नायलॉन खमण.

Submitted by सुलेखा on 23 March, 2013 - 08:11
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप बेसन.
२ टेबलस्पून रवा.
१ टेबलस्पून साखर.
[गोड स्वाद न आवडणार्‍यांनी वगळली तरी चालेल]
१ टेबलस्पून तेल,
२/३ हिरव्या मिरच्या व १ इंच आले बारीक चिरुन ,पाव कप पाण्यात मिक्सरमधे बारीक वाटुन एका गाळण्यातुन गाळुन ते पाणी.उरलेला चोथा टाकुन द्यायचा.
१/२ टी स्पून सायट्रीक अ‍ॅसिड किंवा १ /२ लिंबाचा रस.
१ टी स्पून मीठ,[चवीनुसार]
१/२ टी स्पून हळद,
३/४ कप पाणी,
२ टी स्पून/१ सॅशे इनो फ्रुट सॉल्ट.
फोडणीसाठी :--
१ १/२ टेबलस्पून तेल,[यातलेच थोडेसे तेल थाळीला आतुन लावायला व १ टीस्पून [फोडणी] मिरच्यांसाठी घ्यायचे आहे.
प्रत्येकी १ टी स्पून मोहोरी-जिरे-तीळ,
१/२ टीस्पून हिंग,
४-५ कढीपत्ता पाने .
बारीक चिरलेली कोथिंबीर.
अर्धा कप पाणी.
मिरच्या :--
कमी तिखट अशा पोपटी ,लांब मिरच्या,
चवीपुरते मीठ.

क्रमवार पाककृती: 

एका मोठ्या पसरट बाऊल मध्ये बेसन,रवा,मीठ,साखर,हळद,तेल,आले-मिरचीच्या वाटणाचे गाळलेले पाणी ,सायट्रीक अ‍ॅसिड व ३/४ कप पाणी एकत्र करुन चमच्याने एकाच दिशेने खूप फेटा.मिश्रण पांढरट रंगाचे थोडेसे लेसदार [चिकट] व हलके झालेले दिसेल.
कूकरमधे थोडे पाणी व एक लहान रिंग ठेवुन गॅसवर गरम करायला ठेवा.
एका लहान थाळीला तेलाचा हात लावुन ठेवा.
खमण मिश्रणात इनो घालुन चमच्याने पुन्हा एकदा हे मिश्रण छान फेटा.मिश्रणाचे आकारमान वाढुन हलके झालेले जाणवेल्.लगेचच हे मिश्रण तेल लावलेल्या ठाळीत ओता्.व थाळी कूकर्मधील रिंगवर ठेवा.कूकरच्या झाकणाला रिंग व शीटी न लावता झाकण तसेच कूकर वर झाकुन ठेवा.गॅस मध्यम आचेवर ठेवा.१५ मिनिटे वाफवल्यावर कूकरचे झाकण काढुन थाळीत मध्यावर एक सुरी उभी खोवुन लगेच बाहेर काढुन पहा.सुरीला मिश्रण चिकटलेले नसेल तर खमण छान वाफवला गेला आहे.आता थाळी कूकर्बाहेर काढुन ठेवा.
111111111_0.JPG
५ मिनिटांनी सुरीने थाळीतल्या तयार खमणला चौकोनी वड्यांचा आकार कापा.
फोडणी:--
लहानशा फोडणीच्या कढईत तेल ताप्वुन त्यात मोहोरी-जिरे-हिंग घाला गॅस बंद करा.आता त्यात तीळ्,कढीपत्याची पाने हाताने तुकडे करुन टाका्.-१ चमचा फोडणी बाजुला ठेवुन बाकीची फोडणी अर्धा कप पाण्यात ओता .चमच्याने पाणी ढवळा..
हे पाणी थाळीतल्या चौकोनी आकाराच्या वड्या कापलेल्या खमणवर ओता.खमण गरम असल्याने सर्व पाणी त्यात शोषले जावुन खमण अलवार होईल.अतिशय हलका,छान फुगलेला व हलका असा नायलॉन खमण तयार आहे.
22222222222.JPG
मिरच्या:---
एका पातेलीत थोडे पाणी घेवुन गॅसवर गरम करा.उकळले कि त्यात मिरच्या टाका.५ मिनिटे झाकण ठेवुन उकळवा.मिरच्यांचा मूळ हिरवा रंग कमी होवुन फिक्कट पिवळा झालेला दिसेल.आता या मिरच्या गाळण्यावर गाळुन घ्या.त्यातील पाणी टिपले कि त्यात थोडेसे मीठ व फोडणीतुन वगळलेले तेल घाला. चमच्याने हलवुन घ्या.
प्लेट मधे तयार नायलॉन खमण त्यावर कोथिंबीर व मिरची ,चवीसाठी टोमॅटो सॉस घ्या.वरुन बारीक शेव घालुन लज्जत वाढवता येईल.

