भैया

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 March, 2013 - 11:04

गाडीवर कांदे लसून बटाटे
घेवूनीया वाटे
लागे भैया
पायात स्लिपर्स डोईस कमचा
खपाट गालांचा
हडकुळा
दूर त्याचे घर बायको नि पोर
आला लांबवर
पोटासाठी
सदा मुखी हासू सदा बोले साब
ठेवूनिया आब
माल विके
लाघवी बोलणे व्यवहारी जिणे
नच घाबरणे
कधी कष्टा
तया न आळस घड्याळी दिवस
टपरी भुकेस
चालतसे
एकेक रुपया मोलाचा कमवी
गावाला पाठवी
नियमित
सरस तेलाची खिचडी रोजची
खावून पोटाची
भागे वेळ
अन रात्र होता कुठे ओट्यावर
विडी फेके धूर
अंधारात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद विस्मयाजी,फारएण्ड,स्वातीजी,शशांक,जयश्रीजी .

अशा निरिक्षणासाठी 'माणूस' समजून घ्यायची ओढ, जाणीव आणि कुवत लागते.

कुठलाही आव, अभिनिवेष नसलेली ही सुंदर रचना खूप आवडली!!

विक्रान्त जी,छान...खरच छान...!!...भय्या ही असामी काय आहे ते दाखविलेत...भय्याला नावे थेवने सोपे पन भय्या बनने कथिन...!!!