गती

Submitted by pulasti on 27 March, 2013 - 10:50

शक्य ते ते करायचे आहे
मग घडो जे घडायचे आहे

का उगाचच बसून आहे मी?
केवढे आवरायचे आहे...

काय तो बोलतोय केव्हाचा
काय त्याला म्हणायचे आहे

साचलो मी गतीमुळे माझ्या
आज उपसत बसायचे आहे*

मोकळे हो नभा जरा आता
पाखराला उडायचे आहे

* बदलून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
साचलो मी गतीमुळे माझ्या
थांबुनी सर्व उपसायचे आहे
<<
आहा! Happy
(सानी मिसर्‍यात लय गडबडते आहे, पण) खयाल भारी! Happy

सर्व शेर आवडले खयाल फार छान आहेत
लय बेहद आवडली मात्रावृत्त आहे की अक्षरगणवृत्त .......मी मात्रा मोजल्या नाहीत पण साधारणपणे गालगा गालगा लगागागा अशा अक्षरगणाचा लयीत वाचता आले मला तरी
शेरातील प्रवाहीपणा (की बोलकेपणा म्हणू?) फार भावला

का उगाचच बसून आहे मी?
केवढे आवरायचे आहे...<<< अतिशय बोलका आणि सहज प्लस अर्थपूर्ण शेर

काय तो बोलतोय केव्हाचा
काय त्याला म्हणायचे आहे<<< छान

साचलो मी गतीमुळे माझ्या
थांबुनी सर्व उपसायचे आहे<<< पहिली ओळ सुपर, दुसरीत वृत्त बदललेले दिसते, तसेच, उपसायचेचा 'गतीमुळे साचण्याशी' नेमका संबंध लक्षात आला नाही.

तरीही नाहीच मला लक्षात येत लय.
मी हे वैवकु म्हणाले त्याप्रमाणे गालगा गालगा लगागागा (राग नाही तुझ्या नकाराचा - चीड आली तुझ्या बहाण्याची) असं वाचायचा प्रयत्न करते आहे. तुम्ही कसं वाचताय?

बाकी सर्व मिसर्‍यात तीच लय आहे (नज्म उलझी... किंवा दो घडी वो जो पास आ बैठे)

उपसायच्या मिसर्‍यात तुम्ही म्हणता तशी तोडमोड आहेच (तिलकधारी येतील बहुतेक कानउपटणी करायला Happy ).

थां ब तो | 'च उ' प सा | य चे आहे
गा ल गा | गा ल गा | लगागागा

बघतो काही सुचतय का. तुम्हीही कळवा काही सुचलं तर!

शक्य ते ते करायचे आहे
मग घडो जे घडायचे आहे
.
का उगाचच बसून आहे मी?
केवढे आवरायचे आहे...
.
मोकळे हो नभा जरा आता
पाखराला उडायचे आहे

क्या बात! आवडलेत. Happy

शक्य ते ते करायचे आहे
मग घडो जे घडायचे आहे

अतिशय सुंदर मतला...

का उगाचच बसून आहे मी?
केवढे आवरायचे आहे...

सुरेख..

काय तो बोलतोय केव्हाचा
काय त्याला म्हणायचे आहे

हा हि आवडला...

साचलो मी गतीमुळे - थोडे
थांबतोच; उपसायचे आहे

खरं तर तुम्ही वापरलेले वृत्त
'गालगा गालगा लगागागा' असे नसून 'गालगागा लगा लगागागा - वृत्त लज्जिता'
असे आहे
त्यामुळे
थां ब तो | 'च उ' प सा | य चे आहे
गा ल गा | गा ल गा | लगागागा
असे तोडल्याने लय जाईल...

लज्जिता वृत्तात पहिल्या 'गालगागा' नंतर छोटासा यति येतो..आणि तशी फोड शक्य नसल्यानेच या मिसर्यात लय हलते आहे असे माझे मत.

