डॉ. अनिल अवचट आणि ओरिगामीसह एक सुरेख संध्याकाळ

Submitted by शोभनाताई on 8 April, 2013 - 03:58

काही व्यक्तींच्या आस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण होते. भोवतालच्या सर्वाना सकारात्मक उर्जा मिळते. डॉक्टर अनिल अवचट म्हणजे बाबा यांपैकी एक.

२०१०च्या पर्किन्सन दिनादिवशी मित्रमंडळाच्या स्नेहमेळाव्याला ते प्रमुख पाहुणे म्हणुन आले होते. त्यावर्षीचा विषय 'आर्टबेस थेरपी' असा होता. डॉ. अवचटानी ओरिगामी, चित्रे, बासरी असं करत सर्वाना दिड तास खिळवून ठेवल होत. तेंव्हापासुन पर्किन्सन्स मित्रमंडळाच्या सर्वानाच ओरिगामी शिकायची होती. २०१३या वर्षाची सुरुवात आणि तिळगूळ समारंभ या कार्यक्रमात तो योग आमच्या शुभार्थी श्रद्धा भावे यांनी जुळवून आणला.

मी व्याख्यान देणार नाही हे बाबानी सांगितल होत. आम्हालाही व्याख्यान नकोच होत. मला न्यायला यायची गरज नाही, असही सांगितल होत. ओरिगामीसाठी लागणारे कागद तेच आणणार होते. वेळेपुर्वीच ते आले. बरोबर एक सहाय्यकही होता. आल्या आल्या त्यानी आम्ही केलेली रचना बदलली. टेबल आणि त्याभोवती पार्किन्सन्स शुभार्थी बसतील अशी रचना केली. कारण टेबलवर कागद ठेउन काम करणे सोपे होणार होते. निमंत्रित पाहुणेपण गुंडाळून स्वतःही ते या कामात सहभागी झाले.

कृतीनुसार वेगवेगळ्या आकाराचे कागद त्यानी कापुन आणले होते. अरुंद लांबट पट्ट्या,लांबट चौकोनी, चौरस, वृत्तपत्राचे पूर्ण पान अशी विविधता त्यात होती.

आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाला. डॉ. अवचट यांनी सा-यांना ओरिगामी मध्ये रंगवून टाकले. सा-यांची लगबग सुरू झाली. एकमेकांना मदत करत, बाबांची मद्त घेत सारे रंगून गेले.भिरभिर,मासा,फुलपाखरु,विमान्,ससा,बेडुक अशा वस्तु बनु लागल्या.कित्ती सोप्प असा काहिंच्या चेहर्‍यावर भाव तर कोणी आपल विमान उडत नाही म्हणुन हिरमुसलेले.बाबा लगेच तिथ जाउन नेमक काय चुकले सांगत होते.अनेक्जण माझ्याकडे या म्हणुन बोलवत होते बाबाही तत्परतेने जात होते.शिकणारे आणि शिकवणारे सर्वच वय विसरुन लहान मुल झालेले.

आता सर्वांच्या टेबलवर वर्तमानपत्राचा मोठा कागद आला.त्याची गांधी टोपी बनवण्यात आली आता सर्वजण तयार झाले होते थरथरणारे हात स्थिर झाले होते.ताठरलेल्या स्नायुत जान आली होती भावविहिन चेहर्‍यावर भाव उमटु लागले सर्वाना सहज टोपी बनवता आली.
आपल्याच डोक्यावर टोपी घालून घेण्यासाठी सारे चपळ बनले.

गांधीटोपीनंतर मुगुट.आता टोप्या काढुन मुगुट घालण सुरु झाल.
इतकेच नव्हे तर तयार केलेले मुगुट घालून प्रत्येक जण माझा पण फोटो काढा म्हणत होते. बाबांप्रमाणे मीहि आता डिमांडमधे होते.पण माझाच फोटो काढण्याचा वेग कमी पडत होता.

शेवटी बाबानी स्वतः करुन आणलेल्या अनेक कलाकृती दाखवल्या.
सर्वानी आपण केलेल्या वस्तु स्वतःच्याच केलेल्या टोपीत भरल्या.मुलाना नातवंडाना दाखवायला.माझ्या मनात ती सुरेख संध्याकाळ अजुनही रेंगाळतेय. मला खात्री आहे सर्व शुभंकर आणि शुभार्थींच्याहि मनात रेंगाळत असणार.

