स्त्री मेंदू व पुरूष मेंदू

Submitted by सोनू. on 12 March, 2013 - 16:20

आताच महिला दिनानिमित्त 'घर दोघांचे' वर आपण अनेक प्रतिक्रिया वाचल्या. पसरवणारे नी आवरणारे असे वर्गीकरण कसे झाले, कामांचे वाटप फार पूर्वीपासून असे का आहे, हल्ली काही वर्षांत यात होत चाललेले बदल आधीपासूनच का नाही झाले असे बरेच प्रश्न पडले होते. त्याचवेळी एक पुस्तक वाचनात आले - Why men don't listen and women can't read maps. लेखक Allan and Barbara Pease यांनी लिहीलेले हे पुस्तक मजा म्हणून वाचायला चांगले वाटले.

कृपया लक्षात असूद्या की इथे मी माझी मते किंवा मला पटणारी मते देत नसून लेखकद्वयींची मते देत आहे.

लेखकांनी यात ' शास्त्रीय ' म्हणून माहिती दिली आहे. सगळ्याच गोष्टी खर्या असतील व पटतील असे नाही पण मनोरंजक नक्कीच आहेत. मानवी मेंदूची झालेली उत्क्रांती त्यांनी सांगितलीय. इतर प्राण्यांतही तशाच प्रकारे ती झालीय फक्तं प्रगती कमी. म्हणजे स्त्री व पुरूष यांच्या मेंदूंची वेगवेगळी उत्क्रांती झालीय. त्यासाठी त्यांनी मेंदूंचे स्कॅनस्, एकच गोष्टं करताना दोन्ही प्रकारच्या मेंदूंमध्ये उद्दिपित होत असलेले वेगवेगळे भाग, विद्यापीठांमधिल अभ्यास असे बरेच काही दिले आहे.

पक्षांमधे एक जोडीदार अंडी उबवण्याचे काम करतो तर दुसरा त्यावेळेत अन्न शोधून आणून जोडीदाराचे पोषण करतो. इथे मादीनेच घरट्यात बसले पाहीजे असे नाही कारण एकदा अंडी घालून झाली की कोण उबवतंय हे सर्वच पक्षांमधे महत्वाचे नसते. सस्तन प्राण्यांमधे मात्र माता बाळाचे पोषण करत असल्याने तिला बाळाजवळ थांबावेच लागे तसेच त्यापुर्वीही गरोदरपणाचा काही काळ विश्रांती घ्यावी लागे (बरेचदा). त्यामुळे मादीने गुहेत रहायचे व नराने अन्न मिळवायचे ही वाटणी किमान त्याकाळापुरती तरी झाली. मनुष्य प्राण्यातही तेच झाले. पूर्वी एक स्त्री अनेक मुलांना जन्म देत असल्याने बराच काळ स्त्री एका ठिकाणी सुरक्षित व पुरूष अन्नाच्या शोधार्थ बाहेर अशी वाटणी झाली. कित्येक हजारो वर्षे हे होत राहिले व त्या त्या कामासाठी पूरक बदल मेंदूतही होत गेले.

पुरूषांना शिकारीसाठी एका ठिकाणी शांत बसून शिकारीची वाट पहायला लागायची तर त्यांची दृष्टी, एकाग्रता, आवाज ओळखायची तसेच आवाज काढायची शक्ती, दूरवरून आपल्या घरी परत येण्यासाठी जागा लक्षात ठेवणे, मनातल्या मनात नकाशे बनवणे इत्यादिंसाठी पूरक बदल झाले. स्त्रीया घरात लहान मुले व वृद्ध यांच्या बरोबर राहत असल्याने भरपूर बोलणे, हालचालींमधील बदल टिपणे, अव्यक्त संकेत समजणे, माया करणे, आपले वास्तव्याचे ठिकाण नीटनेटके ठेवणे इत्यादिंसाठी त्यांच्या मेंदूत बदल घडले.