मोकळे हो नभा जरा आता
पाखराला उडायचे आहे

सुंदर..

एकूण गझल फारच सुंदर...अभिनंदन आणि शुभेच्छा.

नमस्कार तिलकधारीजी! यती/लयभंग करणार्‍या अशुद्ध शेराबद्दल तुमचे कान उपटणे योग्यच आहे. स्वातीला सांगितल्याप्रमाणे काही बदल सुचला किंवा एखादा नवीन शेर याच जमीनीत सुचला की बदल करीन.
मोकळे / खालती - मला नभाला खाली बोलवायचं नाहिये. फक्त मोकळं हो, उघड, रिपरीप थांबव, एवढंच म्हणायचंय. पाखराला नभ जिंकायची वगैरे मन्शा नाही. पण थोडंसं उडणंही सर्वस्वी त्याच्या हातात नाही. नभाने जरा मोकळं तरी व्हायला हवं त्यासाठी. मला तरी हा आओ जाओ घर तुम्हारा असा शेर वाटत नाही.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

इतर सर्वांचेही मनापासून धन्यवाद. वैभव, माहितीसाठी तुझे खास!

नमस्कार पुलस्ती,

तिलकधारी तुमच्या गझलेवर मनापासून प्रेम करतो; म्हणून उद्धट बोलला. तुमचे स्पष्टीकरण उत्तम तर आहेच, पण ते न वाचताही समजलेले होते कारण पुलस्तींच्या गझला तिलकधारीला पाठ आहेत.

तिलकधारी गंमत करत होता, पण वृत्त हवेच

>> तिलकधारी गंमत करत होता
ट्च ट्च ट्च! कोलांट्या उड्या स्वाती_आंबोळेंना आवडत नाहीत. 'चुकलो बुवा' म्हणणं तिलकधार्‍यांच्यात अलाउड नसतं का? Proud

तिलकधारी चुकलेला नाही, प्रिय मित्र पुलस्ती वृत्तात चुकलेला आहे. तिलकधारी जुन्या मैत्रीसाठी प्रतिसाद संपादीत करत असतो. वृत्त चुकलेलेच आहे.

तिलकधारीला प्रिय मित्र पुलस्तीशी संवाद साध्यण्यासाठी मध्यस्थाची आवश्यकता नाही.

जुन्या मैत्रीसाठी होय? स्वाती_आंबोळेंना वाटलं आभाळाचा शेर आधी कळला नव्हता ते निस्तरायला.
असू दे असू दे. स्वाती_आंबोळेंना गंमत वाटायची ती वाटलेलीच आहे. Proud

आभाळाचा शेर कळला नव्हता हे आंबोळेंचे गृहीतक आहे. तो शेर समजलेला होताच. तो 'अनचेंजेबल' का आहे असे तिलकधारी विचारत होता. खरे तर त्याचे उत्तर पुलस्तीने दिलेले नाही. आभाळा, मोकळे हो, यात आभाळ मोकळे नाही हे जाणवत राहते तर आभाळा खालती ये यात आभाळ अप्राप्य आहे हे! तिलकधारी म्हणत आहे की डेप्थ किती तर्‍हेने आजमावता स्वतःच्याच म्हणण्याची! पुलस्तीला तसे म्हणायचे होते म्हणून तिलकधारी गप्प बसला. तसेच का म्हणायचे होते यावर वाद होऊ शकत नाही म्हणून! पण गझलेच्या अंगभूत वैशिष्ट्यामध्ये हा अतिशय आम प्रश्न आहे की असेच का म्हणायचे होते, जर त्याच साच्यात असेही म्हणता येत होते. आता आंबोळेंना 'इस शहरमे तुम जैसे दीवाने हजारो है' हे विधान गझलीयत स्पष्ट करताना आपण का वापरले होते हे नेमके समजायला हरकत नसावी.

तिलकधारी संतुलित तेवढेच बोलतो.