मी या सर्वाच सुरुवातीपासुन व्हीडिओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या आणि माझ्या कॅमेराच्या मर्यादामुळे ते निट होउ शकल नाही.माझ्या मनःपटलावर मात्र हे सर्व कोरल गेल

.
या सा-या उत्साहाचे मला जमलेले तेवढे चित्रण करण्याचा हा माझा तोकडा प्रयत्न.
अवलच्या तांत्रिक सहायामुळे आपल्याप्रर्यंत पोचउ शकले.

कार्यक्रमाच्या सुरुवतीलाच, बाबांच्या चेह-यावरच्या; ह्या अतिशय प्रेमळ हास्याने सा-यांना आपलेसे केले.

IMG_4785.JPG

आणि ओरिगामीला सुरुवात झाली. बाबांच्या कसबी हातांतून कागदातून जादू व्हावी तशा कलाकृती बाहेर पडू लागल्या.

IMG_4755.JPGIMG_4783.JPG

बाबांचे पाहून त्यांच्याकडून शिकून आता शुभार्थी ही प्रयत्न करू लागले. आणि काय आश्चर्य, त्यांच्या थरथरत्या हातांतूनही ही जादू उलगडू लागली.

IMG_4758_0.JPG

मदतीला आमचे नेहमीचे उत्साही शुभंकर ही होतेच

pdgroup 171.jpg

आता तयारी होती टोप्या करायची . सर्वांना वर्तमान पत्राचे कागद देण्यात आले.

IMG_4759.JPG

आता बाबांनी क्राऊन शिकवणार असे सांगितले. पुन्हा कागदांचे वाटप झाले.

IMG_4772.JPG

त्यामुळे आज पेपर वाचून डोक्यात साठवायचा नव्ह्ता तर चक्क मुकुट म्हणून डोक्यावर घालायचा होता Happy

IMG_4768.JPG

पहा पहा, माझा पण मुकुट तयार झाला ! हा बघा चढवला डोक्यावर ...

IMG_4770.JPG

आलो, आलो , काका. थांबा मी मदत करतो तुम्हाला मुकुट चढवायला

IMG_4763.JPG

हे अजून काही मुकुटधारी

IMG_4761.JPGIMG_4762.JPGIMG_4764.JPG

अरेच्या हे कोण? नवे पोप तर नव्हेत Happy

IMG_4765.JPG

हुश्श... सगळे टोप्या- मुकुट करून करून दमले. मग बाबांनी त्यांना अजून काही कलाकृती दाखवल्या, शिकवल्या.

IMG_4777.JPGIMG_4784.JPGIMG_4782.JPGIMG_4781.JPG

यावर्षी दुष्काळाचे सावट येऊ घातलय. वरूणराजाला साकडं घालण्यासाठी बाबांनी त्याला ही छत्रीच अर्पण केली.

IMG_4776.JPG

कार्यक्रम संपला पण यांना अजून मुगुट काढावा असे वाटतच नाहीये मुळी Happy

IMG_4760.JPG

मग काय तुम्ही पण रंगलात ना ओरिगामीच्या रंगात ?
चला मग आता आमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी तुम्ही पण या !
११ एप्रिलच्या पार्किन्सन्स दिना निमिता आपण एक समारोह आयोजित करतो आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१३ रोजी लोकमान्य टिळक सभागृहात आपण जमणार आहोत. याच वेळेस मासिकाचे प्रकाशनही आपण करणार आहोत.शुभार्थिंचे नृत्य, अनुभव, शुभंकरांचे अनुभव, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संजय वाटवे यांचे मार्गदर्शन असा भरगच्च कार्यक्रम आहे. पार्किन्सन सह हे सर्व जण कसे उत्साहाने आणि आनंदाने मार्गक्रमण करताहेत हे पाहण्यासाठी जरूर या. प्रामुख्याने पार्किन्सनने ज्यांच्या घरात हळूच शिरकाव केला आहे; त्यांनी जरूर या, आणि अनुभवा; त्याला आपले मित्र कसे बनवता येते ते !

दिनांक : १३ एप्रिल २०१३
स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरी कार्यालय प्रांगण, शनिवार पेठ, पुणे
वेळ : संध्याकाळी ४ वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! मस्त! काय सर्वांचे चेहरे फुललेत Happy
आपल्या आजार, विवंचनांना विसरायला लावणारे छंद आणि बाबांसारख्या उत्साही, आनंदी, कल्पक कलाकार ! मग काय मज्जाच येणार Happy
१३ एप्रिलच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा !

खूप छान. लेख आणि प्रचि दोन्ही.

