कलंदर

Submitted by समीर चव्हाण on 8 April, 2013 - 08:17

नंगे फकीर आहोत अम्ही, नंगे फकीर

मसणवटीचा आलो भाळी टिळा लावुनी
असा एक गुंता नाही मन ज्यात गुंतले
आग लावली जिंदगीस किड्यामुंग्यांच्या
अवदसेस टाकावे तैसे तिला टाकले

व्याप-ताप, मद-मोहपाश तोडून निघालो
अज्ञाताच्या गावामधुनी प्रवास अमुचा
असेल अमुच्याहुनी कलंदर कुणी खिवैय्या
नाव शोधण्याचा त्याची हा प्रयास अमुचा

नंगे फकीर आहोत अम्ही, नंगे फकीर

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता.
"असेल अमुच्याहुनी कलंदर कुणी खिवैय्या
नाव शोधण्याचा त्याची हा प्रयास अमुचा " >>> या ओळी विशेष
------------------------------------------------------------------------------------
खिवैय्या म्हणजे नावाडी ना ?

खिवैय्या म्हणजे काय असा प्रश्न पडला होता पण उल्हासजींनी त्यावर लिहिलेलं दिसतंय....
कविता तर सुंदरच अन् तितकीच बेधडकही!

खिवैय्या म्हणजे काय असा प्रश्न पडला होता पण उल्हासजींनी त्यावर लिहिलेलं दिसतंय....
कविता तर सुंदरच अन् तितकीच बेधडकही!

आवडेश Happy