सोसायटीचे नियम व कायदे विषयक

Submitted by ferfatka on 30 March, 2013 - 07:23

हा दुवा सोसायटीचे नियम व कायदे विषयक असून, सोसायटीमध्ये राहणा:या अनेकांना अडचणी येत असतात. अनेकवेळा नाहक त्रस सोसावा लागतो. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास, योग्य सल्ला द्यावा. धन्यवाद.

मी एका गृहरचना सोसायटीत गेल्या 6 वर्षापासून राहत आहे. माङो घर 4 थ्या मजल्यावर आहे. महापालिकेकडून येणारे पाणी खालील टाकीत साठवून ते पाणी पंपिंग करून सोसायटीच्या वरील टाकीतून सर्वाना पुरविली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून वरील टाकीतून येणारे पाणी सोडल्यानंतर माङयाकडे पाणी कमी दाबाने तर कधी येत नाही. खालील मजल्यांवरील सभासदांनी पाणी भरल्यानंतर नळ बंद केल्यास पाणी येते पण तेही कमी दाबाने. अनेकवेळा खाली जाऊन पाणी बंद करण्याबाबत विनंती करावी लागते. यावरून अनेकदा किरकोळ वादही झाले आहेत. याबाबत स्वतंत्र्य नळकनेक्शन देण्याबाबत मी बैठकीत बोललो मात्र, अनेकजणांचा याला विरोध आहे. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास जरूर कळावा.
धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार
या वरील विषयात तुम्हाला काही मुद्दे सांगतो
१)तुमच्या सोसायटीला येणारे पाण्याचे मीटर रिडींग चेक करा , बरेचदा पाणी कमी येते
२)तुमच्या घरात येणार्ञा पाईपलाईन चेक करुन घ्या , त्यात ब्लॉक असण्याची शक्यता आहे.

भिडे सर
तुम्ही सांगितल्याप्रमाणो या आधीच पाईपलाईन मध्ये अडथळा आहे का ते तपासून झाले आहे. माझा मुद्दा वरील मजल्यासाठी व खालील मजल्यासाठी एकाच टाकीतून स्वतंत्र पाण्याची पाईपलाईन हा आहे.
धन्यवाद.

सोसायटीत रहाण्याचे काही फायदे आहेत जसे समाईक भिती जीने यामुळे बांधकामाचा खर्च कमी होतो तसेच देखभालीचा खर्च कमी होतो.

शिवाय ( चांगला ) शेजार मिळाल्यास बंगल्यात एकाकी पडल्याचे त्रास कमी होतात.

वर रहाणार्‍यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणे ही तक्रार नाही यारचनेचा दोष आहे. याला पर्याय आहे.

महानगर पालिकेने दर माणशी दररोज २०० लिटर पाणी मिळावे असे मानक बनवले होते. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात ते पुण्यात ५० ली दररोज दरमाणशी इतके खाली आले आहे.

वरील प्रश्न जर या प्रमाणे खालच्या टाकीत पाणी पडत नसेल तर निर्माण होतो. बर्‍याच वेळा बिल्डर्सनाच काय पण आर्किटेक्स्ट्स ना पणझे माहित नाही असे वाटते.

आपल्या सोसायटीत किती माणसे सर्वसाधारण पणे रहातात व दोन्ही वेळा मिळुन एकुण किती लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो हे पहावे. हा जर कमी होत असेल तर महानगर- नगरपालिकेला सोसायटी मार्फत तक्रार करुन पाण्याच्या पुरवठ्याची वेळ किंवा प्रेशर वाढवुन घ्यावे.

जर आपली खालची टाकी कमी क्षमतेची असेल तर ती वाढवुन घ्यावी. यासाठी मुळच्या टाकीच्या रचनेत बदल नकरता आणखी एक टाकी मध्ये पाईप लाऊन जोडली जाऊ शकते.

थोडक्यात महानगर पालिका पुरवते ते पाणी पंपाने उचलले जाऊन वरच्या टाकीत पडणे गरजेचे आहे. खालची टाकी कायम पाणी पडण्यासाठी रिकामी असावी ( पाणी येण्याच्या वेळात ) अन्यथा पंपाची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. पंप अ‍ॅटोमॅटीक ऑन्/ऑफ झाल्यास मानवी ट्रुटीने होणारे दोष टाळले जातील.

हे सर्व अनुभवाअंती लिहले आहे. कृपया इतर सभासदांच्या मतीने विचारपुर्वक आमलात आणावे व फायदा झाला तरी नाही झाला तरी कळवावे.

सोसायटीमध्ये घरगुती कोचिंग कलास सुरू असतील दिवसभरात मुले जवळपास 60 ते 70 आणि सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8
तर याबाबद्दल काही नियम आहेत का

साधारणपणे दोन चार ब्याचेस शिकवण्या बऱ्याच सोसायटीत महिला घेत असतात. तिकडे दुर्लक्ष करतात सभासद.
--------------------------
पण खूप मुले सतत येत जातात, गोंगाट करतात, सायकली ठेवतात, लिफ्टचा वापर असे होत असेल तर त्रास होतो.
तर ही कारणे देऊन आणि ' सोसायटीतला फ्लॅट फक्त राहाण्यासाठी आहे' असे नमुद करून कमिटीतला ठराव असलेली पानाची फोटोकॉपी अधिक सोसायटीच्या लेटर हेडवर एक कवर लेटर " तुमच्या शिकवणीचा त्रास होतो सभासदांना तरी ते क्लासेस नवीन शैक्षणिक वर्षासाठी दुसरीकडे चालवून सहकार्य करा" हे एक साधी नोटीस म्हणून ज्या सभासदाच्या नावावर फ्लॅट आहे त्यास हाती देऊन त्याची सही घ्या.
कमिटि बुकात पुन्हा सही घेतल्याची नोंद करा.
( जे सभासद तक्रारी करतात त्यांना लेखी तक्रार द्या सांगितलं तर देत नाहीत.)
तीन महिन्यांनी पुन्हा स्मरण नोटीस देणे. अधिक एक प्रत उपनिबंधक सहकारी संस्था यांना.