लेखकांच्या म्हणण्यानुसार, हजारो वर्षांनंतरही हे आताच्या स्त्री-पुरूषांमधे दिसून येते. हे सामान्यीकरण आहे. सगळ्यांच्या बाबतीत असेच दिसेल असे नाही परंतु बर्याच प्रमाणात आजच्या मानवात या गोष्टी पहायला मिळतात. सर्वांना सारे करणे शक्य होते परंतु झालेल्या नैसर्गिक बदलांमुळे प्रत्येकाला त्यासाठी करावे लागणारे कष्टं कमी-जास्तं असतात. स्त्रीयांना रिव्हर्स पार्किंग शिकायला लागणारा वेळ पुरूषांना तेच शिकण्यासाठी लागणार्या वेळेपेक्षा जास्तं असतो. बोलता बोलता एखादी गोष्टं वाचून समजून घेण्यासाठी पुरूषांना स्त्रीपेक्षा जास्तं वेळ लागतो. दूरवरची एखादी वस्तू पुरूषांना नीट दिसते परंतु स्त्रीला त्याबरोबरच अनेक वस्तू दिसत असल्याने नेमकी एखादी वस्तू दिसायला किंचित जास्तं वेळ लागतो. तेच जवळची वस्तू पाहताना जसे फ्रीजमधिल लोणी किंवा कपाटातील मोजा, पुरूषांना स्त्रीयांपेक्षा जास्तं वेळ लागतो. झोपताना टपटप वाजणारे पाणी पुरूषांपेक्षा स्त्रीयांना जास्तं त्रासदायक वाटते. झोपल्यावर दूरवर काही खुट्टं झालं तर पुरूष लवकर जागे होतात पण हेच बाजूला झोपलेल्या बाळाने टँहँ केलं तर स्त्री तुलनेने लवकर जागी होते. डावा व उजवा मेंदू जवळजवळ समप्रमाणात काम करत असल्याने डावी उजवी बाजू सांगताना स्त्रीया जरा गोंधळतात पण पुरूषांना डावीकडे वळ उजवीकडे वळ वगैरे नीट समजतं.

लेखकद्वयींनी अशी बरीच उदाहरणे दिलीत. असेही सांगितलेय की सोशल कंडिशनिंग नसेल तरीही वागण्याचा कल स्त्री-पुरूषांमधे वेगवेगळा असतो व तो बदलायचा असेल तर प्रयत्न करावे लागतात. जसे लहान मुले एका ठिकाणी आहेत व त्यांना प्रथमच खेळणी दिली तर मुलींनी बाहुल्या निवडायचे व मुलांनी गाडी किंवा तत्सम चालणारे हलणारे काहीतरी निवडायचे प्रमाण खूप जास्त असते.

मजा म्हणून खालची प्रश्नावली सोडवून बघा. तुमचा मेंदू feminine आहे की masculine यासाठी ही वापरावी असे लेखक म्हणतात. अजुनही आपणावर परंपरागत, नैसर्गिक पगडा आहे की आपण समानतेकडे चाललो आहोत हे यात पाहता येईल.

गुण पद्धती -

तुम्ही पुरूष असाल तर -
१ - प्रत्येक 'अ' पर्यायासाठी १० गुण घ्या
२ - प्रत्येक 'ब' पर्यायासाठी ५ गुण घ्या
३ - प्रत्येक 'क' पर्यायासाठी ५ गुण वजा करा

तुम्ही स्त्री असाल तर -
१ - प्रत्येक 'अ' पर्यायासाठी १५ गुण घ्या
२ - प्रत्येक 'ब' पर्यायासाठी ५ गुण घ्या
३ - प्रत्येक 'क' पर्यायासाठी ५ गुण वजा करा

एखादा प्रश्न तुम्हाला लागू होत नसेल तर ५ गुण घ्या.

