निसर्गाच्या गप्पा (भाग-१३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 12:06

निसर्गाच्या गप्पांच्या १३ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

५ डिसेंबर २०१० ला निसर्गाच्या गप्पा हा धागा निसर्गविषयक बाबींची आवड, आकर्षण असणार्‍या निसर्गप्रेमींनी आपले अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने उघडला. बघता बघता निसर्गाच्या गप्पा ह्या धाग्याचे १२ भाग पूर्ण झाले. सगळ्या ऋतूंमधून हा धागा न्हाऊन जात आहे. धाग सुरू करताना अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद ह्या धाग्याला मिळेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या धाग्यावरील प्रत्येकाला इथे शेअर केलेल्या अनुभवामुळे व त्याला मिळत असलेल्या निसर्गमय प्रतिसादांमुळे अजुनच निसर्गाशी जवळीक निर्माण झाली आहे.

निसर्गा बद्दल माहीती देण्यात कोणी सिंहाचा वाटा उचलला आहे तर अगदी एका ओळीत माहीती देऊन, फोटो शेअर करुन सगळ्याच निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल आपला आदर, आपल प्रेम, व्यक्त केला आहे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच दिवसांनी आले इथे. नेहेमी वाचायचं पेंडींग रहातं ते वाचून होईपर्यंत पुढे जातो धागा.

सगळे फोटो मस्त.
मामी, स्वीस एकदम सही.

खराटा पुराणात एक गोष्टं - त्याची टोके वळवळीत असली की सुकलेल्या पानांचा उडालेला कचरा झाडायला सोपे पडते. शिवाय शेणाने सारवलेली जमिन उखडली जात नाही. टोके एकसारखी केली की जोर लावावा लागतो त्याने शेणजमिन उखडली जाते.
आणि टोकं सारखी केल्याने झाडूची उंची कमी झाली की वाकून कचरा काढावा लागतो हा एक त्रास Wink

असो. एक माहीती हवी होती.

मला कॉटेज गार्डन सारखे फुलांचे गार्डन ( आईच्या घरी) करायची इच्छा आहे. त्यात फुलझाडे प्लॅन / आखणी न करता एकत्र लावली असतात आणि एका सिझन मधे सतत कुठली ना कुठली फुलं फुलत असतात. एखादा बागेचा कोपरा निवडून अशी लावणी व्यवस्थित केली तर कोपरा गच्च आणि फुललेला रहातो.

तर मला वेगवेगळ्या काळात फुलणार्‍या फुलांची नावे फुलणार्‍या सिझनसह हवीत. आणि मिळाले तर त्यांचे कांदे /बीयाही हव्यात. रोपं फार मोठी होणारी नकोत. प्लिज सुचवा.

मला सुचलेली

लिली
कर्दळ
पॅराकीट
कोरांटी - पिवळी , अबोली, जांभळी
झेंडू
सदाफुली,
गुलबक्षी
सोनटक्का , निशीगंध ( यात खरच साप येतात का? असल्यास नको )

अजुन एक. माझ्याकडे गुलाबी शंकासुर / शंकेश्वराच्या बीया आहेत. लगेच रुजतात कोणाला हव्या असल्यास सांगणे.

अर्रर्र.........आमचा लोकसत्ता बहुतेक नगर आवृत्ती आहे. कारण आज चतुरंग येतो. तो मी संपूर्ण वाचून काढते. आणि इथे वास्तुरंग वेगळ्याच वारी येतो की कायसं वाटतं.
गच्चीतल्या एडेनियमला मस्त शेंगा आल्यात. माळ्याने सांगितल्याप्रमाणे दोर्‍याने बांधल्या आहेत. नाहीतर आतल्या बीया,,,,,शेंगा फुटून उडून वाया जातात. आता मला एडेनियमच्या बीया मिळतील.

