ्यांमधे...:)

Beautiful shades of blue and sooo soothing to eyes!

Computer is not letting me change typing to Marathi so typing in English..

mast