फिंगरफूड - कल्पना आणि विस्तार

Submitted by लाजो on 4 April, 2013 - 22:49

कालच्या एका दिवसात ३-३ टुल्ली पेयकृत्या आल्या आणि अजुन पेयकृत्या येण्याच्या वाटेवर आहेत असे 'जाणकार' म्हणतायत.

पण या पेयांबरोबर खायच्या फिंगरफूड बद्दल कुणीच बोलेना....म्हंटल एक धागाच काढु...

इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फिंगरफूड चे कलेक्शन जमेल आणि कुठल्या पेया बरोबर कुठल्या चकण्याची जोडी जमेल याबद्दल पण जाणकार टिपण्या देतिल Happy पेयकृती आणि फिंफूकृती मात्र योजाटा आणि इथे फक्त कल्पना आणि फोटो, लिंक्स शेअर करा Happy

हॅप्पी झिंगींग.. आय मीन फिंफुइंग Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री ला आवरा Happy

कुठल्या पेया बरोबर कुठल्या चकण्याची जोडी जमेल याबद्दल पण जाणकार टिपण्या देतिल <<<
हो हे खरंच कुणीतरी सांगायला हवं. जाणकार लोकहो याबाबतीत थोडे ज्ञानकण शिंपडा प्लीज.

मला चखणा म्हणून सुकी भेळ जाम आवडते.
तसेच उकडलेले दाणे/ हरभरे/ मूग वगैरे आणि त्यावर ति-मी-लिं-को असं घालून पण मस्त चखणा होतो. हवं तर यावर कां-टो पण घालता येईल.

मधे वाइन फेस्टिव्हलमधे वायनींबरोबर चीज खाल्लं थोडं. देशात बनवलेलंच होतं पण नेहमीचं नव्हतं. ते काही जमलं नाही. कुठलं होतं ते लक्षात नाही. नुसतंच चीज खायला देशी जिभेला एवढ्या स्ट्राँग चीजची चव जमत नसावी.

खारवड्या किंवा तत्सम खास पदार्थ हे चखणा म्हणून मस्त जातात.

फिंगरफूड ही मला वाटतं पाश्चात्य कल्पना आहे. आपल्याला काय? सगळचं जेवण हातानं जेवायचं असतं. पण तिथे जेवताना काटे, चमचे, सुर्‍या वापरतात. म्हणून फिंगरफूड हा वेगळा विभाग. हातानं उचलून खाता येतील असे म्हणून फिंगरफूड.

फिंगरफूड सहज उचलून खाण्यासारखे, सुके आणि (सहसा) बाईट-साईज असतात. त्याकरता मुद्दाम प्लेटचीही गरज नसते त्यामुळे कॉकटेल्स पार्टित सर्वर्स फिरवत असलेलं फिंगरफूड उभ्या उभ्या एकएक घास चटकन तोंडात टाकता येतं. एकदम सुटसुटीत.

फारतर टुथपिक्स वर टोचलेलं असतं. शेजारी एखादं डिप असतं. टुथपिक उचलायची, एकदा(च) डिपमध्ये बुडवायची आणि त्यावरचं खाद्य अलगद तोंडात सोडायचं.

मामी +१

नी, फिंफू म्हणजेच चकणा/चखणा..... हातानेच खायचे की... हवतर आपन त्याला 'बोटखाऊ' म्हणू Proud

तुझी आवडती भेळ/चाट छोट्या पूर्‍यांमधे / कप्स मधे भरून फिंफू म्हणून सर्व करता येइलच की Happy

आपल्याकडे हल्ली कॉकटेल समोसे, कचोर्‍या, बाकरवड्या वगैरे पण मिळतात .... ते पण फिंफूच की.

जर अल्होहोलिक ड्रिंक्स सोबत हवे असेल तर शक्यतो तेलकट / तळलेले / कोरडे / तिखट पदार्थ असू नयेत.
या पदार्थांने जास्त तहान लागते व ती भागवण्यासाठी जास्तच प्यायली जाते. आणि जास्त अंमल करते.

रम + मसाला सेंग! अगदी १-१-१-१-१ दाणा टाकायचा तोंडात... Proud
अजून कल्पना येवूदेत... ट्राय करता येतीलेत...

दिनेशदा | 5 April, 2013 - 13:19 नवीन
जर अल्होहोलिक ड्रिंक्स सोबत हवे असेल तर शक्यतो तेलकट / तळलेले / कोरडे / तिखट पदार्थ असू नयेत.(०)
या पदार्थांने जास्त तहान लागते(१) व ती भागवण्यासाठी जास्तच प्यायली जाते.(२) आणि जास्त अंमल करते.(३)
<<

दिनेशदा,
१. तहान लागावी हाच चखण्याचा उद्देश असतो.
२. जास्तीत जास्त पिणे (फुकट असेल तर जरा जास्तच) हाच दारू पिण्याचा उद्देश असतो.
३. पुरेसा अंमल येणार नसेल तर पिऊन काय उपयोग?