Highly masculine - शून्याहून कमी
Masculine - ० ते १८०
Neutral - १५० ते १८० (overlap)
Feminine - १५० ते ३००
Highly feminine - ३०० च्या वर

कोणत्या पडावाच्या जास्त जवळ जाताय यावरून लिंगनिरपेक्ष विचारसरणीपासून तुम्ही किती दूर आहात ते पाहता येईल. लेखकांनी मात्र हे सांगताना तुमचा मेंदू किती masculine व किती feminine आहे ते पहा असे म्हटलेय..
( गुण नाही दिले तरी पर्याय वाचून कळून येतेच Happy )
कृपया मजा म्हणूनच याचा उपयोग करा. हे असे काही नसते किंवा हे discrimination आहे अशा पद्धतीचे वाद होऊ नयेत अशी आशा बाळगून मी लेखकांनी दिलेले तीस प्रश्न देऊन माझे प्रवचन संपविते. जयहिंद जय महाराष्ट्र Happy

१ - नकाशे वाचणे (गूगल मॅपस्, जीपीएस मधले वगैरे रस्ते शोधत असतानाचे नकाशे) तुम्हाला -
अ - कठीण पडते व तुम्ही इतरांची मदत मागता
ब - ज्या दिशेला जायचे त्याप्रमाणे नकाशा फिरवून नंतर पाहता
क - कसाही नकाशा धरला तरी नीट नकाशाप्रमाणे जाता येते

२ - एखादी कठीण पाककृती / वस्तू टीव्हीवर पाहत/ऐकत करत असताना फोन आला तर तुम्ही -
अ - टीव्ही पाहात कृती करता करता फोनवर बोलता
ब - टीव्ही बंद करून कृती करता करता फोनवर बोलता
क - फोन करणार्यास सांगता की नंतर काॅल करेन व कृती करता

३ - मित्रमैत्रीणी घरी येण्यासाठी पत्ता विचारत असताना तुम्ही -
अ - नकाशा काढून देऊन पूर्ण खाणाखुणा सांगता किंवा किंवा दुसर्या कोणाला समजावायला सांगता
ब - त्यांना जवळपासचे काय माहित आहे विचारून तिथून कसे यायचे ते सांगता
क - इथून इथे या, मग असे वळून असे मग इथे वगैरे माहिती तोंडीच देता

४ - एखादी कल्पना किंवा concept समजावून सांगताना तुम्ही शक्यतो -
अ - कागद-पेन, खडू-फळा आणि हातवारे-हालचाल (body language and gestures ) यांचा वापर करता
ब - हातवारे-हालचाल करत तोंडीच सांगता
क - तोंडीच व स्पष्ट मुद्यांत सांगता

५ - चांगला चित्रपट पाहून परत येताना तुम्ही -
अ - चित्रपटातील दृश्ये मनात घोळवता
ब - दृश्ये व त्यात काय सांगितलेय याबद्दल बोलता
क - चित्रपटात मुख्यत्वे काय सांगितलेय ते बोलता

६ - चित्रपटगृहामध्ये तुम्हाला बसायला आवडणारी जागा ( बरोबर असलेल्या लोकांच्या )
अ - उजवीकडे
ब - कुठेही
क - डावीकडे

७ - तुमच्या मित्र/मैत्रिणीकडे काही यांत्रिक वस्तू चालत नाहिये तर तुम्ही सर्वप्रथम -
अ - अरेरे, मग तू आता काय करणार, कसे करणार, वाईट झालं, असे बोलून सहानुभूती देता
ब - दुरूस्तीसाठी चांगली व्यक्ती / जागा सुचवता
क - कसे दुरुस्तं करता येईल ते पाहून स्वतः प्रयत्न करता

८ - तुम्ही नवीनच एखाद्या जागी आहात व कोणी तुम्हाला उत्तर दिशा विचारली तर तुम्ही -
अ - तुम्हाला माहीत नाही हे प्रांजळपणे कबूल करता
ब - थोड्या विचारांती ही असावी अशी शक्यता वर्तवता
क - विनासायास बरोबर सांगता