थोडक्यात, आभाळा मोकळे हो हे 'मै तुलसी तेरे आंगन की' छाप सोज्वळ आहे आणि 'खालती ये' हे तुझ्यासारखे कित्येक आहेत छाप स्वस्त आहे. अनेकदा गझलेत स्वस्त व्हावे लागते. त्याच्यासाठी हिम्मत असावी लागते.

तिलकधारी हिम्मतीबाबत हिम्मतीने बोलत नव्हता, आता उगाच बोलू लागेल.

Happy

जोक्स अपार्ट, (आणि पुलस्तींनी त्यांचं उत्तर दिलेलंच आहे, तरीही) :
पाखराला कोणतीही 'सवलत' नको आहे. ते त्याचा प्रयत्न करतंच आहे. आता प्रश्न आभाळाच्या दानतीचा उरलेला आहे - असा त्या शेराचा मला समजलेला अर्थ. आणि त्या अर्थी तो व्यवस्थित बंदिस्त आहे असं माझं मत. Happy

आँ? तेवढ्यात नवीन पोस्ट आलीसुद्धा? बरं. Happy

>> तुझ्यासारखे कित्येक आहेत छाप स्वस्त आहे
अरे अरे! ते स्वस्त वाटते तुम्हाला? बरं तर मग.

जोक्स अपार्ट,

यानंतर स्वल्पविराम कशाला? जोक्स अपार्ट केल्यानंतरही काही म्हणायचे राहिलेले आहे हे अंडरलाईन करायला?

जोक्स अपार्ट.

मोकळे हो यात सवलत मागीतली गेलेली आहे. दानत अपेक्षित आहे.

अरे अरे! ते स्वस्त वाटते तुम्हाला? बरं तर मग.<<

तुमचे विचार अशक्ततेला सशक्तता समजणारे दिसतात. सशक्ततेला अशक्तता मानणे हा गझलकाराचा पारंपारीक अ‍ॅटिट्यूड आहे.

तुम्हाला नभाने मोकळे व्हावे ही पाखराची गरज वाटते. तिलकधारी म्हणतो की पाखराला उडायचे आहे, जरा खाली ये. यात ऐब आहे. पाखरू प्रयत्न करत बसणार नाही.

'मोकळे हो' असं पाखरू म्हणत नाहीये हो!

ते कोणीही म्हणत असले तरी पाखरासाठी म्हणत आहे.

तिलकधारी शेर भोचकपणे वाचतो

गझल आवडली

म्हणायचे आहे आणि गती हे शेर अधिक आवडले.

तिलकधारी व स्वातीताई ह्यांच्या जुगलबंदीने मजा आली. हेल्दी डिस्कशन्स विनोदी ढंगाने झाली तरी शिकणार्‍याला शिकता येते असे वाटले.

......................मोकळे हो नभा जरा आता .......................


....................खालती ये नभा जरा आता..........................

पहिल्या ओळीत मागणीतला साधेपणा आहे जे काय मागायचे आहे ते कमीत कमी असावे याचे भान आहे यात यामुळे खयालाचा दर्जा उंचावला आहे

दुसर्‍या ओळीत आपल्याला तेवढी भरारी घ्यायला जमणार नाही म्हणून नभाला तूच खाली ये अशी भीक मागीतल्याचा फील आहे जो शायराच्या प्रवॄत्तीतच बसत नसावा
___________________________________
अवांतरः
यातले पाखरू म्हणजे मन आत्मा या अर्थाने मी पाहतो
माझा एक आगामी गझलेचा शेर असा तयार आहे

गांजला हा देह करा-पिंजरा
पाखरू आता उडाले पाहिजे

(चला !! अवांतराच्या नावाखाली रिक्षा फिरवून झाली आहे... आता जातो Happy )

दार उघडेच ठेव आभाळा......
पाखराला उडायचे आहे
!(पाखरू आज यायचे आहे!)

