कदाचित

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 13 March, 2013 - 03:42

सुखासीन आयुष्य अळणी कदाचित
चवीला व्यथाही जरूरी कदाचित

म्हणावे तशी ती न जगली कधीही
जराही असोशी नसावी कदाचित

पुन्हा चंद्र, तारे झगडले निशेशी
पुन्हा अवस येण्याचि नांदी कदाचित

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

जरा लांबलेलीच ती रात्र होती
दिशाहीन झाली असावी कदाचित

नको आणखी कोणताही उतारा
नशा वेदनांची पुरेशी कदाचित

उभा जन्म गेला करूनी गुलामी
हिशेबात अजुनी उधारी कदाचित

पिते ताक फुंकून फुंकून अजुनी
कुणी पोळलेली असावी कदाचित

सुखालाच केले म्हणे जायबंदी
बरळणे असावे खरेही कदाचित

जयश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुखासीन आयुष्य अळणी कदाचित
चवीला व्यथाही जरूरी कदाचित>>>>> खास.... बाकीही द्विपदी आवडल्या.

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

शेर आवडला. दुसरी ओळ अधिक सहज वाटली.

सुखासीन आयुष्य अळणी कदाचित
चवीला व्यथाही जरूरी कदाचित

म्हणावे तशी ती न जगली कधीही
जराही असोशी नसावी कदाचित

हे जोरदार ! गझल छानच.

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

नको आणखी कोणताही उतारा
नशा वेदनांची पुरेशी कदाचित

वाह !
मतलाही आवडला .

नको आणखी कोणताही उतारा
नशा वेदनांची पुरेशी कदाचित

उभा जन्म गेला करूनी गुलामी
हिशेबात अजुनी उधारी कदाचित >>
हे फारच भिडले..

मला गझल आवडली. तुमच्या इतर गझलांपेक्षा वेगळीच वाटली.

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

उभा जन्म गेला करूनी गुलामी
हिशेबात अजुनी उधारी कदाचित

पिते ताक फुंकून फुंकून अजुनी
कुणी पोळलेली असावी कदाचित

<<< शेर आवडले. फुंकून फुंकून हे दोनदा उच्चारताना मजा आली.

सुखासीन आयुष्य अळणी कदाचित
चवीला व्यथाही जरूरी कदाचित

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

सुखालाच केले म्हणे जायबंदी
बरळणे असावे खरेही कदाचित

व्वा , मस्त गझल

गझल आवडली.
नांदीचा शेर अप्रतिम जमला आहे.

गुलामी, नशा - उतारा हे शेरदेखील आठवणीत राहतील.

सुखासीन आयुष्य अळणी कदाचित
चवीला व्यथाही जरूरी कदाचित
.
जरा लांबलेलीच ती रात्र होती
दिशाहीन झाली असावी कदाचित
.
नको आणखी कोणताही उतारा
नशा वेदनांची पुरेशी कदाचित
.
उभा जन्म गेला करूनी गुलामी
हिशेबात अजुनी उधारी कदाचित
.
सुखालाच केले म्हणे जायबंदी
बरळणे असावे खरेही कदाचित

क्या बात! बम्बाड आवडलेत. Happy

श्यामली, बेफिकीर, जो, विस्मया, गंगाधरजी ....... मनापासून धन्यवाद Happy
बम्बाड......... अगदी आपल्या विदर्भाची आठवण आली Happy

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित << व्वा ! >>

जरा लांबलेलीच ती रात्र होती
दिशाहीन झाली असावी कदाचित << सुंदर >>

नको आणखी कोणताही उतारा
नशा वेदनांची पुरेशी कदाचित << मस्त >>

उभा जन्म गेला करूनी गुलामी
हिशेबात अजुनी उधारी कदाचित << वा ! >>

खयाल फार छान आहेत...

चांगली गझल..

अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी
तुझी भेट झाली असावी कदाचित

जरा लांबलेलीच ती रात्र होती
दिशाहीन झाली असावी कदाचित

अप्रतिम शेर!