अधिक टिपा: 

बाऊल मधे कालवलेले व फेटुन तयार झालेले मिश्रण सहज ओतण्याच्या स्वरुपाचे असावे.मिश्रण घट्टसर असले तर फुगणार नाही.त्यामुळे फेटुन झाल्यावर कन्सिस्टन्सी पहावी.वाटल्यास १-१ चमचाभर पाणी घालावे.
बाऊल मधील मिश्रणात घातलेल्या तेलामुळे खमण मऊसर होते व खाताना घशात तोठरा बसत नाही.
वरुन घातलेल्या पाणीमिश्रीत फोडणीमुळे खमण अलवार्,ओलसर्,मऊ रहातो .
मिरच्या गरम पाण्यात उकळवल्यावर गाळलेले मिरचीच्या स्वादाचे तिखट पाणी बेसन कालवण्यासाठी घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
मारु रंग रंगिलु गुजरात.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
होय, अशा बिनातिखटाच्या मिरच्या ,वरुन हिरवीगार कोथिंबीर, बारीक शेव,डाळींबाचे दाणे,खोवलेले पाढरेशुभ्र खोबरे असे सजवुन खायचे असते.हे जिन्नस उपलब्ध नसल्याने फक्त कल्पना केली.

माझी सेम कृती आहे ढोकळा करण्याची. फक्त मी रवा नाही घातलाय कधी. ह्याला नायलॉन ढोकळा म्हणतात हे माहित नव्हतं Happy

रवा कश्यासाठी घालतात?

मी नेहमी गिट्सचा खमण ढोकळा करते. आता हा असा करुन पाहीन. ढोकळा, खमण ढोकळा, नायलॉन
ढोकळा यातला फरक कुणी सांगाल का?

मस्त रेसिपी, तोंपासु फोटो Happy

ढोकळा हा प्रकार फार फार आवडतो... त्यामुळे नक्की करुन बघणार Happy

मला ढोकळ्यावरोबर चिंचेची चटणी पण आवडते....किंवा ढोकळा चाट... उरलेल्या चुर्‍याचा... यम्मी Happy

भारी आहे. फोटो, कृती सगळेच.
यानंतर अमीरी खमण आलेच पाहिजे.
सुलेखा, माझे समज बरोबर आहेत का सांगा : ढोकळा : तांदूळ + उडीद डाळ फर्मेंट करून, खमण ढोकळा : बेसन फर्मेंट करून, नायलॉन खमण : बेसनापासून इन्स्टंट , ढोकळ्यापेक्षा हलका; अमीरी खमण = फसलेल्या ढोकळ्याला केलेला मेकप.

सही. नक्की करुन बघणार.
अजून न जमलेल्या पदार्थांच्या यादीमध्ये खमणचा नंबर वर लागतो. तरी ही रेसिपी बघून जमेलस वाटतय.

मी कायम गिट्सचं पॅकेट आणून करते. आता या रेसिपीने एकदा करून बघेन. कृतीच्या पहिल्या स्टेपमधे एकाच दिशेने फेटायला सांगितले आहे ते हँड ब्लेंडरने केल्यास काही गडबड होईल का?

मस्त मऊ लुसलुशीत दिसतो आहे ढोकळा. माझा भयंकर आवडीचा पदार्थ आहे. मी नक्की करून बघणार.