९ - कार पार्किंगसाठी जागा मिळालीय पण कार रिव्हर्स लावावी लागणार आहे तर तुम्ही -
अ - दुसरी जागा शोधता
ब - थोडे पुढेमागे करत रिव्हर्स लावता
क - व्यवस्थित, एका फटक्यात कार रिव्हर्स लावता

१० - तुम्ही टीव्ही पाहत असताना फोन आला तर तुम्ही -
अ - टीव्ही बघता बघता आरामात फोनवर गप्पा मारता
ब - टीव्हीचा आवाज कमी करून फोन घेता
क - टीव्ही बंद करून इतरांना शांत रहायला सांगून फोन घेता

११ - तुमच्या आवडत्या कलाकाराचे नवीनच गाणं तुम्ही ऐकलं तर तुम्ही -
अ - काही ओळी आपोआप नंतर लक्षात राहतात व त्या गुणगुणता
ब - अगदीच सोपं गाणं असेल तर नंतर थोडंफार आठवतं
क - नेमकं गाणं कसं होतं ते आठवत नाही पण काही शब्द आठवतात

१२ - बर्याच गोष्टींमधे शक्यता वर्तवताना तुम्ही -
अ - इंट्यूशन वापरता
ब - उपलब्ध माहिती व गट फीलिंग वापरता
क - उपलब्ध माहिती व निष्कर्ष वापरता

१३ - तुमच्याकडील चावी हरवलीय असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही -
अ - जोपर्यंत तिची खरच गरज नाहीय तोपर्यंत ती न शोधता बाकी कामे करता
ब - बाकी कामे करता करता चावी कुठे ठेवली ते आठवत राहता
क - चावी शेवटी कधी हातात होती तेव्हापासूनचा तुमचा वावर आठवून पाहता जेणेकरून चावी कुठे ठेवली असेल ते आठवेल व चावी मिळाल्यावर बाकी कामे करता येतील

१४ - तुम्ही एखाद्या हाॅटेलच्या खोलीत किंवा दुसर्या कोणाच्या घरी आहात व तुम्हाला दूरवरून सायरनचा आवाज आला तर तुम्हाला -
अ - आवाज नेमका कुठून येतोय हे कळणार नाही
ब - नीटच लक्ष देऊन ऐकले तर आवाज कोणत्या दिशेने येतोय हे कदाचित सांगता येईल
क - आवाज कुठून येतोय हे लगेच सांगता येईल

१५ - तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात व तिथे सात-आठ नवीन ओळखी झाल्या तर दुसर्या दिवशी -
अ - सर्व लोकांचे चेहरे तुम्हाला लक्षात राहतील
ब - काही लोकांचे चेहरे लक्षात राहतील
क - त्यांची नावे लक्षात राहण्याची शक्यता जास्तं आहे त्यांच्या चेहर्यांपेक्षा

१६ - सुट्टीत तुम्हाला फार्महाऊसला जायचेय व तुमच्या साथीदाराला समुद्रकिनार्यावरील रिसाॅर्टमधे. तुमची निवड योग्य आहे हे पटवून देण्यासाठी तुम्ही -
अ - प्रेमाने समजावाल की तुम्हाला फार्महाऊसला जायला खूप आवडते व बाकी बरोबर जाणारे लोकही तिथे जास्त मजा करतात
ब - सांगाल की आत्ता फार्महाऊसला गेल्यास तुम्हाला जास्त आनंद होईल, पुढच्यावेळी समुद्रकिनार्यावर जायला तुम्हाला चालेल
क - मुद्देसूद समजावाल जसे फार्महाऊस जवळ आहे, स्वस्त आहे, खेळ व आराम यासाठी तेथे सगळ्या गोष्टी जास्त व्यवस्थित सांभाळल्या जातात, इ.

