चिंचोली मोराची .. एक अतिशय छान निखळ आनंद... अगदी निसर्गाच्या सानिध्यात

Submitted by सुहास्य on 19 March, 2013 - 06:18

चिंचोली मोराची .. एक अतिशय छान निखळ आनंद... अगदी निसर्गाच्या सानिध्यात
पुण्या पासून ५०- ५२ कि मी वर नगर रोड वर चिंचोली गाव आहे . तिथे मोर आहेत . म्हणून गावाला चिंचोली मोराची असे म्हणतात. श्री जनार्दन थोपटे यांनी अतिशय उत्तम रीतीने आणि शिस्त बद्ध रीतीने हा पर्यटनाचा उपक्रम राबवला आहे ...संपूर्ण थोपटे कुटुंबीय हा उपक्रम चालवतात . निट नेटके, अतिशय स्वच्छ , निर्मळ, असे ठिकाण आहे . खर तर हे श्री जनार्दन थोपटे यांचे घर आहे. आपल्या घरी पाहुणे आल्यासारखे हे आपली खातिरदारी करतात . गेल्या गेल्या मस्त गार गार सरबत, ते पण माठातील पाण्याचे . मग मस्त पैकी भाकरी , पिठले, वांग्याची भाजी, मिरचीचा ठेचा असा फर्मास जेवणाचा बेत. त्या आधी मस्त शेतात फेरफटका . मग झाडाखाली खाटेवर निवांत डुलकी. संध्याकाळी बैलगाडीची चक्कर. मग एकदम शांत बसायचे कारण मोर यायची वेळ झाली.... पण इतर कॉलेज मधील मुले आली होती. ते जरा गडबड करत होती तर मोर बिचारे घाबरून जवळ आलेच नाहीत .असो. आम्ही रांजणगाव च्या गणपतीचे दर्शन घेतले आणि रात्री परत चुलीवरच्या जेवणावर ताव मारला.
1.jpg श्री जनार्दन थोपटे
.
3.jpg आमराई
9.jpgमेघ आणि आजी सगळेच खुश
2.jpg10.jpg5_0.jpg फर्मास बेत
6.jpg बैलगाडी ची सफर

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठलो . आणि आवाज न करता मोराची वाट पहात होतो . पहातो तर काय . मोर अगदी घराच्या जवळ आले होते . फ़ोटो काढायची खूप खूप इच्छा असून पण मन जरा आवरते घ्यावे लागले नाही तर मोर पळुन गेले असते. जमतील तेवढे आवाज न करता काढता आले त्यातच समाधान .
7.jpgहळूच टिपलेले मोराचे फ़ोटो
8.jpg हळूच टिपलेले मोराचे फ़ोटो
4.jpg

खरे मोर पाहण्याचे समाधान काही औरच आहे. आणि ते हि अगदी आपल्या जवळ. मोर लांडोर सगळ कुटुंब अगदी डौलात चालत येते , कानोसा घेते कि कुणी नाही ना आजूबाजूला ...कुणाची भीती नाही ना .. आणी मग मस्त दाणा पाणी वर ताव मारून तसेच पसार होतात .... अतिशय नयनरम्य नजारा ... अतिशय सुखावलो ... मग मस्त गरमा गरम पोहे खाउन थोपटे चा निरोप घेतला आणि मग लेण्याद्री ला गेलो , मस्त द्राक्षे घेतली , आणि ओझर च्या गणपती चे दर्शन घेतले आणी पुण्या ला परत आलो ....
अधिक माहिती साठी इथे भेट द्या
http://www.chincholimorachi.com/

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा --- अहो हो पण मि म्हटल्या प्रमाणे जवळ गेले , किवा माणसाची चाहुल लागली तरी मोर पळुन जात होते. आदल्या दिवशी असेच झाले ना . असो ..जाउनच या म्हणजे खरच नेत्र सुख मिळेल .....

छान Happy