सावरावे जरा

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 March, 2013 - 23:25

वेदनेने नवे रुप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा

गुंतले फार मी, पार नादावले
आवरूनी मना, सावरावे जरा

बंडखोरी नको भावनांची सदा
चेहर्‍याने लपविणे शिकावे जरा

आणभाका स्मरूनी गुलाबी जुन्या
आठवांनी पुन्हा मोहरावे जरा

हात सोडूनिया दूर झालो जिथे
पावलांनी तिथे अडखळावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर, योगुली, अवल, बागेश्री, राजीव, विस्मया........ मनापासून धन्यवाद Happy
गायनानुकुल...... ह्म्म..... Happy

मुग्धमानसी, टुनटुन, मुक्तेश्वर, प्राजु, भारती, सत्यजीत....... बहोत बहोत शुक्रिया Happy

छान....छानच

काही मिसरे खूप सुंदर आहेत....जसे

सोसणे मोरपंखी दिसावे जरा

पावलांनी तिथे अडखळावे जरा

व्व्वा जयू ... सहजसुंदर !!! जियो !

वेदनेने नवे रुप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा-------- क्या बात है ..

वैभव, पुलस्ति, गिरीश, सहेली..... खूप खूप धन्यवाद Happy
गिरीश.... अरे आहेस कुठे??

सर्वच शेर अप्रतिम.

हात सोडूनिया दूर झालो जिथे
पावलांनी तिथे अडखळावे जरा

क्या बात. व्वा! Happy

Pages