१७ - दिवसभरात कायकाय कामे करायचीत ते ठरवण्यासाठी तुम्ही -
अ - शक्यतो कामाची यादी लिहून काढता
ब - कायकाय करायचेय याची मनात यादी करता
क - मनातल्या मनात कोणाला भेटायचेय, कुठे जायचेय, काय करायचेय हे सर्व पाहता ( picture in your mind )

१८ - तुमचे मित्र/ मैत्रिण त्यांच्या काही वैयक्तीक प्रश्नाविषयी तुमच्याशी बोलायला आले तर तुम्ही -
अ - सहानुभूती दाखवता व समजून घेता
ब - प्रश्न आपल्याला वाटतो तेवढा काही कठीण नसतो असे सांगून ते कसे हे समजावता
क - अनुकूल पर्याय कोणते आहेत व प्रश्नाचे निरसन कसे करावे याबद्दल सल्ले देता

१९ - दोन वेगवेगळ्या जोडप्यांतील दोघांचे एकमेकांबरोबर काहीतरी गुपचूप लफडे चाललेय तर तुम्हाला ते कधी कळेल ?
अ - लवकरच तुम्हाला कळून येईल
ब - थोडा वेळ गेल्यानंतर कळू शकेल
क - कदचित तुमच्या लक्षात येणारही नाही

२० - जीवनामधे ढोबळपणे काय असावे तुम्हाला वाटते ?
अ - मित्रमैत्रीणी असणे व आजूबाजूच्या लोकांबरोबर आनंदाने राहणे
ब - इतरांबरोबर खेळीमेळीने रहावे पण त्याबरोबरच वैयक्तिक स्वातंत्र्यही असावे
क - आपली उद्दिष्टे सफल करावी, इतरांकडून मान कमवावा व आपले असे एक स्थान मिळवावे

२१ - पर्याय दिल्यास कसे काम करायला तुम्हाला आवडेल?
अ - समजून घेणार्या पूरक अशा सहकार्यांबरोबर
ब - इतरांबरोबर पण त्याबरोबरच तुमची स्वतःची स्पेस असावी
क - एकट्याने काम करायला

२२ - तुमची वाचनाची आवड -
अ - काल्पनिक कथा व कादंबरी
ब - मासिके व वर्तमानपत्रे
क - सत्यकथा व आत्मचरित्रे

२३ - खरेदी करताना बरेचदा -
अ - आवेगामधे ( on impulse ) खरेदी करता, मुख्यत्त्वे 'विशेष' किंवा सूट असलेल्या गोष्टी
ब - मुख्य गोष्टी ठरवलेल्या असतात पण जसजसे दिसेल तसे घेत जाता
क - त्यावर काय लिहीलेय, ते कशापासून बनवलेय वगैरे वाचत, किमतींतील फरक पाहून मग घेता

२४ - झोपणे, उठणे , जेवणे हे तुम्ही -
अ - तुम्हाला करावेसे वाटते तेव्हा करता
ब - ठराविक वेळेप्रमाणे परंतु बदल करायला हरकत नसते
क - बहुतेकदा ठराविक वेळीच..

२५ - तुम्ही नुकतेच नविन नेकरीत रुजू झालात व तेथील बर्याच कर्मचार्यांना भेटलात. त्यातील कोणीतरी तुम्हाला तुमच्या घरी फोन केला तर तुम्हाला -
अ - आवाज लगेच ओळखता येईल
ब - आवाज ओळखायला थोडा वेळ लागेल
क - आवाज ओळखणे खूप कठीण जाईल

२६ - कोणाशी वादविवाद करताना सर्वात जास्त त्रास होतो तो -
अ - दुसरी व्यक्ती शांत राहिली किंवा काहीच प्रतिसाद देत नसेल तेव्हा
ब - जेव्हा तुमचा मुद्दा दुसरे समजूनच घेत नाहीत
क - त्यांचे प्रतिवाद व उचकवणारे प्रश्न ऐकून ( probing and challenging questions)

२७ - शाळेत स्पेलिंग टेस्ट व निबंध लिहीणे
अ - दोन्ही तुमच्यासाठी सोपे होते
ब - एक तुमच्यासाठी ठीकठाक होते पण दुसरे नाही
क - दोन्ही तुमच्यासाठी काही फार सोपे नव्हते

