"आरंभ" - रानवाटा प्रस्तुत छायाचित्र प्रदर्शन

Submitted by जिप्सी on 3 April, 2013 - 00:54
ठिकाण/पत्ता: 
ठाणे कलाभवन, बीग बझारच्या शेजारी, जुना ठाणे-भिवंडी हायवे, कापूरबावडी, ठाणे (पश्चिम). दिनांकः ६ आणि ७ एप्रिल, २०१३ वेळः सकाळी १० ते रात्रौ ८ पर्यंत

भूतकाळातील सुंदर, अनमोल क्षण आयुष्यभर जपून ठेवणारा ठेवा म्हणजे छायाचित्रे!

आठवणींचा खजिना म्हणजे छायाचित्रे!

रंग-रेषा-आकार-भाव-स्थळ-काळ-वेळ या सर्वांची एकत्रित किमया म्हणजे छायाचित्रे!

असं म्हणतात छायाचित्रे प्रेक्षकाशी बोलतात! अनेकविध स्थळांचा आणि त्या त्या ठिकाणी असणार्‍या सजीव-निर्जीव वस्तूंचा एका चौकटीतला छायाचित्र नावाचा 'परफॉर्मन्स' आपल्याशी किती संवाद साधून जातो!

हजार शब्दांतून जे व्यक्त होत नाही ते एका छायाचित्रातून व्यक्त होतं, ही कमाल त्या छायाचित्राची की छायाचित्रकाराची? की ज्याक्षणी 'क्लिक' झाली, त्या क्षणाची? कमाल कुणाचीही असो, ही छायाचित्रे पाहण्याची संधी न चुकवणे हे महत्त्वाचे!

आपल्या पहिल्यावाहिल्या 'क्लिक्स' घेऊन काही गुणी छायाचित्रकार आपल्या भेटीला आले आहेत. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी छायाचित्रांचा खजिना आपल्यासाठी खुला होत आहे. एकदा या, आणि त्या छायाचित्रांशी गप्पा मारून जा...
या बहुरंगी बहुढंगी छायाचित्रांसोबतच सह्याद्रीचा थरारही पहा व्हिडियो रूपात. रानवाटा घेऊन येत आहे छायाचित्रांसोबतच सह्याद्रीच्या अनवट वाटा.

http://www.youtube.com/watch?v=-wZ-OLM9bvE&feature=youtu.be

सावळ्याच्या भेटीची मना लागली आस
तहानभूक विसरूनी निघालो पंढरपुरास

"आषाढी वारी" महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आणि हाच ठेवा सर्वांपुढे घेऊन येत आहे "रानवाटा" प्रस्तुत "आनंदवारी". आषाढी वारीवर आधारीत लघुपट डिव्हिडी प्रकाशन सोहळा. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

प्रोमोसाठी हि लिंक पहा:
http://www.youtube.com/watch?v=uyyjSynswr8

रानवाटा तर्फ़े ठाण्यातील नवोदित छायाचित्रकारांच्या फ़ोटोंचे प्रदर्शन ठाणे कलाभवन, कापुरबावडी येथे ६ व ७ एप्रिल २०१३ रोजी मांडण्यात येत आहे. त्यात परदेशातील पर्यटनस्थळे, निसर्ग यांसारख्या विषयांची हाताळणी केलेली पहायला मिळेल. तसेच प्रदर्शनासोबतच ठाणे कलाभवनच्या सभागृहामध्ये वारकरी सांप्रदायाच्या आषाढीच्या वारीवर आधारित लघुपट आणि हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याहून दिसणार्‍या इंद्रवज्रचा माहितीपट दिवसभर विनामुल्य दाखविण्यात येणार आहेत.

तारीख/वेळ: 
शनिवार, April 6, 2013 - 10:00 to रविवार, April 7, 2013 - 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तु असणार आहेस का तिथे??? > म्हणजे काय... दुसरा योग्य माणुस सापडणार आहे का फित कापयला.

जिप्सी, प्रदर्शनाला अनेकानेक व हार्दिक शुभेच्छा ........

वरील सगळेच फोटो मन मोहून टाकणारे आहेत रे अग्दी ......

मला माझे काही फोटो इथे पाठ्वायचे असतील तर काय करावे लागेल ? भाग घ्यायचा आहे. क्रुपया सुचवा.

जिप्स्या, तारीख वेळ बघ अशी दिसतेय हेडरमध्ये.

------

तारीख/वेळ:
6 April, 2013 - 19:30 - 8 April, 2013 - 05:30
ठिकाण/पत्ता:
ठाणे कलाभवन, बीग बझारच्या शेजारी, जुना ठाणे-भिवंडी हायवे, कापूरबावडी, ठाणे (पश्चिम). दिनांकः ६ आणि ७ एप्रिल, २०१३ वेळः सकाळी १० ते रात्रौ ८ पर्यंत
---------

रविवारीपण रात्री ८ पर्यंत आहे ना चालू तू लिहिल्याप्रमाणे?

विनय, मला फक्त रविवारी संध्याकाळीच जमणार आहे कलाभवनला यायला. पण तुम्हा सगळ्यांना जी वेळ सोयिस्कर असेल ती ठरवा Happy मी तुम्हा सगळ्यांना मिस करेन Sad गेल्याच्या गेल्यावर्षी केलं होतं गटग कला भवनात. लाज आणली होती खिदळून आम्ही जिप्स्याला Proud

जिप्सी, तूला अनेक शूभेच्छा.

वरचे सगळे फोटो झक्कास आहेत. झलक ईतकी मस्त तर प्रदर्शन काय असेल.

जिप्स्या, तारीख वेळ बघ अशी दिसतेय हेडरमध्ये.>>>>हो, म्हणुन मी "ठिकाण/पत्ता" मध्येहि वेळ लिहिलीय. Happy

रविवारीपण रात्री ८ पर्यंत आहे ना चालू तू लिहिल्याप्रमाणे?>>>>येस्स Happy मी आहे दोन्ही दिवस तिकडेच. Happy

सगळ्यांनी वेळ ठरवा > विनय मी शनिवारी सकाळी जाणार आहे. सकाळी अजिबात गर्दी नसते. आरामात प्रत्येक प्रचिचा आनंद घेता येतो.

माझं फिक्स... शनिवारी सकाळी ११ ते १ प्रदर्शनाचा आनंद घेण्या साठी आणि शनिवारीच संध्याकाळी ६ ते ७ खास माबोकरांना (ज्यांना शक्य असेल त्यांना) भेटण्यासाठी मी प्रदर्शनात हजेरी लावतोय.

तळ टिप - इंद्रा, आपण शनिवारी सकाळी भेटु रे Happy

आजच प्रदर्शनाला जाऊन आलोय..
छान अन स्तुत्य उपक्रम आहे.. नवोदीत अन मुरलेल्या फोटोग्राफर्सची मस्त मेजवानी..
आनंदवारी पाहाण्यासारखीच... Happy

Pages