Submitted by राजीव मासरूळकर on 14 March, 2013 - 11:46
भावनांचा गाव कोठे ?
वेदनांना भाव कोठे ?
रक्त होई जेथ अमृत
तो हवासा घाव कोठे ?
वादळा तू थांब थोडा,
मांडला मी डाव कोठे !
का नवे घोडे दिशाहिन
वाट कोठे ? धाव कोठे ?
मन तुझे माझे नभासम
शोधतो मी, ठाव कोठे ?
हौस जगण्याची न कोणा,
अन् भरीला हाव कोठे !
ईश्वरा का निर्मिले तू
चोर कोठे, साव कोठे ?
बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?
पावसा, शोधून जा तू,
आसवी वर्षाव कोठे ?
धडधडुन थकले हृदय तर
थांबण्याला वाव कोठे ?
वाग तू 'राजीव' वाकुन
बुडबुडा तू ! राव कोठे ?
-राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा
दि १४.३.२०१३
सायं. ६.०० वाजता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच... आवडली ..
मस्तच...
आवडली ..
बोलतो मी खूप सुंदर पण तसा
बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?
सुविचाराप्रमाणे वाटला. शेर आवडला.
शिवम् पिंपळे , समीर चव्हाण
शिवम् पिंपळे ,
समीर चव्हाण ,
आपले हार्दिक आभार !
बोलतो मी खूप सुंदर पण तसा
बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?<<< छान शेर
छान, आवडली........
छान, आवडली........
बेफिकीरजी , योगुली , हार्दिक
बेफिकीरजी ,
योगुली ,
हार्दिक आभार !
अनेक शेर मस्त जमलेत. पु.ले.शु
अनेक शेर मस्त जमलेत.
पु.ले.शु
वादळा आणि बोलतो मी हे शेर
वादळा आणि बोलतो मी हे शेर छान.
शामजी आणि विदिपा , आपले
शामजी आणि विदिपा ,
आपले हार्दिक आभार !
सुन्दर ,आवड्ली.
सुन्दर ,आवड्ली.
गडबडीत मी वेदांना भाव कुठे
गडबडीत मी वेदांना भाव कुठे वाचुन बुचकळ्यात पडले होते. असो. कवितेतलं काहीच कळत नै त्यामुळे पास.
विक्रांतजी, शिल्पा बडवे, आपले
विक्रांतजी,
शिल्पा बडवे,
आपले हार्दिक आभार !
भावनांचा गाव कोठे ? वेदनांना
भावनांचा गाव कोठे ?
वेदनांना भाव कोठे ?
.
रक्त होई जेथ अमृत
तो हवासा घाव कोठे ?
.
वादळा तू थांब थोडा,
मांडला मी डाव कोठे !
.
बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?
बढिया शेर!
मुटे सर , मनःपूर्वक आभार !
मुटे सर ,
मनःपूर्वक आभार !
सगळे शेर छान जमून आलेत. सुंदर
सगळे शेर छान जमून आलेत. सुंदर
अमेयजी , खूप खूप धन्यवाद !
अमेयजी ,
खूप खूप धन्यवाद !
गझल सुंदर जमलीय.
गझल सुंदर जमलीय.
भारतीताई , खूप खूप धन्यवाद !
भारतीताई ,
खूप खूप धन्यवाद !
का नवे घोडे दिशाहिन वाट कोठे
का नवे घोडे दिशाहिन
वाट कोठे ? धाव कोठे ?
बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?
अप्रतिम व प्रामाणिक शेर!
घोड्यांच्या टापांना आवाज आहे पण दिशा नाही.........अशी कुण्या कवीच्या कवितेची आठवण झाली!
गझलप्रेमी सर, मनःपूर्वक आभार
गझलप्रेमी सर,
मनःपूर्वक आभार !
का नवे घोडे दिशाहिन वाट कोठे
का नवे घोडे दिशाहिन
वाट कोठे ? धाव कोठे ?
मन तुझे माझे नभासम
शोधतो मी, ठाव कोठे ? >>>> हे २ सर्वात आवडले.
छान
छान
भिडे सर , जाई , मनःपूर्वक
भिडे सर ,
जाई ,
मनःपूर्वक धन्यवाद .
बोलतो मी खूप सुंदर पण तसा
बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?
आवडला..
गझल मस्त...
बोलतो मी खूप सुंदर पण तसा
बोलतो मी खूप सुंदर
पण तसा वर्ताव कोठे ?
>> आवडला..
गझल आवडली !
गझल आवडली !
वैभव फाटक सर , आनंदयात्री
वैभव फाटक सर ,
आनंदयात्री ,
मुक्तेश्वर कुळकर्णी ,
आपले हार्दिक आभार !
वैभव फाटक सर , आनंदयात्री
वैभव फाटक सर ,
आनंदयात्री ,
मुक्तेश्वर कुळकर्णी ,
आपले हार्दिक आभार !