विकट गड अर्थात किल्ले पेब

Submitted by मुरारी on 29 March, 2013 - 05:10

धूळवडीच्या सुट्टीच निमित्त साधून एका दिवसात करता येण्याजोगा विकटगड सर करायचे ठरले. सोबत मिपाकर किसन,सौरभ आणि अल्पेश, चिन्मय होते. भयंकर तापणार्या उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून पहाटेच निघायचे ठरले.

१. धुक्यात हरवलेले ठाकुर्ली स्टेशन

A

६..३० ची कर्जत पकडली , किसन अल्पेश ठाण्याहून आले, मग नेरळला उतरल्यावर आधी पोटात इडल्या ,मेदूवडे सारले (आधी पोटोबा , मग ट्रेकोबा Happy ). नेरळ हून रिक्षा करून कातकर वाडीत पोचलो, खर तर आम्हाला 'वॉटर पाईप' स्टेशन मार्गे जायचे होते, पण रिक्षावाल्याने आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, कातकर वाडीत उतरवले आणि समोर उंचावर दिसणाऱ्या विकट गडाकडे बोट दाखवून ' हा इथून जा आता' सांगत पसार झाला.

२. पेब डोंगररांग
olp

3. स
सोबत ट्रेक क्षितीज ची प्रिंट आणलेली होतीच, त्यात कातकर वाडीतून जाणार्या रस्त्याबाबत माहिती दिलेली होती. तीन वाटा वर किल्ल्यावर जात होत्या म्हणे .
१. धबधब्यातून
२. मधली मुख्य वाट
३. इलेक्ट्रिक टोवर च्या बाजू बाजूने जाणारी लांबची वाट.

पण प्रत्यक्षात आमच्या समोर चारी बाजूनी डोंगर वेढलेले होते ,

४. qa

५.s

६. आंब्याचा एक विस्तीर्ण वृक्ष
qa
आणि मुख्य दिसेल अशी एकही वाट दिसत नव्हती , असंख्य लहान गुरवाटा होत्या, पण त्यावर पुढे जाणं शक्यच नव्हत. ( सिद्धगड ला असेच हरवून शेवटी हात हलवत घरी गेल्याची आठवण ताजी झाली ). शेवटी किसन द्येवांबरोबर सल्ला मसलत करून परत कातकर वाडीत आलो, आणि एक वाटाड्या सोबत घेतला, ५०० ,४०० अशी घासाघीस करत शेवटी २५० रुपयांवर साहेब वर पर्यंत यायला तयार झाले . १० मिनिटात येतो सांगून तो घरी पळाला तोवर सूर्य तळपायला लागलेला होता . एक पांगार्याच झाड दिमाखात फुललेलं होतं
७. पांगारा
z
८. ss
काही वेळातच तो आला,आम्हाला त्याने जी सर्वात लांब आणि कठीण आहे, अशा तिसर्या वाटेने न्यायला सुरुवात केली. सुरुवातीलाच सरळ सरळ उभे चढ लागायला लागले , आणि प्रचंड उन्ह आणि दमट वातावरणाने त्रास व्हायला लागला,
किसनद्येव डी हायड्रेट झाल्यागत झाले. पण मी सोबत द्राक्षे आणलेली होती. ती खाल्ली आणि रानात भरपूर करवंदे लागलेली होती, ती खात हळू हळू पुढे सरकायला लागलो. थोड्या वेळात वातावरणाची सवय झाली आणि आम्ही आमचा वेग वाढवला.
९. धुकट सकाळ
lk

१०. रानमेवा
lm

मध्ये मध्ये रॉक प्याचेस लागत होते, तापलेल्या दगडांवर हात ठेवून वर जात होतो. आजूबाजूचा निसर्ग सुरेखच होता.

११.
lm

१२. रानफुल
a

१३.a

१४. तीन नंबरच्या डोंगरातून आम्ही वर आलो
tyyu

शेवटी एकदाचे आम्ही पेब गडाकडील गुहांपर्यंत आलो. समोर प्रचंड डोंगर रांग दिसत होती. दक्षिण बाजूला प्रबळगड उठून दिसत होता. येथील कातळात प्रचंड मोठी गुहा खोदलेली आहे. एकावेळी शे दोनशे माणसं आरामात राहतील एवढी मोठी गुहा आहे.

