उत्तर अमेरिकेतल्या चाहत्यांसाठी प्रथमच... संगीतकार अजय-अतुल @ B.M.M. !!

Submitted by अजय on 31 March, 2013 - 06:41

जुलै २०१३ मध्ये होणार्‍या १६ व्या बी.एम.एम. अधिवेशनाला येणार्‍या मराठी रसिकांना अनोखी मेजवानी मिळणार आहे. संगीतकार अजय-अतुल या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमेरिकेतल्या रसिकांसमोर एक आगळा-वेगळा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाद्वारे अजय-अतुल गोगावले बंधूंचा झपाटून टाकणारा जीवन आणि संगीतप्रवास उलगडणार आहे.ajay_atul.jpg

'वार्‍यावरती गंध पसरला, मन उधाण वार्‍याचे, कोंबडी पळाली' अशा एकाहून एक लोकप्रिय गाण्यांवर, अजय-अतुलच्या 'जोगवा आणि नटरंग'मधील गाण्यांनी कळस चढवला. साथसंगत, पार्श्वसंगीत, जाहिराती, नाटक आणि टीव्ही मालिका, याबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या स्टाईलचा वेगळा ठसा उमटलेला आहे. केवळ मनात खोल रुजलेल्या संगीतप्रेमाच्या आणि उपजत गुणांच्या बळावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि लखलखीत यश मिळवलं आहे.

Mrinal_kulkarni.pngआता हा सगळा जीवनपट आणि त्यांचं धुंद करणारं संगीत खुद्द अजय-अतुल बी.एम.एम.च्या रंगमंचावरुन सादर करणार आहेत. यामधे अजय-अतुलला बोलतं करण्याची जबाबदारी प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी घेतली आहे. नाटक, टी.व्ही.मालिका आणि चित्रपटांतल्या या श्रेष्ठ अभिनेत्रीने नुकतंच चित्रपट-दिग्दर्शनही केलं. आता बी.एम.एम.च्या अधिवेशनात एक मुलाखतकार म्हणून त्या रसिकांसमोर येतील. तर आघाडीचे गायक हृषिकेश रानडे आणि सावनी रविंद्र याच कार्यक्रमात, अजय-अतुलची गाणी सादर करण्यासाठी त्यांच्या साथीला असतील.

Hrishikesh_ranade.pngsavani_ravindra.pngआता बी.एम.एम.च्या अधिवेशनाद्वारे उत्तर अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या रसिकांसाठी संजीवनी न्यूट्रास्यूटीकल अँड हेल्थ प्रॉडक्टस लिमिटेड आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांनी हा वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम प्रायोजित केला आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय कालेले म्हणाले, "सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल यांच्याप्रमाणेच कोलते-पाटील समूहासाठीही महाराष्ट्रीयन संस्कृती हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बी.एम.एम. २०१३ च्या सहयोगाने एक संगीत समारोह आयोजित करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. यामुळे उत्तर अमेरिकेत राहणार्‍या मराठी बांधवांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बंधांना नवा उजाळा मिळेल, असा मला विश्वास वाटतो."

येत्या जुलैमध्ये होणार्‍या बी.एम.एम. अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक आणि आर्थिक उपक्रम होत आहेत. याविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या
www.bmm2013.org
www.facebook.com/bmm2013

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है, अगदी आजच विचार आला होता की अजय अतुल कधी अमेरीकेत येणार आणि हा धागा बघितला.
अधिवेशनाशिवाय ईतर ठिकाणी पण त्यांचा कार्यक्रम आहे का?