फरक पडतो. कमिटीसुद्धा action घेते हे लेखी राहाते.
--------
वकीलातर्फे केस लावली , प्रकरण न्यायालय प्रविष्ट झाले तर पुढे कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत काहीही करता येत नाही, अशा केसेस कित्येक वर्षे चालतात. उत्पन्नाला जोड म्हणून हे शिकवणी वर्ग घेतो असा मुद्दा सभासद मांडतो. फाटे फुटतात.

कमर्शियल गाळा म्हटल्यावर सर्व आलंच की. मला वाटतं एनओसी ही रंग/रसायने वगैरे घातक वस्तूंसाठी आणि काही स्ट्रक्चरल फेरफार केलेले असल्यास संमती संदर्भात आवश्यक असावी.
हॉटेलातला gas वापर हा काही इतर घरांतल्यापेक्षा वेगळा नाही.
तरीही सोसायटीत असल्याने आपण तिथे जागेचा वापर काय करणार हे कळवायचे आणि अर्ज मिळाल्याची सेक्रेट्रीकडून सही घ्यायची.. त्यांच्याकडून काहीच नकारात्मक उत्तर महिना दीड महिन्यात न आल्यास तो अर्ज स्विकारला धरण्यात येतो.
( आलेल्या अर्जाची पुढच्या कमिटी मिटिंगमध्ये नोंद करून कमिटीत चर्चेला घेऊन परत उत्तर पाठवणेची जबाबदारी सेक्रेट्रीच्या कामात नियमाने धरलेली आहे.)

@ Srd धन्यवाद,
गाळा रेस्टोरेंट चालु करण्यासाठी भाड्याने दिला आहे, त्याने अजुन फक्त बोर्ड लावला आहे , दोन तिन मेंबर्सनी बोली आक्षेप घेतला आहे.
अर्ज देतो, बघु पुढे काय होते

नमस्कार सर,
मि मुंबई मधील एका हाऊसिंग सोसायटी मधे राहतो. आमच्या सोसायटी मधे आमच्या कमिटी मेंबर (अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिंदार, व इतर इतर सदस्य) यांच्या बरोबर आमचे बिलकुल पटत नाही कारण ते आमची बिल्डिंग सुधरावी या साथी काहीच पुढाकार घेत नाही, आणि आम्ही कोणती मागणी केली किंवा आमचे प्रश्न मांडले तर त्यांचे उत्तर पन मिळत नाही
१)म्हणून आम्हाला आमची नवीन सोसायटी मेंबर ची नेमणुक करायची आहे त्या साथी काय करावे लागेल आम्हाला.
२)सोसायटी मधे फॅमिली मेंबर सभासद होऊ शकतात का (म्हणजे रूम हा वडिलांच्या नावावर आहे आणि त्यांच्या मुलगा सोसायटी मेंबर चा सभासद होऊ शकतो का किंवा त्याला AGM मधे आपले विचार मांडण्याच अधिकार असतो का)

@ waingankar123@ ,

१) हे सोपे नाही.
आताची कमिटी कशी बरोबर नाही याची एक दोन कारणे लिहून सोसायटीच्या साठ टक्के सभासदांच्या सह्या घेऊन तो अर्ज 'उप निबंधक सह गृह संस्था' याच्याकडे द्यावा लागेल.
गोची अशी असते की तोंडावर हो हो म्हणणारे मेंबर सह्या देणार नाहीत.
पुढच्या निवडणुकीत बदला.

>>>>आम्ही कोणती मागणी केली किंवा आमचे प्रश्न मांडले तर त्यांचे उत्तर पन मिळत नाही >>>>>

एक दोन प्रश्न लिहून काही सभासदांच्या सह्या घेऊन यासाठी 'स्पेशल जेनरल बॉडी मीटिंग' ( विशेष निर्णय घेण्यासाठी ' विशेष सर्वसाधारण सभा' कितीही घेता येतात. ) बोलावण्याचा अर्ज चेअरमन/सेक्रेट्रीला देणे. याच्या कॉपीवर सेक्रेटरीची अर्ज मिळाल्याची सही घेणे. हा फार प्रभावी उपाय आहे. ( ५० सभासद असतील तर सात आठ सह्या तरी घ्या.)

२) >>>> त्यांच्या मुलगा सोसायटी मेंबर चा सभासद होऊ शकतो का >>>>
- ● नाही.
असोसिएट मेंबर नोंद झाल्यास वडिलांच्या ( प्रथम नाव असलेला सभासद) परवानगीने त्यांच्याऐवजी सभेला उपस्थित राहून मतदानही करू शकतो.
तोपर्यंत वडलांच्या सहीने निरनिराळे अर्ज कमिटीस देता येतील.