नि.ग.-१३ पान क्र. २२ वर मधु-मकरंदने उल्लेख केलेले झाड म्हणजे Baringtonia acutangula तर नाही? ह्याचीही फुले गुलाबी असतात आणि फुले ए़का लांब दांड्यावर येतात आणि कळ्या असताना किंवा फुले गळून गेल्यावर हे लांब दांडे पारंब्या किंवा लोंबत्या मुंडावळ्यांसारखे दिसतात. मला वाटते शरदिनीबाईंनी या झाडाचे नामकरण 'मुंडावळ्यांचे झाड' असे केलेले आहे. ह्याला कुठे कुठे नीवर म्हटलेलेही वाचले आहे. फाइव गार्डन्समधील झाड सध्या गुलाबी फुलांनी बहरले आहे.

वाचतेय वाचतेय्..सर्वकाही..
इथे धुआँधार पाऊस पडतोय...
उद्या नाही पडला तर इथल्या बोटॅनिकल गार्डन मधे जाणारे..
चायनीज नावं लिहून आणीन बापडी.. तुम्हा सर्वांना होमवर्क देईन भारतीय नावं सांगण्याची Proud

अजुन एक, या झाडाच ही नाव सांगा..
DSC0025.jpg
झाडाचं खोड पांढर होत आणि त्याची खाली पडलेली फळं साधारण पेवंदी बोराच्या आकाराची होती. ह्यांची माझी भेट नागपूरात झाली निवांतपणे Happy

पहिला तामण असावा असे फुलावरुन वाटतेय पण मी पाहिलेल्या तामणाचे कळे गुळगुळीत असतात अशे मोदकासारखे नसतात. पण lagerstromia याचे अनंत प्रकार असावेत बहुतेक. आणि हा त्यातला एक असावा.

दुसरा अर्थातच करंज. तिस-याची पाने पाहिलीत खुप झाडांमध्ये, पण खाली पडलेले हिरवे फळ पाहिले नाही आणि पांढरे खोडही पाहिले नाहीय.

पहिला तामण असावा असे फुलावरुन वाटतेय >>>> मला सुध्दा हेच वाटल म्हणुन तर इथे विचारलं. काही काही रोजच्या पाहाण्यातल्या झाडाची नाव माहिती नसतात तसं त्या करंजाचं झालं होत. अगदि शाळेपासुन पाहातेय पण याला करंज म्हणतात हे ठाऊक नव्हत.

तिसरे झाड भोकर असवे का? पण भोकराचे खोड पांढरे नसते शिवाय पिकलेली फळे किंचित गुलाबी असतात. काकडही आठवून गेले पण पाने वेगळी आहेत.

भोकर म्हणजे cordia dichotoma. गुजरातीत गुंडा. गुजराती लोकांमध्ये कच्च्या हिरव्या फळांचे लोणचे करतात. हे फळ आतून बुळबुळीत असते. पिकल्यावर बोरासारखे बुळबुळीत होते पण किंचित गोड लागते.

जागू, अभिनंदन.

आम्ही पण या तालिमखान्याला निळी कोरांटीच म्हणत असू. फुले वेचताना भरपूर काटे टोचवून घेतले आहेत लहानपणी !

चौदहवी का चाँद Happy

काल मला हा कोळी दिसला. बहुतेक सिग्नेचर स्पायडरच असावा पण गोव्यात जे दिसायचे त्यापेक्षा आकार वेगळा होता आणि सिग्नेचर पण वेगळीच दिसतेय. मला जंगलात पॅशनफ्रुटचा वेल दिसला त्याच्या फुलांचे फोटो काढायला गेलो तर हा दिसला. मला चावला असता तर माझा स्पायडर मॅन झाला असतात. फोटोवरून कल्पना येणार नाही पण त्याच्या "उजव्या हाताच्या" अंगठ्यापासून "डाव्या पायाच्या" अंगठ्यापर्यंतची लांबी, ८ सेमी तरी होतीच !

प्रदूषणमुक्त हवा आणि आसमंतातली गुलाबी धूळ यामूळे आमच्याकडे असे काहीसे दिसते आता !