सॉरी, नाही पाठवू शकत. Happy त्यांचा p3 संपल्यावर त्यांना परत जावं लागणार आहे. त्यापेक्षा तुम्हीच याना अधिवेशनाला. अजय अतुल, प्रशांत दामले, वैभव जोशी सगळ्यांनाच बघता, भेटता येईल. Happy

अजय अतुलची मुलाखत आपल्या दिवाळी अंकात येऊन गेलेली आहे.
अलीकडच्या काळात 'दमदार' श्रवणीय संगीत देणारी जोडी.
BMMला जाणार्‍यांनी हा कार्यक्रम चुकवू नका आणि आमच्यासारख्यांसाठी वृत्तांत लिहा. Happy

बृममच्या गोंधळामुळे हा कार्यक्रम बर्‍याच उशीरा सुरू झाला.
जेव्हा आधीच्या कार्यक्रमांची लांबण संपत नाही, तेव्हा नाईलाजाने प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवून आपण तिथे असल्याची जाणीव करून देतात. असाच काहीसा प्रकार झाला....
त्यात कोलते-पाटील या प्रायोजकांची AV फीत पुन्ह:पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न झाला. फिलाडेल्फियाचे सम्मेलन बोस्टनकर विसरले की काय? असा एक विचार मनात आला. पण प्रेक्षक अजय-अतुल यांच्यासाठी बसून राहिले होते.
सौ. महेश मांजरेकर यानी मात्र भलतीच निराशा केली. मुलाखतीमधे समोरच्याला बोलकं करावं लागतं, (काही वेळा आवरावंही लागतं, गाडी विषयावर ठेवावी लागते.. इत्यादी प्रकाराची त्यांना कल्पनाच नव्हती). प्रत्येक वाक्यामधे नको तिकडे मोठ्ठाले Pause आणि अर्धवट वाक्य. प्रश्न आहे की स्वगत असली विधाने.

कदाचित स्टेजवरचाहा त्यांचा प्रयत्न नीट होत नाहीय, म्हणून महेश मांजरेकरांनी Entry घेऊन मुलाखतीचा ताबा घेतला की काय असं वाटलं. अर्थात तो त्यांचाही प्रांत नाही याची जाणीव झाली.

अजय्-अतुल यांच्याकडे (मुख्यतः अजयकडे) बोलायला खूप होतं. पण एकंदरीत मुलाखतकारांची त्याला साथ नव्हती. तुमच्याकडे...... एक ... keyboard होता....... त्याचा................. एक किस्सा ... आहे ...... असं मला...... तर तुम्ही ........ त्याबद्दल सां...... गाल ... का?
(यातला प्रत्येक . हा १/२ सेकंदाचा Pause आहे असं समजून वाचा).

गाणी अप्रतिम. त्यामागचा विचार, अजयचं तोंडाने झाकचिक झाकचिक.. आणि त्यावर शब्द बसवणं हे सगळं अप्रतिम होतं. अतुलकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आणि सावनी, हृशिकेशचं गाणं समजलं पण अजयसमोर डॉ. पटवर्धन का गात होते हे काही कळलं नाही (Donation, sponsor???).
'खेळ मांडला..' बद्दल बोलताना अजयने जवळपास ते गाणं पूर्ण म्हणून दाखवलं होतं. त्या गाण्याचा गायक/ संगीतकार समोर असताना, त्याने ते गाणं म्हणून दाखवलं असताना डॉ. पटवर्धानानी आवाज लावायची काय गरज? हे म्हणजे सुधीर गाडगीळने पुलंना म्हैस ऐकवण्यासारखं आहे....

पुढच्या BMM ने यातून शिकण्यासारखे एकच.. प्रेक्षकाचा अंत पाहू नका... आणि निवड करताना नीट विचार करा. एकाद्या वहिनी चांगला स्वयंपाक करत असतील, किंवा पाहूणे त्यांना ओळखत असतील म्हणून त्यांना मुलाखत घ्यायला लावणे योग्य नव्हे. जेणू काम तेणू थायच.. .:)

गोष्टीगावाचे +१
ह्या कार्यक्रमाकडुन जबरदस्त अपेक्षा होत्या पण अगदीच अपेक्षाभंग झाला.