१५. कोरलेली गुहा
a
ह्या गुहेच्या आसपास अजूनही पाच,सहा भुयारी गुहा दिसतात, मात्र यात जायचे म्हणजे रांगतच जावे लागते, एका वेळी एक माणूस या प्रमाणात. शिवाय सोबत विजेरी आवश्यक. गुहा पाहून पुढे निघाल्यावर किल्ल्याची ढासळलेली तटबंदी दिसते, इथून वर जायला आता एक शिडी लावलेली आहे. तिथून वर आलो.
१६. शिडी
a

१७. वर आल्यावर समोरच एक लहानशी मारुतीची मूर्ती दिसते.
az

१८.त्याच्यावरच्या बाजूला एक पाण्याच भरलेलं टाकं आहे, पण यातल पाणी पिण्याजोग नाही.
n
आम्ही अजून सर्वोच्च टोकावर पोचलेलो नव्हतो. पण आजूबाजूचा भूप्रदेश सुरेखच दिसत होता.

१९. pl
२०.a
दूरवरचा गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण दिसत होतं.
२१. गाडेश्वर तलाव
weqwe
लांबवरचा धुक्यात हरवलेला चंदेरी सुद्धा डोकवत होता. उत्तरेला मलंगगडाचे सुळके दिसत होते.

२२. a

२३.a
उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. मस्त गरमागरम वारे वाहत होते. टोकावर कुठले तरी निसर्गमित्र गडाच्या डागडुजीच काम करत होते.
२४. 'वॉटर पाईप' स्टेशन कडून येणारी वाट

a

वाटाड्याने आम्हाला पिण्याच्या टाक्याजवळ नेलं. बाजूलाच एक शिवालय होतं, वर देवीची मूर्ती होती.
२५. a

२६. अष्टभुजा
a
टाक्यातून गार पाणी काढून ढसाढसा प्यायलो. जवळजवळ अर्धी आंघोळच झाली. डोक्यावर बदाबदा पाणी ओतून जीवाला शांत केलं. आता समोरच्या बाजूने आम्हाला "वॉटर पाईप " स्टेशन बाजूने येणारी वाट दिसत होती. हि खूपच सोप्पी वाटत होती, सर्वांनी त्या रिक्षावाल्याला भरपूर श्या घातल्या.
गडाच्या सर्वोच्च टोकावर एक दत्त मंदिर आणि कुठल्यातरी बाबांचा आश्रम आहे. आम्ही आश्रमात काही गेलो नाही. मस्त एका झाडाच्या सावलीत विसावलो , आणि पोट्पुजेला सुरुवात केली. "ब्रेड, सॉस, काकडी, फोडणीचा भात, बिस्कीट, चकली,आणि उकडलेली अंडी असा झकास बेत होता. मी या सर्व पदार्थांना एकत्र करून एक जम्बो sandwich बनवलं आणि खायला सुरुवात केली :). (सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते, पण मला भूक लागलेली असल्याने मला क्क्काही क्क्काही फरक पडला नाही Wink )सर्वांनी भरपूर हादडल्यावर किसन द्येवांनी एक कोपरा पकडला आणि सुखाने निद्राधीन झाले, मग आम्ही बी त्यांचच अनुकरण करून आडवे झालो, अर्धा तास आराम केल्यावर परतीला लागलो. अर्थातच आलो त्या वाटेने उतरणार नव्हतो, जाताना आम्ही समोरची वाट पकडली, इथेही शिड्या लावलेल्या होत्या, त्या उतरून खाली आलो,
२७.a

२८. गडाच्या तटबंदीचे उरलेले अवशेष
a

अर्धा पाउण तास चालल्यावर एक गणपतीच छोटंसं देऊळ लागलं , त्यापुढेच आम्हाला नेरळ- माथेरानचा रूट दिसला , हुश्श , पोचलो तर.