०. "सात्विक चखणा" म्हणून दारू सोबत दूध पोहे खाणारेय का कुणी चखण्याला? Wink

गोड चवीचे नॉनव्हेज बहुतेक लोकांना आवडत नाही. ते झणझणीतच हवे. त्यातल्या त्यात अ‍ॅक्सेप्टेबल गोडाचे/फिके म्हणजे भाजलेले पापड, सॅलड, अन चीज-चेरी-पायनॅपल इतके आठवताहेत..

(होस्टेलला असताना एकदा काहीच मिळाले नव्हते म्हणून एक अती पिकलेले केळ ३ लोकांनी पुरवून पुरवून चखणा म्हणून खाल्लेले आठवते आहे.)

डॉक्टर तूम्हीसुद्धा !!!

चीज + चेरी टोमॅटो + पाईनअ‍ॅपल अशी स्टीक. गाजर, सेलरी, काकडी वगैरे भाज्या आणि सोबत चीजी डीप.
उकडलेल्या बटाट्याचा चाट वगैरे जरा बरे पर्याय आहेत. अर्थात मी याबाबतीत अननुभवी !

दिनेशदा,
दारूपार्टीत बसून चखनेका दुश्मन बनणे हे भयंकर मजेचे असते. अन लोकांचे तत्वज्ञान पाजळणे सुरू झाले, की आपलेही विमान टोटल लँडलॉक्ड असणे त्रासदायक ठरते. म्हणून 'नुसत्या दगडावर' एखाद दुसरा पेग घेऊन हळू हळू 'सिपत' रहावे..

(होस्टेलला असताना एकदा काहीच मिळाले नव्हते म्हणून एक अती पिकलेले केळ ३ लोकांनी पुरवून पुरवून चखणा म्हणून खाल्लेले आठवते आहे.)
>>> आईग्गं..... Biggrin

खरंतर केळ्याला एक नैसर्गिक फिंगरफूड मानायला हरकत नसावी ना? हातानंच खायचं पण हात अजिबात खराब होणार नाहीत याची गॅरंटी. Proud

तळलेले पदार्थ मुद्दाम देतात कारण त्यातील फॅट मुळे अल्कोहोल रक्तात मिसळायला वेळ लागतो असे वाचले होते. माझी लिस्ट
१) अंडी फेटून स्क्रँबल करायची मीठ मिरेपूड घालून. ब्रेड चे चौकोनी तुकडे करून तळून घ्यायचे ते प्लेटीत मांडायचे व वरून ते स्क्रॅंबल्ड एग्ज घालायचे. मग वरून अलगद एक केचपचा ठिपका द्यायचा व एक कोथिंबीर काडी. ( सोर्स फौजी मैत्रीण) फौजेत हे दारूबरोबर देण्याच्या स्नॅक्सचे एक शास्त्रच असते. पार्टी सक्सेस्फुल की नाही ते त्यावरून ठरू शकते.

२) आयताकृती नाजूक चिकन सँडविच.
३) मोनॅको बिस्किट वर चीज केचप इत्यादी.
४) कॉकटेल सॉसेजेस फ्राय करून. किंवा गोल कापून त्यावर चीज चा तुकडा ठेवून.
५) चिवडा, +फरसाण + कांदा कोथिंबीर, लिंबू व लोणच्याचा खार. जनसे॑वा पुणे ह्यांचा कच्चा चिव्डा जेव्हा मिळत असे तेव्हा ह्या पद्धतीने फार फर्मास लागतो.
६) बीअर बरोबर चीझलिंग्ज, खारे दाणे, भाजलेले पापड. लाइट मामला कारण बीअर हेवी असते.
७) हॉट चिप्स च्या चिप्स व इतर खारा मामला.
८) व्हिस्की बरोबर,( गार हवामानात) तंदुरी चिकन, चिकन टी़क्का, सुके मट्न. जबरदस्त लागते.
८) टार्टर सॉस किंवा मेयॉनीज डिप बरोबर फ्रेश कच्च्या गाजराचे, काकडीचे तुकडे एम बी ए यप्पी क्राउड साठी.

९) कांदा, मशरूम कॅप्सीकम गार्लिक तेलावर परतून ते ब्रेड च्या खरपूस तुकड्यावर लावून
१०) खिमा कटलेट, व्हेज कटलेट. / शामी कबाब/ हराभराकबाब.
११) महाबळेश्वर स्टाईल कॉर्न पॅटिस.
१२) उकडलेल्या अंड्यांचे क्वार्टर्स. वरून मीठ मिरेपूड लावून.
१४) मसाला पापड.
१५) उकडलेले चणे विथ कांदा लिंबू चाट मसाला.
१६ ) सलामी चकत्या.

