ऑर्किड सुंदरी - ऑईल पेटिंग

Submitted by यशस्विनी on 4 April, 2013 - 00:21

हे माझे पहिले ऑईल पेटिंग आहे......

ऑईल ऑन कॅनव्हास

orchid girl.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यशस्विनी चित्र सुरेख आलयं, पण दक्षिणा म्हणतेय तसाच प्रयत्न कर. चेहेर्‍यावरचे भाव पण थोडे उदास वाटत आहेत. ( तुतिमी ची प्रिया वाटतेय्.:फिदी:)

फुले खूपच छान आलीत.

धन्यवाद टुनटुन Happy नक्की प्रयत्न करीन.

चेहेरयावरचे भाव उदास वाटत आहे.... <<<< खरय गं... मला तिच्या चेहरयावर हलके स्मित दाखवायचे होते पण फायनली नाही जमले Sad प्रयत्न चालु आहेत. सरावाने हवे ते भाव चित्रात आणु शकेन..... बाकी तुतिमी ची प्रिया वाटतेय <<<< Lol

पहिले चित्र! छानच जमलय Happy

नाकाच्या उभ्या रेषेत डावी बाजू झाकूनच टाकल्यास उरलेले उजवीकडचे दिसणारे चित्र अत्युत्कृष्ट Happy
(डाव्या बाजुकडचे शेडीन्ग व नाकाच्या धारेला पलिकडे केलेले डार्क शेडीन्ग मुळे आऊटलाईन बरोबर असूनहि, शेडिन्गमुळे परिणाम बदलतोय - मला वाटते की शेवटी शेवटी कण्टाळा आला असावा! Wink )

यशस्विनी, अहो ते डोळे आहेत का १०० वॉटचे बल्ब! पार आरपार भेदून जातात की!! मला चित्रकलेतलं काही कळंत नाही. तेव्हा कृपया माझा अभिप्राय यथोचितपणे घेणे.
आ.न.,
-गा.पै.

यशस्विनी, अहो ते डोळे आहेत का १०० वॉटचे बल्ब! पार आरपार भेदून जातात की!! मला चित्रकलेतलं काही कळंत नाही. तेव्हा कृपया माझा अभिप्राय यथोचितपणे घेणे.
आ.न.,
-गा.पै.
<<<<<<<<<

१०० वॉटचे बल्ब... इतके भेदक डोळे आहेत का माझ्या ऑर्किड सुंदरीचे.... ठिक आहे तिला मी आता सौम्य करते.... ऑईल पेटिंगमध्ये चित्रात सुधारणा करायला भरपुर वाव आहे..... धन्यवाद गामाजी आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल Happy

चित्र छान जमलेय. ऑर्किडची फुले जरा वेगळी असतात ( म्हणजे अशीही असतात, पण हि खास ऑर्किडची वाटत नाहीत.) सुंदरी मात्र खासच !

धन्यवाद दिनेशदा..... अगदी बरोबर.... ऑर्किडला अजुन डिटेलिंगची आवश्यकता आहे..... मी या फुलांना मजेंडा कलरमध्ये अजुन डिटेल्स देणार आहे.

छानच Happy

सुंदर.

सुरेख !!