वेदनांना भाव कोठे ?

Submitted by राजीव मासरूळकर on 14 March, 2013 - 11:46

भावनांचा गाव कोठे ?
वेदनांना भाव कोठे ?

रक्त होई जेथ अमृत
तो हवासा घाव कोठे ?

वादळा तू थांब थोडा,
मांडला मी डाव कोठे !

का नवे घोडे दिशाहिन
वाट कोठे ? धाव कोठे ?

मन तुझे माझे नभासम
शोधतो मी, ठाव कोठे ?

हौस जगण्याची न कोणा,
अन् भरीला हाव कोठे !

ईश्वरा का निर्मिले तू
चोर कोठे, साव कोठे ?

बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?

पावसा, शोधून जा तू,
आसवी वर्षाव कोठे ?

धडधडुन थकले हृदय तर
थांबण्याला वाव कोठे ?

वाग तू 'राजीव' वाकुन
बुडबुडा तू ! राव कोठे ?

-राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा
दि १४.३.२०१३
सायं. ६.०० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गडबडीत मी वेदांना भाव कुठे वाचुन बुचकळ्यात पडले होते. असो. कवितेतलं काहीच कळत नै त्यामुळे पास.

भावनांचा गाव कोठे ?
वेदनांना भाव कोठे ?
.
रक्त होई जेथ अमृत
तो हवासा घाव कोठे ?
.
वादळा तू थांब थोडा,
मांडला मी डाव कोठे !
.
बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?

बढिया शेर! Happy

का नवे घोडे दिशाहिन
वाट कोठे ? धाव कोठे ?

बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?

अप्रतिम व प्रामाणिक शेर!

घोड्यांच्या टापांना आवाज आहे पण दिशा नाही.........अशी कुण्या कवीच्या कवितेची आठवण झाली!