मृणाल कुलकर्णी घेणार होती ना मुलाखत?<<< काही अडचणींमुळे येऊ शकल्या नाहीत. म्हणजे व्हिसा, की तारखा, की प्रकृती इत्यादी कळलं नाही.
सावनी रवींद्रने 'वाजले की बारा' गायलं? <<< ???
कार्यक्रम सरता सरता 'चिकनी चमेली'वर प्रेक्षकांनी नाचावं अशी सूचना केली गेली स्टेजवरून..
काही पेताड लोकांनी (विशेष करून सिनीयर लोकांनी) 'चमचम करता..' वरच सुरूवात केली होती.
प्रत्येक गाण्यानंतर वन्समोर असं ओरडणारे चार दोन होतेच.

पण चिकनी चमेली सुरू झालं आणि दुसर्‍या एका सिनीयर माणसाने 'वाजले की बारा' ची फर्माईश केली.
मग अचानक चमेलीवरून 'बारा' ला पब्लिक नाच सुरू झाला.. Happy

बृममच्या गोंधळामुळे हा कार्यक्रम बर्‍याच उशीरा सुरू झाला. >> मानापमानमधे ५ वेळा once more केल्यामुळे नि डॉ. फोंडके भाषण उशिरा सुरू झाल्यामुळे सगळेच लांबत गेले.

'मानापमान' नक्की किती तासांचे अपेक्षित होते? Once More असं म्हणणारा एक जरी प्रेक्षक असला तरी लगेच ते गाणे परत -परत म्हटले जात होते.. ३५०० हजारांमधे एकादा प्रेक्षक 'Once More' ओरडणे म्हणजे काही विशेष नाही.. छोट्या कार्यक्रमाना Red-Flag दाखवता येतो पण मोठ्यान्ना तो का दाखवता येऊ नये? इतर बर्‍याच कार्यक्रमातून 'Once more' बगल द्यावी लागलीच होती.

एकुण कार्यक्रमाने फारच निराशा केली.. श्री व सौ. मांजरेकर रंगमंचावर बसून नक्की काय करत होते हा एक मोठाच न समजलेला मुद्दा आहे. सौ. मांजरेकर प्रश्णाच्या शेवटी 'अजय........' अशी लाडिक हाक मारत होत्या.

त्यात भर त्या पटवर्धनांची.व त्याच्या कुमार शानू सदृश आवाजाची...धन्य!!!!

(खास सशलसाठी).. ह्रुषिकेश रानडे निव्वळ सुरेख गायला.. स्वप्नील बांदोडकर चं 'गालावर खळी' हे ह्रुषिकेश ने त्याच्या ओरिजिनल पेक्षा १०० पटिनी सुंदर गायलं..
सावनी ने falsetto try करुन बरी म्हटली गाणी..

एकुण मुलाखतीमधे अजय इतका बोलत होता आणि अनेक चाली नी शब्द त्याला कसे सुचले हे सांगत होता... कि अतूल ने नक्की काय योगदान केलय त्यांच्या music मधे असा प्रश्ण पडला.

मी लवकर निघून आले हॉटेल वर.. त्यामुळे पेताड लोकांचा नाच नाही पाहिला. Happy

>> सावनी ने falsetto try करुन
Try? ती कायम तशीच गाते. आणि हमखास बेसुर.

@स्वाती.. बेसूर हा तिच्या आवाजाचा अविभाज्य भाग असल्याने तो सुधारता येणार नाही.... म्युझिकच्या गदारोळात ते बरच झाकलं गेलं.. thats why i said.. बरी गायली.

