"आरंभ" - रानवाटा प्रस्तुत छायाचित्र प्रदर्शन

Submitted by जिप्सी on 3 April, 2013 - 00:54
ठिकाण/पत्ता: 
ठाणे कलाभवन, बीग बझारच्या शेजारी, जुना ठाणे-भिवंडी हायवे, कापूरबावडी, ठाणे (पश्चिम). दिनांकः ६ आणि ७ एप्रिल, २०१३ वेळः सकाळी १० ते रात्रौ ८ पर्यंत

भूतकाळातील सुंदर, अनमोल क्षण आयुष्यभर जपून ठेवणारा ठेवा म्हणजे छायाचित्रे!

आठवणींचा खजिना म्हणजे छायाचित्रे!

रंग-रेषा-आकार-भाव-स्थळ-काळ-वेळ या सर्वांची एकत्रित किमया म्हणजे छायाचित्रे!

असं म्हणतात छायाचित्रे प्रेक्षकाशी बोलतात! अनेकविध स्थळांचा आणि त्या त्या ठिकाणी असणार्‍या सजीव-निर्जीव वस्तूंचा एका चौकटीतला छायाचित्र नावाचा 'परफॉर्मन्स' आपल्याशी किती संवाद साधून जातो!

हजार शब्दांतून जे व्यक्त होत नाही ते एका छायाचित्रातून व्यक्त होतं, ही कमाल त्या छायाचित्राची की छायाचित्रकाराची? की ज्याक्षणी 'क्लिक' झाली, त्या क्षणाची? कमाल कुणाचीही असो, ही छायाचित्रे पाहण्याची संधी न चुकवणे हे महत्त्वाचे!

आपल्या पहिल्यावाहिल्या 'क्लिक्स' घेऊन काही गुणी छायाचित्रकार आपल्या भेटीला आले आहेत. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी छायाचित्रांचा खजिना आपल्यासाठी खुला होत आहे. एकदा या, आणि त्या छायाचित्रांशी गप्पा मारून जा...
या बहुरंगी बहुढंगी छायाचित्रांसोबतच सह्याद्रीचा थरारही पहा व्हिडियो रूपात. रानवाटा घेऊन येत आहे छायाचित्रांसोबतच सह्याद्रीच्या अनवट वाटा.

http://www.youtube.com/watch?v=-wZ-OLM9bvE&feature=youtu.be

सावळ्याच्या भेटीची मना लागली आस
तहानभूक विसरूनी निघालो पंढरपुरास

"आषाढी वारी" महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आणि हाच ठेवा सर्वांपुढे घेऊन येत आहे "रानवाटा" प्रस्तुत "आनंदवारी". आषाढी वारीवर आधारीत लघुपट डिव्हिडी प्रकाशन सोहळा. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

प्रोमोसाठी हि लिंक पहा:
http://www.youtube.com/watch?v=uyyjSynswr8

रानवाटा तर्फ़े ठाण्यातील नवोदित छायाचित्रकारांच्या फ़ोटोंचे प्रदर्शन ठाणे कलाभवन, कापुरबावडी येथे ६ व ७ एप्रिल २०१३ रोजी मांडण्यात येत आहे. त्यात परदेशातील पर्यटनस्थळे, निसर्ग यांसारख्या विषयांची हाताळणी केलेली पहायला मिळेल. तसेच प्रदर्शनासोबतच ठाणे कलाभवनच्या सभागृहामध्ये वारकरी सांप्रदायाच्या आषाढीच्या वारीवर आधारित लघुपट आणि हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याहून दिसणार्‍या इंद्रवज्रचा माहितीपट दिवसभर विनामुल्य दाखविण्यात येणार आहेत.

तारीख/वेळ: 
शनिवार, April 6, 2013 - 10:00 to रविवार, April 7, 2013 - 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, हे वरचं आमंत्रण 'येताय ना?, आम्ही सगळे वाट पाहतोय.' खूप मस्त दिसतंय.

आमच्याकरता आता तिथले फोटो टाक बाबा.

नेहमीप्रमाणेच यंदाही रानवाटा प्रस्तुत छायाचित्र प्रदर्शन दणक्यात पार पडले. Happy
मायबोलीकर इंद्रधनुष्य, विनय भिडे, शापित गंधर्व, अश्वीनी के, आशुतोष०७११, योरॉक्स, रोहित एक मावळा आणि सौ (पद्मजा जोशी) व श्री नचिकेत (आनंदयात्री) जोशी यांनी आवर्जुन भेट दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद. Happy

सचित्र फोटोसहित वृतांत लवकरच . . . Happy

Pages