विपुतल्या रेसिप्या २ - बाळ बटाट्यांची भाजी - अर्थात् अलकामावशीची भाजी

Submitted by मंजूडी on 31 March, 2013 - 08:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाळ बटाटे - पाव किलो
कांदे - २ मोठे
तमालपत्र - १
वाटलेली हिरवी मिरची - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
किसलेलं आलं - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
जिर्‍याची पूड - १ चमचा
चिंचेचा कोळ - एक चमचा
हळद, तेल, मीठ, साखर(मी घालते)
साजूक तूप - दोन चमचे
लाल तिखट - अर्धा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)

क्रमवार पाककृती: 

या आयडीला कोणाकोणाच्या विपुतच रेसिप्या लिहिण्याची खोड आहे, निषेध करूनही काऽही उपयोग नाही. या आयडीची विचारपूस करताना त्या रेसिप्यांवरचे प्रश्न आमच्या नजरेस पडतात मग कितीही नाही म्हटलं तरी मूळ रेसिपी आणि उत्तरे शोधण्यासाठी विपौड्या मारण्याचा मोह आवरत नाही. विपौड्या मारण्याची खोड आम्हांला याच आयडीमुळे लागली असे मानायला हरकत नाही.

आता ह्या रेसिपीची प्रमाणं काही त्या विपूमधे लिहिलेली नव्हती, सगळं आम्ही आमच्या अंदाजानेच घेतलं, पण भाजी मात्र त्या आयडीने लिहिल्याप्रमाणे अफाट चवीची झाली. मग त्या आयडीचे आणि रेसिपीच्या मूळ स्रोताचे आम्ही जाहिर आभार मानले, तर बाकी लोकं आम्हाला योग्य विपूचा पत्ता विचारू राहिली. आता ती विपुतली रेसिपी तशी मागे पडली आहे. विपुची पानं उलटता उलटता लोकांचा भाजी करण्याचा उत्साह सरायचा, त्यापेक्षा म्हटलं की ही भाजी लिहूनच टाकूया. ही भाजी लिहिण्यासाठी परवानगी मागण्याचे पुण्यकर्म एका प्रिय मैतरणीने केले आहे, तिचे आभार! तसेच ही भाजी विपूत ठेवणारीचे आभार! तसेच ही भाजी (कुठेतरी का होईना) लिहिण्याचे काम करणारीचे अनंत आभार!

तिच्याच शब्दांत आता पुढे भाजीची रेसिपी:

बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)
किसलेला कांदा, तेजपान, किसलेलं आलं, वाटलेली हिरवीमिरची, हळद तेलात घालून परतायचं. यात उकडलेले बटाटे घालायचे. अगदी जरासा चिंचेचा कोळ आणि मीठ घालायचं. व्यवस्थीत परतून भाजलेल्या जिर्‍याची पूड वरून घालायची. जितका पातळ रस्सा हवा तितकं पाणी घालायचं. उकळू द्यायचं. आता सगळ्यात मस्त भागः चमचाभर (किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार) साजुक तूप कडकडीत गरम करून त्यात तिखट घालायचं आणि पोळलेलं हे तिखट्+तूप लागलीच उकळत्या भाजीत ओतायचं. अफाट चविची भाजी होते!

आभार: अलकामावशी

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी एका वेळेला.
अधिक टिपा: 

रबडी-पुरीबरोबर ही अशी भाजी झकास लागते.

alakamavashi bhaji 3 edited.jpg
माहितीचा स्रोत: 
मृण्मयी. विपौड्या. सायो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

भाजी कातिल दिसते आहे. लवकरच करणेत येईल Happy

कुणाकुणाच्या विपू म्हणजे ह्या आयडीने लिहीलेल्या पाककृतींची बखर झाल्या आहेत. कृती खणून इथे टाकल्याबद्दल तुमचे पण खास आभार Happy

मी ही केली आहे ही भाजी ... अफाट होते.

प्रस्तावना आत्ता नीट वाचली Lol

मंजूडी, मी अगदी सिरियसली विचार करत होते 'विपुतल्या रेस्प्या' नावाचा बाफ काढायचा. प्रस्तावनेत प्रत्येक पानावरच्या रेसिप्या अपडेट करत जायचे. काढू का ?

अगो. Happy

मला बाळबटाटे हे संबोधन आवडलं आम्ही त्याला बोरीचे बटाटे असं तिरपागडं नाव दिलं होतं त्यापेक्षा हे नाव गोड आहे.

भाजी बनाके देखेंगे.

भाजी अफाट दिसतीय. लवकरच करण्यात येइल.
मला पण बाळबटाटे हे नाव आवडलं. काही दिवसांपूर्वी, याच आयडीनी "अ‍ॅडल्टकैरी" असंही एक नामकरण केलेलं वाचण्यात आलं होतं. त्या आयडीचं कल्पक नामकरणांबद्दल कौतुक. आणि अर्थातच रेसीपीबद्दल सुद्धा.

कृती खणून इथे टाकल्याबद्दल, मंजूडी तुमचे पण खास आभार.

मस्त दिसतेय भाजी
करुन पाहीन

अवांतर = पहिल्यांदा शीर्षक बाळमभटजीची भाजी असे वाचले

मंजूडे, धमाल चालवली आहेस Proud भाजी मस्त दिसतेय. करण्याच्या अटोक्यात आहे कधीही कारण हे सगळं सामान केव्हाही घरी असतंच.

बेडुकौड्या, सश्याच्या उड्या सारखं विपौड्या वाटतंय Lol

मंजूडे, व्हाइल यू आर अ‍ॅट इट, माझ्या विपूत त्या आयडीने मस्ता चिकनची पा़रु दिली आहे. खरोखरच सोपं आणि कमी कटकटीचं चिकन आहे ते.
ती रेसिपी पण स्वतःचं मानाचं स्थान माबोत पटकावेल असं बघ की. )ही लापी आहे)
.
.
.
.
मी स्वतःच ते सत्कृत्य पार पाडलं Proud

छान पाकृ.

माझी आई ह्याच्यात अजून थोडे बदल करुन भाजी बनवते (काय बदल ते आईला विचारावे लागेल, कारण साहित्य थोड ज्यास्ती असत एवढच माहीती आहे :अओ:) आमच्या इथे ह्या भाजीला बटाट्याच सोंग अस म्हणतात.

विपौड्या ... Biggrin

रेस्पी मस्त. देखेंगे भै देखेंगे, भाजी करके देखेंगे!

शीर्षकामुळे बाळबटाट्यांनाच अलकामावशी असंही म्हणतात की काय असं वाटतंय. Wink

LOL!

मंजूडी, सही आहेस तू ..

(आता ह्या रेसिपी बरोबरच मंजूडीच्या चौकस वृत्तीचं आणि लेखनकौशल्याचंही कौतूक होईल कायम तीच ह्या आयडीची शिक्षा .. Wink

मस्त आहे रेसिपी .. करून बघायला हवी .. Happy

ही रेसिपी शोधूनही सापडली नसती. मृणकडे (उपयोग होत नाही, तरीही) तु क.

वरून साजूक तूपाची फोडणी- हा प्रकार चित्ताकर्षक आहे. लवकरच रिपोर्ट देण्यात येईल. धन्यवाद.

Pages