पार्टी प्लॅन करताना व्हेज नॉनव्हेज तसेच अल्कोहोलिक व नॉन अल्कोहोलीक अश्या दोन्ही क्राउडसाठी ऑप्शन्स ठेवाव्यात.
जी सर्वात सुरेख दिस्णारी, नटून नीट आलेली स्त्री असते ती नेमकी प्युअर व्हेज आणि दारू ला न शिवणारी निघते. नाजूक शब्दात किती हे नवरे पितात अशी तक्रार करत राहते. हा एक अनुभव.
दिवे घ्या.

काही काही पार्ट्यांमध्ये पाहिलेले व खाल्लेले फिंगरफूड :

मिक्स भाज्यांचे पकौडे
किसलेले चीज घालून तळलेले क्रॉके (हाच उच्चार की आणखी काही ते माहित नाही!)
पोर्तुगीज स्टाईल डीप फ्राईड ग्रीन बीन्स (भारतीय भाषांतर - घेवड्याचे पकौडे!!!)
मिनी समोसे
मिनी बटाटेवडे
वेगवेगळ्या प्रकारच्या, फ्लेवरच्या चिप्स
मसाला इडली फ्राय
टिक्की कॅटेगरीतल्या वेगवेगळ्या टिक्कीज
तंदूर पनीर
मिनी सँडविचेस
ओपन सँडविचेस
ड्राय व्हेज मांचुरियन बॉल्स
ब्रेडचे, भाताचे पकौडे, मूग पकौडे इत्यादी समस्त प्रकारचे पकौडे / भजी वर्गातील प्रकार.
मिनी पिझ्झा

रेड वाईन बरोबर ग्रेप्स, साय्ट्रस कॅटेगरिमधिल फळे , चॉकलेट ,हार्ड चीज, क्रॅकर्स, व्हेजी योगर्ट डिप किंवा रेड पेपर/ हमस डिप बरोबर चांगले लागतिल. जास्त गोड फळे रेड वाईन बरोबर क्लॅश होतिल.
व्हाईट वाईन बरोबर सॉफ्ट चीज चांगले लागतात.
बाकि अजुन फिंगरफूड आयटम
१. पिटेड ऑलिव्ह् फेटा चीज घालुन स्ट्फ्ड केलेले
२. पिझ्झा बाईट
३. फ्लॅट ब्रेड/पिटा ब्रेड विथ व्हेजी डिप/हमस
४.चीज (Blue / Brie /Cheddar/gouda) आणि क्रॅकर्स, चीज कुठले हे वाईन प्रमाणे सिलेक्ट कराय्चे.
५. ग्रेप्स विथ चीज
६. Pretzels
७. मिक्स्ड नट्स
८. Tortilla Chips and Salsa
९.अ‍ॅपल चीज स्प्रेड किंवा चीज बरोबर
१०. Sharp cheddar and pineapple slices
11. कबाब
१२. चॉकलेट
१३. इटालियन ब्रेड्स्टिक सिझनिंग ने बनवलेलि - बटर बरोबर.
१४. फ्रुट्स विथ चि़ज
अजुन बरेच आयट्म आहेत. आठवले कि अ‍ॅड करेन.

सुकी भेळ वगैरे आहेतच. पण तिखट, खारट दाणे, काजू, नमकीन किंवा चीज, चिप्स आणि डिप्स एकदम सोप्पे.

माझे काही आवडते स्नॅक्स

१. वांग्याचे काप
vangi kaap_0.jpg

२. चेरी टमॅटोज विथ कॅप्सिकम, पनीर इन स्वीट अँड सोअर सॉस
cherry tomato snacks.jpg

३. मोमोज
1_2.jpg

पार्टी जोरदार आणि लांबवर चालणार असेल तर

४. बेक्ड वेजीज इन टोमॅटो- बेसिल सॉस

2_2.jpg

५. प्रचंड आवडती - सुशि आणि सटय प्रॉन्स (ही अर्थातच घरी केलेली नाही)

sushi.jpg

मला वाटलं लहान मुले खातात तसल्या फिंगरफूड चा धागा आहे की काय?
पण हा तर मोठ्या मुलांचा निघाला Proud
चालूद्या Happy
माझे चार आणे
ड्राय चना मसाला
तिखट दाणे विथ कांदा लिंबू
अंडा भूर्जी

अरे वा छान! कालच्या LIIT च्या चर्चेवरुन वरण्-भात गटाची सरकली होती... आता बरोबर चखणा आला आहे तर.... Happy

हा एक सुटसुटीत चखणा - चण्याची डाळ (फ्राय्ड मिळते), कांदा, मिरच्या, कोथिंबीर वगैरे कापुन त्यावर पीळलेलं लिंबु. आणि त्याबरोबर कोवळ्या काकड्या, सोलुन चकत्या केलेल्या.

ह्या चखण्याची अ‍ॅडॉप्शन रेंज मोठी आहे - बीयर पासुन सिंगल माल्ट पर्यंत... Happy

नीर फणसाचे माश्याच्या तुकडीसारखे तवा फ्राय केलेले काप पण भारी लागतात. रवा, लाल तिखट, मीठ लावायचे आणि तवा फ्राय.

Pages