हे आमचे पद्यात्मक मत!
आता करा काय तो विनोदी चर्चात्मक गदारोळ वा टाका एखादा मौलिक तुच्छ काककटाक्ष!
पर्यायी म्हणून याकडे बघू नये!
गझलप्रेमी नेमक्या मर्मावर बोट ठेवतात, रटाळ विनोदी वार्तालाप टाळून! हवेत गोळीबार तर ते कटाक्षाने टाळतात!
तर्कशुद्ध निखळ व्यक्तिनिरपेक्ष आस्वादात्मक चर्चेला नेहमीच तैनात असतात!

आभाळ हे आभाळाच्या जागीच असते! आभाळाला गवसणी घालावी लागते, त्यासाठी आभाळ कशाला झुकेल? स्थानभ्रष्ट होईल?
अवांतर: एक उदाहरण द्यावेसे वाटते!

१९७७साली झालेलेल्या UPSCच्या GSI(Geological Survey of India) साठी Geologist special examination for superclassI officer च्या परिक्षेस आम्ही बसलो होतो, वय वर्षे २२ असताना! अखिल भारतातून २००० जण लेखी परिक्षेस बसले होते! २३४ पोस्ट करता परिक्षा घेतली गेली होती! २०००मधून २००जण लेखी परिक्षेतून shortlist झाले ज्यात आमचा नंबर लागला व आम्ही दिमाखात दिल्लीला मुलाखतीसाठी सरकारी खर्चाने firstclassने गेलो!
४५मिनिटे मुलाखत झाली! ठीक व आश्वासक झाली! दिल्लीला वैद्यकीय तपासणीही झाली! पुण्यास परत आलो व प्राध्यापकी सुरूच ठेवली! सहा महिन्यांनी पलिस चौकशीही झाली! जवळ जवळ सिलेक्ट झालो असेच वाटत होते!
पण फायनल रिझल्ट लागला तेव्हा आमचे सिलेक्शन झाले नसल्याचे समजले(Thank God म्हणून आम्हाला आवडत्या प्राध्यापकी पेशात राहता आले!)
प्रथम आलेल्यास ५२% गुण होते! व शेवटच्या १००व्या सिलेक्ट झालेल्याला ५०% गुण होते! २% मधे १००जण बसले होते!

आता पोस्ट२३४ होत्या २००जण shortlisted होते! पण Geological Survey of Indiaने फक्त १०० पोस्टच भरल्या! १३४पोस्ट UPSCने रिक्त ठेवल्या!
म्हणजेच UPSC तिचे standard कायमच ठेवते! विद्यार्थ्यांनी त्यांचे standard उंचवायचे असते! हेच खरे!
इथे UPSCची परिक्षा किंवा GSIची नोकरी हे आकाश आहे! इच्छुक विद्यार्थी हे पाखरू आहे!
इथे आकाश खाली वाकत नसते! पाखराने उंच उडायचे असते! आभाळाला गवसणी घालायची असते! आभाळ कोणतीही भीक घालत नसते!

THERE IS ALWAYS ROOM AT THE TOP याची आठवण झाली!
........................................................................................................................................

विजयराव, आता बघा मजा येते का ते! वाचलात का आमचा वरील प्रतिसाद? की, तो अदखलपात्र वाटला, ज्याने मजा येण्याचा प्रश्नच उद्भवला नाही!

किस्सा मस्तय देवसर

त्यातून तो या शेराशी रीलेट ज्या पद्धतीने केलात ते आवडले

आता मला यातून काही सुचले आहे

आभाळ -अवकाश हे सर्वर्त्र आहे मग ते वरच आहे खलीच आहे असे का मानत बसायचे आपल्या आजूबाजूला हातासरशी किंवा आपल्या आतच आहे असे मानून त्यतच विहार करायचा हे कसे वाटते

हा विचार या जमीनीत बसवता येईल काय ???

Pages