उत्तर अमेरिकेतल्या चाहत्यांसाठी प्रथमच... संगीतकार अजय-अतुल @ B.M.M. !!

Submitted by अजय on 31 March, 2013 - 06:41

जुलै २०१३ मध्ये होणार्‍या १६ व्या बी.एम.एम. अधिवेशनाला येणार्‍या मराठी रसिकांना अनोखी मेजवानी मिळणार आहे. संगीतकार अजय-अतुल या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमेरिकेतल्या रसिकांसमोर एक आगळा-वेगळा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाद्वारे अजय-अतुल गोगावले बंधूंचा झपाटून टाकणारा जीवन आणि संगीतप्रवास उलगडणार आहे.ajay_atul.jpg

'वार्‍यावरती गंध पसरला, मन उधाण वार्‍याचे, कोंबडी पळाली' अशा एकाहून एक लोकप्रिय गाण्यांवर, अजय-अतुलच्या 'जोगवा आणि नटरंग'मधील गाण्यांनी कळस चढवला. साथसंगत, पार्श्वसंगीत, जाहिराती, नाटक आणि टीव्ही मालिका, याबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या स्टाईलचा वेगळा ठसा उमटलेला आहे. केवळ मनात खोल रुजलेल्या संगीतप्रेमाच्या आणि उपजत गुणांच्या बळावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि लखलखीत यश मिळवलं आहे.

Mrinal_kulkarni.pngआता हा सगळा जीवनपट आणि त्यांचं धुंद करणारं संगीत खुद्द अजय-अतुल बी.एम.एम.च्या रंगमंचावरुन सादर करणार आहेत. यामधे अजय-अतुलला बोलतं करण्याची जबाबदारी प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी घेतली आहे. नाटक, टी.व्ही.मालिका आणि चित्रपटांतल्या या श्रेष्ठ अभिनेत्रीने नुकतंच चित्रपट-दिग्दर्शनही केलं. आता बी.एम.एम.च्या अधिवेशनात एक मुलाखतकार म्हणून त्या रसिकांसमोर येतील. तर आघाडीचे गायक हृषिकेश रानडे आणि सावनी रविंद्र याच कार्यक्रमात, अजय-अतुलची गाणी सादर करण्यासाठी त्यांच्या साथीला असतील.

Hrishikesh_ranade.pngsavani_ravindra.pngआता बी.एम.एम.च्या अधिवेशनाद्वारे उत्तर अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या रसिकांसाठी संजीवनी न्यूट्रास्यूटीकल अँड हेल्थ प्रॉडक्टस लिमिटेड आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांनी हा वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम प्रायोजित केला आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय कालेले म्हणाले, "सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल यांच्याप्रमाणेच कोलते-पाटील समूहासाठीही महाराष्ट्रीयन संस्कृती हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बी.एम.एम. २०१३ च्या सहयोगाने एक संगीत समारोह आयोजित करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. यामुळे उत्तर अमेरिकेत राहणार्‍या मराठी बांधवांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बंधांना नवा उजाळा मिळेल, असा मला विश्वास वाटतो."

येत्या जुलैमध्ये होणार्‍या बी.एम.एम. अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक आणि आर्थिक उपक्रम होत आहेत. याविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या
www.bmm2013.org
www.facebook.com/bmm2013

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Planning मधे कुठेच उशीर अपेक्षित केला नव्हता. >> grid tight आहे. एका विशिष्ट मर्यादेपलिकडे उशिर absorb करणे जवळजवळ अशक्य असते. नेमके त्या दिवशीच्या सगळ्याच programs ना ऑडीयो requirements मूळे Dunkin Center हा एकच पर्याय असावा. तरी दामले सारखा कार्यक्रम तिथे करता आला नाही.