२९. rtr

३०. lm

आता उतरण सोप्पी होती. पण खूपच कंटाळवाणी. जल्ला वॉटर पाईप स्टेशन येता येत नव्हत, रस्ता दिसत नव्हता, आम्ही नुसतेच चालतोय . मधेच मागून हळूहळू डुगडूगत नेरळ -माथेरान छोटी ट्रेन निघून गेली .

३१.a

आजूबाजूचे सह्याद्रीचे कडे छातीत धडकी भरतील असेच होते.

३२.a

३३. एक सुंदर वृक्ष
a

३४.a
काही वेळाने खाली नेरळ दिसायला लागलं. अजून बराच वेळ चालल्यानंतर शेवटी एकदाचा रस्ता
दिसला. एक ओम्नी वाला उभा होताच. त्याने सरळ नेरळ स्टेशन ला सोडले. स्टेशन ला बाहेर मस्त चहा मारला. ३.३० वाजलेले होते. म्हणजे आम्ही एकदम टैमात होतो. थोड्याच वेळात ट्रेन आली, आणि आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेबचा किल्ला हे आमचे महिन्यातील एकदा जावून आराम करण्याचे ठिकाण Happy कामाचा व्याप जास्त झाला कि , मी आणि माझा मित्र सुबोध आराम करण्यासाठी तेथे जतोच. अन एकदा नुसती पोस्त पडली कि बाकीचे मित्र हि तयर. मग रात्रीच FIRECAMP आणि मस्त खिचडी बनवन आणि रात्री ३:३ वाजता उठून गरम गरम कॉफी पिन. Happy

स्वस्तात मस्त असा हा ट्रेक …………

नेरळ वरून ७० रु १३४ च्या थांब्यावर उतरायचं आणि प्रवास सुरु .
पुढच्या खेपेला गेलास ना प्रसन्न तर कड्यावरचा गणपती हि बघ तुला तो १५८ च्या थांब्यावरून दिसेल. Happy पाहशील तर ट्रेक पूर्ण झाल्याच कौतुक वतेल.

@चेतन

}}}}}
पुढच्या खेपेला गेलास ना प्रसन्न तर कड्यावरचा गणपती हि बघ तुला तो १५८ च्या थांब्यावरून दिसेल. स्मित पाहशील तर ट्रेक पूर्ण झाल्याच कौतुक वतेल.

हो येताना आम्हाला ते छोटंसं गणपतीच देऊळ लागलं , फारच सुरेख निसर्ग दिसतो तिथून

प्रसन्न मस्त लिहिले आहेस.... फोटो त्यावर तु केलेले भाष्य अप्रतिम.... वाचल्यावर आपली देखील छोटी ट्रेकींग ट्रीप झाली असे वाटते Happy

प्रसन्न,

मस्त वर्णन आहे. जवळंच माथेरानचा ट्रेक होता म्हणून वाचतांना फारसं दमायला झालं नाही! Wink फक्त एक शंका डोकावली.

>> मधेच मागून हळूहळू डुगडूगत नेरळ -माथेरान छोटी ट्रेन निघून गेली .

ती माथेरान-नेरळ ट्रेन असायला पाहिजे ना? प्रचि ३१ कडे पाहून वाटतंय की तुमच्या चालण्याची दिशा उजवीकडून डावीकडे अशी होती. बरोबर?

आ.न.,
-गा.पै.

>>>>>ती माथेरान-नेरळ ट्रेन असायला पाहिजे ना? प्रचि ३१ कडे पाहून वाटतंय की तुमच्या चालण्याची दिशा उजवीकडून डावीकडे अशी होती. बरोबर?

हॅ हॅ

खरय Wink

प्रसन्न,

हुश्श! झाला माझा जीव शांत एकदाचा. प्रचिमधला उजेडसावल्या पाहून आणि गुग्गुळाचार्यांच्या नकाशावरून अंदाज बांधला. Happy शंकासमाधानाबद्दल धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.