हळद घातली आहे तरी असा ऑफव्हाईट-पांढरा दिसतो का हा ढोकळा?

आमिरी खमणनंतर खाटा ढोकळ्याचं बिनचूक प्रमाण आणि कृती हवी आहे.

सही रेसिपी आहे.

मंजुडिच्या नंतर माझीपण एक फर्माईश..... या ढोकळ्याबरोबर मिळणारी कच्च्या पपईची चटणी! Happy

मंजुडिच्या नंतर माझीपण एक फर्माईश..... या ढोकळ्याबरोबर मिळणारी कच्च्या पपईची चटणी! >>+++१११

मी करते TALOD या कपंनीचा मस्त होतो ..

मंजुडी,स्वाती,सृष्टी--फरमाईश पूर्ण करण्यात येईल.
मंजुडी -मी घेतलेलेच प्रमाण [घरगुती वाटी/चमचा-ग्रॅम मधे नाही] देईन.म्हणजे करायला सोपे जाईल.
तसा खूप पांढरा दिसत नाहीये हा ढोकळा.फोटो काढताना लावलेल्या दिव्याच्या प्रकाशामुळे तसा दिसतोय.हळद जास्त झाली तर खूपच जास्त पिवळा दिसतो.दुकानवाले खायचा पिवळा रंग वापरतात.

काय दिसतोय ढोकळा! नायलॉन ढोकळा हे नाव मी प्रथमच ऐकलं.
जमेल का मला हे?! (विचारात पडलेली बाहुली)

सुलेखा,छान रेसिपी आहे.मी करुन बघितला पण माझा लालसर झाला.हळद आणो सोड्याची रिअ‍ॅक्शन झाली.तुमचा मात्र पिवळा दिसत आहे.

सही Happy

दुकानवाले खायचा पिवळा रंग वापरतात<<

हळद आणि बेकिंग सोडा वापरल्यानेच लालसर झाला.त्यासाठीच मी इनो वापरते<<<

दुकानदार इनो तर नक्कीच वापरत नसतिल मग ते हळद अजिब्बातच नाही घालत का? फक्त पिवळा रंग??? Uhoh

लाजो,दुकानदार पिवळा रंग -जिलबीचा मिळतो तसा केशरी आणि पिवळा रंग ,यापैकी पिवळा रंग वापरतात्.तसेच माझ्या माहितीप्रमाणे खाण्याचा सोडा वापरण्या ऐवजी , पापडखार /सोजी [सोज्जी असे ही म्हणतात] के फुल वापरतात. बाजारचा कोणताही ढोकळा-पांढरा/पिवळा/मिक्स खाल्ला तरी घशाला तोठरा बसत नाही .गाठीया,जाड शेव ,शेव ,पापडी इत्यादी फरसाण प्रकार खस्ता,खुसखुशीत लागतात .त्यात पापडखार च वापरतात.एक तर तो स्वस्तही असतो.रिझल्ट छान मिळतो.[हे मला बडोद्याला एका फरसाण वाल्याने सांगितले.]कधी कधी पापड तळले कि तळणीतल्या तेलाला खूप फेस येतो कि कढईच भरुन जाते. आणि कधी कधी पापड खाताना घशाला पापडखार लागतोही.पापड जुन झाल्याने व कधी पापडखार अपेक्षेपेक्षा जास्त घातला गेल्याने असे होते.
गुजरातींमधे सोज्जी के फुल नेहमीच वापरतात.माझी एक मैत्रीण मकी-पिठाचा ढोकळा करताना नेहमी सोज्जी के फुल/पापडखारच वापरते.अर्धा किलो पिठाला १ १/२ सपाट चमचा हे तिचे प्रमाण आहे.पिठात ती मीठ ,थोडे जिरे,मिरची पेस्ट टाकते--जैन आहे.बशी सारख्या प्लेट मधे वाफवते.त्या सोबत सांभार सारखी स्पेशल-वेगळी/जैन दाल बनवते. हा प्रकार ही खायला खूप आवडला कारण एकच ढोकळा खाल्ला कि बा$$$$स्स.!!!!!!!!!

Pages