गती

Submitted by pulasti on 27 March, 2013 - 10:50

शक्य ते ते करायचे आहे
मग घडो जे घडायचे आहे

का उगाचच बसून आहे मी?
केवढे आवरायचे आहे...

काय तो बोलतोय केव्हाचा
काय त्याला म्हणायचे आहे

साचलो मी गतीमुळे माझ्या
आज उपसत बसायचे आहे*

मोकळे हो नभा जरा आता
पाखराला उडायचे आहे

* बदलून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैवकु,
किस्सा मस्तय देवसर
तो किस्सा नव्हता मनोरंजनासाठी सांगितलेला, तो एक प्रत्यय/अनुभव होता आम्हास आलेला जो हा शेर वाचतानाच आमच्या मनामधे प्रकटला! जिथे आकाश व पाखरे ही प्रतिके चपखल लागू होतात!
आकाश खाली येणे वगैरे विनोदी पण कृश चर्चा चालली होती म्हणून हा खुलासा करावा वाटला!

आकाश/आभाळ/अवकाश/अंतराळ म्हणजे पोकळी, शून्य, पंचमहाभूतांपैकी शेवटचे, निर्गुणस्वरूप......हे झाले शाब्दिक अर्थ!
हेच प्रतिक घेऊन अनेक लाक्षणिक अर्थ अभिव्यक्त करता येतात काव्यात!
जसे वरील आमच्या उदाहरणात UPSCCची परिक्षा किंवा GSIची नोकरी हे आकाश आहे!
कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च गोष्ट म्हणजे आकाश वगैरे!

आता कुणाला कोणती गोष्ट आकाशवजा वाटेल हे व्यक्तिसापेक्ष आहे!
एक माणूस काही सर्व क्षेत्रात आकाशाची उंची गाठू शकत नाही!

तेव्हा......
आभाळ -अवकाश हे सर्वर्त्र आहे मग ते वरच आहे खलीच आहे असे का मानत बसायचे आपल्या आजूबाजूला हातासरशी किंवा आपल्या आतच आहे असे मानून त्यतच विहार करायचा हे कसे वाटते
या तुझ्या प्रश्नावर इतकेच म्हणावेसे वाटते की, आपला जसा पिंड, जे आपले स्वप्न, तसे आपले आकाश हे वेगळे असते!

साधारणपणे आकाश हे प्रतिक आपल्यापेक्षा उंच गोष्टीला वापरतात जी सध्या अप्राप्य असेल पण प्रयात्नांती प्राप्त होवू शकते! काही जणच आकाशाला गवसणी घालू शकतात, प्रत्येकजण नव्हे!

आकाशाचेच प्रतिक असलेला आमचा एक जुना शेर आठवला..............

आकाश उतरले खाली, दाराशी, खिडकीपाशी!
पिंजरा घराचा आता पिंजरा राहिला नाही!!

प्रतिक एकच(आकाशाचे) मात्र किती वेगवेगळ्या संदर्भात वापरता येते!

आमच्या प्रतिसादाखाली चर्चा रुचकर चालली आहे, मजा आली वाचताना असे लिहिल्याने पारिजाताजींना धन्यवाद दिले! ते प्रातिनिधिक धन्यवाद आहेत! तसे तर्कशुद्ध चर्चा करणा-या सर्वच मायबोलीकरांना आमचे धन्यवाद आहेत! फक्त आम्ही ते प्रकटपणे लिहिले नाही! पण भावना धन्यवादाची व कृतज्ञतेचीच आमच्या मनात आहे सर्वांप्रित्यर्थ!
भूषणराव आपले तर विशेष आभार, धन्यवाद, चर्चेत हास्याची लकेर उमटवून चर्चा हलकी केल्याबद्दल!

छान गझल.

शेवटचे दोन शेर सर्वात आवडले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर

देवपूरकर स्वत:ला ’मी’ न म्हणता ’आम्ही’ म्हणतात. (का म्हणतात, त्यांनाच ठाऊक)

तिलकधारी या सदस्यनामांतर्गत लिहिलेले प्रतिसाद, उदा. "तिलकधारीला ही गझल छान वाटली."
"हा प्रतिसाद तिलकधारी स्वयंसंपादीत करत आहे", "तिलकधारी गंमत करत होता, पण वृत्त हवेच" इ.इ. वाचले आणि जुन्या हिन्दी सिनेमांतील काही व्यक्तिरेखा (उदा. : बसंती - शोले, मोगॅंबो - मिस्टर इंडिया.) स्वत:बद्दल बोलताना ’मी’ हे सर्वनाम न वापरता स्वत:चे नांव वापरतात, त्याची आठवण झाली.

’मी’ हे सर्वनाम सर्वसाधारण/सामान्य माणसं वापरतात. पण ज्यांनी ’मीपणा’ चा त्याग केलाय किंबहुना ’मीपणा’ सारखी क्षुद्र भावना ज्यांच्या आसपास फिरकायलाही धजावत नसेल अशी असामान्य माणसे ’मी’ चा अनुल्लेख करत असावीत; असा बाळबोध विचार मनात येऊन गेला.

असो.....

सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून कोणी कशावर काय आणि कसं लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि स्वातंत्र्य; आणि ते(मूळ रचना आणि/किंवा प्रतिसाद) वाचल्यावर वाचकाने कसं रिऍक्ट व्हावं हे त्या वाचकाचं स्वातंत्र्य.

हे असलं काहीतरी अवांतर लिहिल्याने रसिकांचा रसभंग झाला असल्यास क्षमस्व.

उल्हासराव,
आपला मायबोलीवरील वावर आम्हास तरी अलीकडील दिसत आहे!
स्वत:स मी ऐवजी आम्ही असे संबोधण्याचे आमचे कारण ब-याच वेळा प्रतिसादात लिहून झाले आहे!
तेव्हा आमचे पूर्वीचे प्रतिसाद वाचावेत व ते कारण जाणून घ्यावे, नुसतेच बौद्धिक कयास करण्यापेक्षा! किंवा कोणत्याही जुन्या मायबोलीकराला विचारावे! म्हणजे आपले कुतुहल संपेल!
आमचे नाव घेऊन आपण जे काही वर कयासात्मक लिहिले आहे, त्यासाठी वेळेची पदरमोड करून हे लिहिण्याचा प्रपंच!
स्वत: स कुणी काय संबोधावे हे देखिल आता लोक ठरवू पहातात हे पाहून चकीत झालो आहोत!

सुंदर.......
'खूप खूप वाचले, खूप वाचायचे आहे
कागदावर आता लिहायचे आहे...........................

Pages