वाळवंटात हि फुले खुप दिसतात. खरं तर देठ पाने काही दिसतच नाहीत थेट फुलेच दिसतात. यांचे नाव सुझन.
केनयात ती साधारण २ सेमी व्यासाची असत तर अंगोलात ५ सेमी व्यासाची दिसतात. हा रंग खुप मोहक दिसतो. या रंगाला मुली काहीतरी खास नावाने ओळखतात ना ?

नि.ग.-१३ पान क्र. २२ वर मधु-मकरंदने उल्लेख केलेले झाड म्हणजे Baringtonia acutangula तर नाही?

नाही, ते झाड गुलाबी टॅबेबुयाचे आहे.

हीरा, तुम्ही झाडांचे निरिक्षण केले असेल तर एक गोष्ट लक्षात येईल. प्रत्येक झाडाचा बांधा पण वेगवेगळा असतो. आता हे टॅबेबुयाचे झाड, त्यातले दोन रंग मुंबईत दिसतात. (अजुन काही रंग असतील तर मला माहित नाही) दोन्ही रंगातली झाडे उंच, शिडशिडीत आहेत. त्यातही पिवळ्या रंगाचे टॅबेबुया पाने पुर्णतः गाळुन मगच फुलावर येतात. गुलाबी रंगाचे झाड मात्र कधीकधी पाने पुर्णपणे झटकुन तर कधीकधी पुर्ण पर्णसंभार संभाळून वर फुलेही मिरवते. मधु-मकरंदने उल्लेखलेले झाड पाने आणि फुले दोन्हीही बाळगुन आहे. चेंबुर-ट्रोंम्बेला अणुशक्ती नगरचा जो बस डेपो आहे तिथे सेम असेच उंच भरगच्च गुलाबी टॅबेबुया आहे. त्याच्या खालीही या दिवसात असाच गुलाबी सडा पडलेला असतो. त्या झाडाला या दिवसात पाने कमी आणि फुले जास्त असतात.

तिवर/निवराचे झाड सुबक ठेंगणे गुटगुटीत असते. त्याचा बांधा आडवा असतो. Happy

बुचाचे झाडही नेहमीच उंच शिडशिडीत असते. कधीच सुबक ठेंगणे गुटगुटीत आडवे नसते.

वरचा चौदहवी का चाँद किती डागाळलेला आहे तो बघितलात ना ? चक्क वहिदा रेहमानचा अपमान कि.
पण काल एक नवल घडले. चक्क आमच्याकडे " चंद्रमे जे अलांच्छन" दिसला. खरं नाही वाटत ? हे बघा फोटो !


फसलात ? एप्रिल फूल केले.. तो चक्क " मार्तंड जे तापहीन " आहे.

स्निग्धा पानांवरून ती १००% शिवण आहे. कारण शिवणीच्या झाडाखालीही खेळण्यात माझे दिवस गेलेत.:स्मित:

सावली दिसली ग आता दिसली तुझी पोस्ट कशी गायब झाली होती कुणास ठाऊक ? Lol

सावली सोनटक्का आणि निशिगंध मध्ये मी अजून तरी साप आलेले पाहीले नाहीत. पण जाणकारांकडून माहीती मिळेलच.

मी काही फुलझाडे सुचवते.