Hind site is 20/20.>> +१

मेलांज कार्यक्रमाच्या तयारीला एवढा वेळ लागला की बरेच प्रेक्षक उठून बाहेर गेले. बाहेर स्टॉलच्या आसपास चहा कॉफीलाही फारच गर्दी व ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा नव्हती. तरी एक तासाच्या वर वेळ गेल्यानंतर त्यातील बर्‍याच जणांनी प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला जायचे ठरवले. तिथे उदाहरणार्थ एक चालू होते. ( अर्थात त्यामुळे काहींना ते नाटक बघायला मिळाले.) पण तिथे एवढ्या सगळ्यांना जागा नव्हती. बाहेर पुन्हा ज्ये. ना. ना बसायला जागाही नव्हतीच. मी पाणी प्यायला बाहेर आले तर पुन्हा आतच जाता येईना, ही झुंबड उडाली होती. कशीबशी आत शिरले. व्यवस्थापकांनी उदाहरणार्थ एक वाल्यांना झटपट आवरतं घ्यायला सांगितले होते त्यामुळे त्यांनी सेट अर्धवट लावला, पडद्यामागच्या कलाकारांची ओळख वगैरेला चाट मारली. पण नाटक संपल्यावर पुन्हा बाहेरही पडता येईना. कारण तिथे वादावादी सुरू झाली होती. प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला थांबण्याचे रद्द करून मी ठरवले की जेवून घ्यावे, तर जेवणाचा हॉल बंद व तिथेही बसायला जागा नसल्याने बरेच जण ताटकळत उभे होते. जेवण थोडेसेच उशिरा सुरू झाले, तेव्हा कळले की अजून बक्षिस समारंभही व्हायचा आहे. तोही सुरू करेपर्यंत खूप वेळ गेला व त्यात सर्वांना बोलायला हवे असल्याने प्रेक्षक अधिकच वैतागले. पुस्तक प्रकाशन मात्र बाळ फोंडके यांनी "मी या सर्व पुस्तकांचे प्रकाशन झाले असे घोषित करतो" असे म्हणून आवरते घेतले ही तेवढी जमेची बाजू.

पुढील अधिवेशनासाठी सूचना:
१. वाट पहात असताना बसायला जागा असती तर काही लोकांना त्रास कमी झाला असता. तशा प्रकारची जागा फक्त जेवणाच्या हॉलमधे होती. पण तो बंद होता.
२. स्टॉलच्या आसपास बसायला काय उभे रहायलाही जागा नव्हती. स्टॉल मोकळ्या जागेत ठेवावेत. शिकागोला जेवणाच्या हॉल मधेच होते.
३. कार्यक्रमाला उशीर होत असल्याची माहिती कन्व्हेनशन सेंटरमधे दिली नव्हती. डंकिन सेंटर थोडे लांब असल्याने पुन्हा पुन्हा जायला यायला ज्ये. ना. तयार नव्हते. काही वेळा असा उशीर अपरिहार्य असतो, तेव्हा तशी सूचना ठिकठिकाणी द्यावी व दुसरीकडे बसण्याची अथवा वेळ घालवण्याची सोय करावी.

रात्रीच्या कार्यक्रमाचा हा एक Problem असतो की त्याला Ending Time ठरलेला असतो.
१२ नंतर बर्‍याच ठिकाणी कार्यक्रम करू दिले जात नाहीत, आणि आलेल्या मधे ६०/६५ टक्के जे. ना. असल्याने ते १०/११ नंतर बसू इच्छित नाहीत. तरूणांनाही दिवसभर कार्यक्रम बघून थकवा असतोच.

त्यामुळे १२ ला संपणारा कार्यक्रम ९ ला चालू होणार की १० ला ह्यात खूप फरक पडतो(च).
फिलाडेल्फियाला 'आशाताईंचा' कार्यक्रम आठवा. 'पळा पळा आठवा.. '
आता चर्चा करून काही फरक पडणार नसला, तरी LA वाल्यान्नी हे लक्षात घेऊन Grid मधे थोडी जागा ठेवावी.
आणि दिवसभराच्या कोणत्याही कार्यक्रमाला जरासा उशीर झाला तर त्याचा Domino Effect रात्रीच्या शेवटच्या कार्यक्रमावर होतोच..

Proud
म्हणून सांगतो उ उ वि Main Auditorium मधे ठेवा. पडद्यामागे तयारी करता येते आणि प्रेक्षकांना Entertainment पण मिळते... Proud

आमच्या row च्या मागे तर अशी कुजबुज चालली होती की महेश पटवर्धन यांनी lip-synching केलं. मी विचारलं त्या लोकांना की त्यांना असं का वाटतं आहे. त्यांनी सांगितलेली कारणं
१. जी गाणी म्हटली त्यासाठी तयार सुसज्ज असा orchestra stage वर असताना track वर गाण्याची गरज नव्हती.
२. बाकीच्या गायकांचे vocal mics एवढे खास नव्हते त्यामुळे vocals low वाटले थोडे. पटवर्धन यांचे vocals आणि tracks एकाच सुरात/पट्टीत येत होते, जे pre-recorded songs मधे होतं.
३. गाणं सुरु व्हायच्या आधी पटवर्धन खाली बघून lips synchronize करत होते गाण्याच्या सुरवातीवर असं वाटलं
४. गाण्यातले आलाप, ताना यांचा चेहर्यावर, गळ्यावर कुठेच ताण जाणवला नाही...अवघड जागा सुद्धा अगदी सहज, निर्विकारपणे घेतल्या जात होत्या.
मला तर काही कळले नाही. पण हा त्या लोकांचा ठाम समज होता की ते live singing झालंच नाही. खरे-खोटे पटवर्धन जाणे Happy

Pages