मन्ह्या गावन्या गप्पा!

Submitted by मी_आर्या on 30 March, 2013 - 03:35

नमस्कार लोकेसहो!
इब्लिसनी आठेनी पोस्ट दखीसन मन्ह्या गावनी याद उनी. काय याद दिधी भौ तु 'डोलची'नी! Happy तुम्ही बी लिखाच आते धुय्यानी धुयवडवर!
http://www.maayboli.com/node/42113

तर आपला गावन्या आठवनी लिहिन्याकरता हाई धागा काढा. तठा गप्पानां बाफ व्हावाडी देत, म्हनुन हाउ बाफ.:) तर लोकेसहो, तुम्हन्या गावना बद्दल काही याद उनी, काही लिखानं शे त आठे लिखानं.

सुरवात मी करस! मन्हं गाव धुळे. आते धुळवडना विषय निघेल शे तं त्यावर लिखस.

मन्हा बाबा सांगे..त्यान्हा टाईमले धुळवडना मोठा दांगडो व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे विशेष शे. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजतस. ५वी गल्ली बाम्हन लोकेस्नी. तीन्हा बाजुले खोलगल्ली- गल्ली नंबर ४. बारीशमां आख्खा गावनं पाणी खोलगल्ली मां भरे. नंतर आग्रा रोड... कपडास्ना आणि सराफ बाजार. आग्रा रोडना एक साईडले पाच कंदील.

पुर्वी माघ पौर्णिमा ले म्हन्जे होळीना पह्यले नी पौर्णिमालेच रस्तामां खड्डा खणीसन एरंडनं झाड गाडी देत. मग बठ्ठा लोकेस्नी समझी लेवानं की होळी महिनाभर शे आते. Happy होळीना पह्यले आठ दिन पोरेसोरेस्नी लगबग सुरु व्हये....वर्गनी आणि लाकडं मांगानं करता. जर गल्लीमां कुणी लाकडं नै दिधी तं बस्स...त्याले असा तर्रास देये पोरे!! एक साल, एक डॉक्टरने वर्गणी मांगाना करता ज्या पोरे जाएल व्हते त्यास्ले हाकलुन दिन्थं. बस्स्...पोरे चिडी ग्यात. रातमां, त्यान्हा डॉक्टरनां बोर्ड काढुन त्या टुकार पोरेस्नी
न्हाईना घरना बाहेर टांगी दिधा. आणि न्हाईना बोर्ड... हाई डॉक्टरना घरना भायेर. सकायी उठीसन ही बोम्ब व्हयनी व्हती. Lol
हां तर धुळवडनी बात करी राह्यनु. तव्हय गल्लीना कोपरा कोपरामां मोठा मोठा कलरनं पाणीना ड्रम बैलगाडीमां भरी लईयेत. आणि तठा ठी देत. अन मग रोडवरुन जानारा एक भी माणुस सुटे नै. त्या काय आसं इचकुपिचकु पिचकारी लिसन नै खेयेत. इतली मोठी डोलची मां पाणी लिसन माणसास्ले पाठवर सपका मारे तं तुमन्हा शर्ट काय करतस्...बनियन बी फाटी जाए लोकेस्ना!!! कोनी मजाकना व्हई तं त्याले उचलीसन ड्रममां बुचकाळी देत.

आखो मंग काय सांगु भौ... कदीमधी धुय्याना लोके रगतनी होली बी खेळत.
कदी कोठे प्रार्थनास्थळना वर कलरनं पाणी उडी तं व्हई गय ना कल्याण!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी-गुजराथीचं मिश्रण वाटतंय..खानदेशी भाषा म्हणजे.
आर्या, बहुतेक सगळं समजलं...छान लिहिलंस.

Chintoo-2-2.jpg

मला पण काही कळालं नाही Uhoh
आणि माझ्याकडे अर्धांग पण नाहीये Proud
तेंव्हा तुच सांग काय आहे हे

न्हाईना घरना बाहेर टांगी दिधा. आणि न्हाईना बोर्ड... हाई डॉक्टरना घरना भायेर.
>>>>
याला का हसता आहात तू आणी श्री? मला सांगा हे काय आहे

न्हाई = न्हावी.
न्हाई ना = न्हाव्याच्या घराचा(दुकानाचा) बोर्ड, डॉक्टरच्या घरा बाहेर टांगला. अशी अदलाबदल केल्याने लोक हसताहेत.