>> सावनी ने falsetto try करुन
Try? ती कायम तशीच गाते. आणि हमखास बेसुर.
<<<

तिचं सुरांपेक्षा लूक्सवरच जास्त लक्ष असतं बहुदा Proud

'मानापमान' नक्की किती तासांचे अपेक्षित होते? >> तीन तास, जे लांबत गेले. त्याचा परीणाम पुढे होत गेला. 'खेळ मांडलां" नि मेलांजचा सेटअप (??) पण थोडासा लांबला होता. अजय अतुलच्या कार्यक्रमाचा कोळपे पाटील हाही भाग आहे. तीन चार मोठे, setup लागणारे, नि मोठे कलाकार असलेले चांगले कार्यक्रम असले कि delay होणे साहजिक असते असे मला वाटते.

नटरंग नि अग्नीपथ ह्यांची गाणी एकाच level ची आहेत, अग्नीपथ चे संगीत हे त्यावर्षीचे सर्वात उत्क्रुष्ट संगीत होते वगैरे विधाने होती कार्यक्रमामधे. पण अजय अतुलचा कार्यक्रम हा general public ला आकर्षित करणारा प्रकार आहे हे शेवटच्या dance वरून लक्षात येतेच. मला स्वतःला तरी त्यांनी गाण्याच्या पार्श्वभूमीमधला philosophical भाग वगळून tune कशा सुचल्या एव्हढ्यावरच थांबले असते तर concise वाटले असते.

पण अजय अतुलचा कार्यक्रम हा general public ला आकर्षित करणारा प्रकार आहे हे शेवटच्या dance वरून लक्षात येतेच.>>> नक्कीच.. अनेक जण day pass घेऊन त्यासाठी आले होते.

शिवाय अजय अतुल ला बघण्यासाठी लोकं इतके आसुसले होते की BMM awards सारखा कार्यक्रम टाळ्या वाजवून, गोंधळ करून आवरता घ्यायला लावला लोकानी.. Sad

मेलांजचा सेटअप एका विशिष्ट प्रकारे हवा होता, का ते मला माहित नाही. मला कार्यक्रम बघायचा होता पण दुसर्‍या कार्यक्रमासाठी volunteer असल्यामुळे चुकला त्यामूळे त्या सेटअपबद्दल पण उत्सुकता आहे. मेलांज एकदम जबरदस्त झाला असे कळल्यामूळे आधीच हळहळ लागून राहिली आहे.

BMM awards सारखा कार्यक्रम टाळ्या वाजवून, गोंधळ करून आवरता घ्यायला लावला लोकानी >> शिट्ट्या टाळ्यावाला तो एक विशिष्ट ग्रुप होता असे मला वाटले. आधीच सारेगामा वाला कार्यक्रम पाहिला असशिल तर कोणता ते तुझ्या आपोआअप लक्षात येईल.

मेलांज बद्दल मिक्स मतं ऐकली.. मी थोडा पाहिला पण समीप साठि निघाले.
हो, तु कोणत्या ग्रुप बद्दल बोलतो आहेस ते माहितीये :).. पण त्यांच्या जोडीला अजुनही बरेच होते

कार्यक्रमाचा क्रम आणि त्याना मधे दिलेली वेळ ही जे कुणी ठरवतात त्यांनाच माहीत असते.

..नऊ वाजता येऊन (मग तो कोणताही कार्यक्रम असो) बसणारा प्रेक्षक १० वाजून गेले तरी कार्यक्रम सुरू होत नाही याबद्दल नाराज होतो यात त्याची चूक नाही. नशीब सगळे उठून गेले नाही हेच.
..कोलते पाटलांची क्लीप सौ. मे. म. मां. नी बोलायला सुरूवात करण्यापूर्वी एकदा दाखवली गेलीच होती. ती पुन्हा प्रेक्षकानी बघावी ही अपेक्षा गैरच.. उशीर झाला असताना अजूनच.

आत्ता मी परत Grid बघतोय..
Planning मधे कुठेच उशीर अपेक्षित केला नव्हता. त्यामुळे Domino effect.
मेलांज A+B+C ला आणि दामले Main Stage ला असते तर काहीतरी करता आले असते, पण Hind site is 20/20.

Pages