Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 March, 2013 - 11:04
गाडीवर कांदे लसून बटाटे
घेवूनीया वाटे
लागे भैया
पायात स्लिपर्स डोईस कमचा
खपाट गालांचा
हडकुळा
दूर त्याचे घर बायको नि पोर
आला लांबवर
पोटासाठी
सदा मुखी हासू सदा बोले साब
ठेवूनिया आब
माल विके
लाघवी बोलणे व्यवहारी जिणे
नच घाबरणे
कधी कष्टा
तया न आळस घड्याळी दिवस
टपरी भुकेस
चालतसे
एकेक रुपया मोलाचा कमवी
गावाला पाठवी
नियमित
सरस तेलाची खिचडी रोजची
खावून पोटाची
भागे वेळ
अन रात्र होता कुठे ओट्यावर
विडी फेके धूर
अंधारात
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अचूक निरीक्षण, मांडणीही
अचूक निरीक्षण, मांडणीही सुंदर
( प्रद्युम्नजींची आठवण झाली या कवितेने )
मस्त. विशेषतः मांडणी (फॉर्म?)
मस्त. विशेषतः मांडणी (फॉर्म?) आवडली!
भैयाचा अभंग आवडला.
भैयाचा अभंग आवडला.
अचूक निरीक्षण, मांडणीही सुंदर
अचूक निरीक्षण, मांडणीही सुंदर >>>> +१००...
मांडणी सुरेख !! वेदना पोचतेय
मांडणी सुरेख !!
वेदना पोचतेय !
धन्यवाद
धन्यवाद विस्मयाजी,फारएण्ड,स्वातीजी,शशांक,जयश्रीजी .
अन रात्र होता कुठे
अन रात्र होता कुठे ओट्यावर
विडी फेके धूर
अंधारात...
अप्रतिम …
अशा निरिक्षणासाठी 'माणूस'
अशा निरिक्षणासाठी 'माणूस' समजून घ्यायची ओढ, जाणीव आणि कुवत लागते.
कुठलाही आव, अभिनिवेष नसलेली ही सुंदर रचना खूप आवडली!!
विक्रान्त जी,छान...खरच
विक्रान्त जी,छान...खरच छान...!!...भय्या ही असामी काय आहे ते दाखविलेत...भय्याला नावे थेवने सोपे पन भय्या बनने कथिन...!!!
छान व्यक्तिचित्रण.
छान व्यक्तिचित्रण.
पुलस्ती,रोहित्,उल्हास अनेक
पुलस्ती,रोहित्,उल्हास अनेक धन्यवाद .
आवडली
आवडली
छान लिहिलीय कविता.
छान लिहिलीय कविता.
आवडली
आवडली
जाई.भारतीताई,अश्विनीजी खूप
जाई.भारतीताई,अश्विनीजी खूप खूप धन्यवाद .