लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea)

Submitted by नीधप on 4 April, 2013 - 04:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बर्फाचे तुकडे
कोकाकोला
लिंबू
पुदिन्याची पाने
उंच ग्लास

दारवा ५ व्हाइट दारवा
१. व्हाइट रम
२. सिल्व्हर टकिला
३. व्होडका
४. जीन
५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)

क्रमवार पाककृती: 

ग्लासच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.
उंच ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.
मग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.
पाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.
नवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.

दारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.
गार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.
ग्लासला लिंबाची चकती खोचायची.

आणि मग चांगभलं!! Happy

वाढणी/प्रमाण: 
असा एक ग्लास करायचा. :)
अधिक टिपा: 

आपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.

यानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा. Happy

माहितीचा स्रोत: 
अथेन्स, जॉर्जिया मधल्या द ग्लोबचा बार टेण्डर आणि इंटरनेट. :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी Angry Rofl

बर्फाचा गोळा करताना गोळेवाला बर्फ किसतो. तसा घरच्या जाड बटाटा किस घालण्याच्या किंवा गूळ किसायच्या किसणीने किसून बघावा . किंवा अमाची आयडिया मस्त आहे चुरा करण्याची.

अगं ते गोळेवाले टर्किश टॉवेलातच धरतात तो बर्फ आणि किसतात. त्यांचापण नाही गोठत हात त्यामुळे.

बर्फ कुटण्यासाठी वापरलेले फडके १-२ वेळा कुटले की फाटते.
कॅनव्हास,(वॉटरबॅग्ज असतात याच्या) किंवा जुन्या जीन्स चा पाय वापरणे जास्त योग्य.

(अनुभवी) इब्लिस.

Pages