अबोली - उन्हाळ्यात भरपुर फुलते.
सोनपंखी (ह्याला दुसरे नाव असते ते मी विसरले.) माझ्याकडे ही वर्षभर फुलते.
तेरडा - पावसाळ्यात फुलतो. घरच्या सुशोभीकरणासाठी डबलच्या तेरड्याचे बी विकत मिळते.
गुलाबाला कसे विसरलीस?
शेवंती -डिसेंबर मध्ये जास्त बहर असतो. हल्ली शेवंतीतही खुप रंग मिळतात.
डेलिया
सूर्यफुल
अष्टर
कागडा, नेवाळी, कुंद
जास्वंदी (कालांतराने मोठ्या होतात पण छाटत राहील्या तर मर्यादीत राहतात.
कवठी चाफा, अनंत, तगर - तगरीमध्ये दोन प्रकार असतात सिंगल आणि डबल ही झाडे मोठी होतात पण मोठ्या वृक्षांप्रमाणे नाही वाढत.
मोगरा, डबलचा मोगरा, मदनबाण, सायली, जूई, जाई, चमेली, मधूमालतीच्या वेली असतात जर वेली लावायच्या असतील तर.
हजारी मोगरा
ऑफिसटाईमही सुंदर दिसतात . खाली पसरतात म्हणून हँगींगच्या कुंड्यांनाही लावू शकतो. हे नेहमीच फुलतात.
एक्झोरा
ब्रह्मकमळ उर्फ निवडूंग
मे फ्लावर
झरबेरा ह्यातही खुप रंग असतात.
माझ्याकडील रातराणी खुप उंच म्हणजे अगदी तिने आमच्या टेरेसची उंची गाठली आहे म्हणून मी सुचवत नाही. पण कटींग केल्यास मर्यादीत राहील.
अ‍ॅडेनियम

अजुन आठवली की सांगते.

थँक्यु जागु.

ओक्के. अबोली, तेरडा, शेवंती, सूर्यफुलं, डेलिया, अष्टर मोगरा, ऑफिसटाईम, झरबेरा टाकते त्यात.
चाफा , तगर, अनंत, मोगरा, जाई, चमेली, मधूमालतीच्या वेली वगैरे झाडं वेगळी आहेत आधीच.
पण या कोपर्‍यात फक्त छोटी रोपे ठेवायचीत. गुलाबही जास्त काळजी घ्यावी लागते जरा.

वॉव तुझ्याकडे रातराणी इतकी उंच झालीये! सहीच. Happy

सुप्रभात Happy

सावली माझ्याकडे अबोलीच्या भरपूर झाडे आली आहेत. सध्या बोटभर उंचीची झालीत. मी झाडाला आलेल्या बियाच कुंडीत पसरून लावल्या पण (बहुतेक) पाण्याबरोबर सगळ्या एका जागीच रूजल्या. आता उन्हाळा गेल्यावर त्यातील एक एक झाड थोड्या थोड्या अंतरावर लावणार आहे. सध्या भरपूर फुलं आणि बिया आल्या आहेत अबोलीला. Happy

रच्याकने, अबोलीच्या वाळलेल्या बियांवर पाणी पडल्यावर मस्त तडतड आवाज येतो. Happy

रच्याकने, अबोलीच्या वाळलेल्या बियांवर पाणी पडल्यावर मस्त तडतड आवाज येतो. >>>>>> रविवारीच हा अनुभव घेतला. कुंडीत बी घातले, त्यवर थोडी माती घातली आणि पाणी घातल्याबरोबर बिया तडतड करत उडू लागल्या. जर काही बिया राहिल्या असतील तर त्या मातीत रूजतील, वाट पहात आहे.

नि.ग.-१३ पान क्र. २२ वर मधु-मकरंदने उल्लेख केलेले झाड >>>>>>>>>>>>> हे झाड बरेच जुने आहे. सध्या ६ मजली ईमरती एवढे उंच झाले आहे. जमिनी पासून १०-१२ फुटांच्यावर विस्तार वाढलेला आहे. पण म्हणजे वडासारखे विस्तिर्ण नाही. फोटो काढायचा / मिळवायचा प्रयत्न करीत आहे. मिळाला की टाकीनच.

maajhya kundit ek vel aali aahe..jhambali fula yeta aahet. kasali kalat nahi

हुर्रे~~~~~~~~~ ! माझ्या कडीपत्त्याला नवी फांदी येवू लागली आहे.
Kadhipatta 1.jpgKadhipatta 2.jpg

Happy

प्रज्ञा...... काँग्रॅट्स Happy

आता जिप्स्याकडे अबोली लागल्यावर जाणे कुणाला गजरे मिळणारेत!!!!!!

Pages