डॉ. अनिल अवचट - ह्या माणसाबद्दल मला आदर, कुतुहल, प्रेम वाटते.

अतिशय सुंदर वृत्तांत.... इथे शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद!

काही व्यक्तींच्या आस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण होते. भोवतालच्या सर्वाना सकारात्मक उर्जा मिळते. डॉक्टर अनिल अवचट म्हणजे बाबा यांपैकी एक. >>>>>काय नेमके वर्णन केलंय तुम्ही ....
डॉ अनिल अवचट हे एक अवलिया व्यक्तिमत्व - किती वेगवेगळ्या गोष्टींमधे गती आहे त्यांना...

शोभनाताई - तुमच्या या संस्थेचे कामही अतिशय प्रेरणादायी व कौतुकास्पद ....

अवचटांबरोबरची संध्याकाळ संस्मरणीयच असते. ग्रेट माणूस...

तुम्ही ही भेटपण खूप छान घडवलीत. तुमच्या आगामी कार्यक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.

किती गोड!
सगळ्यांचे चेहेरे टोप्या बनवताना अगदी गंभीर आणि टोप्या घालून मग हसरे! Happy

काही व्यक्तींच्या आस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण होते. भोवतालच्या सर्वाना सकारात्मक उर्जा मिळते. डॉक्टर अनिल अवचट म्हणजे बाबा यांपैकी एक >> खरंय. असा एखादा तरी माणूस असावा नेहेमी अवतीभोवती!

प्रतिसादाबद्दल सर्वाना खुप खुप धन्यवाद!आप्ल्या परिचयात कोणाला पार्किन्सोन असेल् तर कार्यक्रमाबद्दल नक्कि कळवा.परगावचे लोकहि आमचे सभासद होउ शकतात.ते सभाना येउ शकले नाहीत तरी आम्ही तयार केलेले साहित्य त्याना पाठवतो.फोनवरुन संपर्कात राहतो.सभासदत्वासाठी कोणतेही शुल्क नाही.

बाबानि(डॉ.अवचट)नि लेखावर दिलेली प्रतिक्रिया आपल्याशी शेअर करत आहे.
"शोभना,छान लिहिले आहेस. मन तृप्त झाले. कुणी विचारले, कि जन्माला येउन काय मिळवलेस? तर मी म्हणेन, मी हे मिलवले. वाचताना गहीवारालोच मि. तू फोन करशील?
बाबा "
धन्यवाद मायबोली आणि मायबोलीकर.

शोभनाताई, वॄत्तांत ईथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या संस्थेच्या आगामी कार्यक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.

ग्रेट! Happy अनिल अवचट म्हणजे प्रश्नच नाही, जे करतील त्यात जीव ओतून करतील!
माहिती व फोटो इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
वाचल्याबघितल्यावर राहून राहून वाटते की हुकवला तो कार्यक्रम! दोन गोष्टी जास्तीच्या शिकायला मिळाल्या असत्या!
पण असो, वाचायला तर मिळालेय.
(बायदिवे, मला अनिल अवचटान्ची कुन्डली मान्डून बघायची आहे अभ्यासाकरता, जन्मवेळेचा तपशील मिळू शकेल काय? )

>>> बाबानि(डॉ.अवचट)नि लेखावर दिलेली प्रतिक्रिया आपल्याशी शेअर करत आहे. <<<<
मायबोलीवर येऊन लेख वाचला का? Happy

<<(बायदिवे, मला अनिल अवचटान्ची कुन्डली मान्डून बघायची आहे अभ्यासाकरता, जन्मवेळेचा तपशील मिळू शकेल काय? )>>
मला वाटत अनिल अवचटांचा ज्योतिषावर विश्वास नसला तरी इतरांच्या विश्वासाचा ते आदर करतात त्यामुळे ते जन्मतारखेचा तपशील देतील.
Yanda Kartavya- Prakashan Batami

शोभनाताई, अहो नुस्ती लिन्क दिली होती म्हणजेच त्यान्नी हा धागा उघडुन वाचला असणार Happy
घाटपांडे साहेब, त्यांचा विश्वास नाही ते मला माहिते, अन म्हणूनच त्यान्चीच कुंडली अभ्यासायची आहे.
झालच अन जमलच कधीकाळी तर त्यांच्या मुक्तांगणमधील रुग्णांचे जन्मतारखान्चे/वेळेचे तपशील जर मिळाले तर ज्योतिषविशयक "संशोधन/अभ्यासासाठी" हवेच आहेत.

Pages