२८ - नृत्य, जॅझ इत्यादिंमधे
अ - एकदा सगळ्या स्टेपस् शिकल्यावर तुम्हाला संगीत जाणवू लागते (feel)
ब - थोड्या स्टेपस् जमतात पण इतरांबरोबर गडबडून जाता
क - संगीत व वेळ यांचा मेळ घालणे कठीण जाते

२९ - प्राण्यांचे आवाज काढणे तुम्हाला
अ - नाही जमत
ब - थोडंफार जमतं
क - चांगलं जमतं

३० - कंटाळवाण्या दिवसानंरत काय करायला तुम्हाला आवडतं?
अ - मित्रमैत्रीणी किंवा कुटुंबासोबत त्यासंबंधी बोलणे
ब - इतर लोक त्यांच्या दिवसाबद्दल सांगत असतील ते ऐकणे
क - वर्तमानपत्र वाचणे, टीव्ही पाहणे व न बोलणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे ५५ गुण.

२५ मध्ये आवाज ओळखण्याविषयी लिहिले आहे. मला ओळखीच्या लोकांचे आवाज चटकन ओळखता येतात. यात स्त्रीपुरुष भेद आलाच कुठे? Uhoh

०१. क
०२. ब
०३. ब
०४. क
०५. क
०६. ब
०७. क
०८. ब
०९. क
१०. ब
११. ब
१२. ब
१३. क
१४. ब
१५. क
१६. क
१७. ब
१८. अ
१९. अ
२०. ब
२१. ब
२२. क
२३. ब
२४. ब
२५. अ
२६. ब
२७. ब
२८. क
२९. ब
३०. क

-गा.पै.

मला ओळखीच्या लोकांचे आवाज चटकन ओळखता येतात. यात स्त्रीपुरुष भेद आलाच कुठे? >>>> गामा, तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात त्यावरून तुम्हाला आवाज ओळखता येतात किंवा नाही येत असा त्याचा अर्थ नसून आवाज ओळखणे ही जास्त करून स्त्रियांची मक्तेदारी असलेला मुद्दा आहे असं आणि इतपतच.

रच्याकने, मला फोनवर आवाज अजिबात ओळखता येत नाहीत एवढंच नाही तर फोन करून 'ओळख बरं मी कोण बोलतेय? बोलतोय?' असं बोलणार्‍यांचा राग येतो (कारण ते कोण बोलतंय हे नंबर सेव्ह्ड नसेल तर कळत नाही) त्याहूनही कहर म्हणजे कधी कधी आवाज काहीसा लिंगनिरपेक्ष असेल तर स्त्री बोलतेय की पुरुष यातही सुपर गोंधळ होऊ शकतो. Proud

(एक विशेष सुचना : कृपया लगेच उद्या मला फोन करून 'मी कोण ओळख बरं!' चा खेळ खेळू नये.)

काही पर्याय जरा गोंधळात टाकणारे होते. बर्‍याच प्रश्नांना मी एकच पर्याय नाही स्वीकारू शकत. उदा वाचन मला कादंबरी आवडते तसंच आत्मचरित्र देखील खूप आवडतं. तसंच प्रश्न ३० - मला अ आणि क दोन्ही १००% लागू होतात. त्यामुळे मी न्यूट्रल ते फेमिनाईन अशा १५०-२०५ रेंज मधे आहे. Happy

मामी Rofl

रच्याकने, मला फोनवर आवाज अजिबात ओळखता येत नाहीत एवढंच नाही तर फोन करून 'ओळख बरं मी कोण बोलतेय? बोलतोय?' असं बोलणार्‍यांचा राग येतो (कारण ते कोण बोलतंय हे नंबर सेव्ह्ड नसेल तर कळत नाही) त्याहूनही कहर म्हणजे कधी कधी आवाज काहीसा लिंगनिरपेक्ष असेल तर स्त्री बोलतेय की पुरुष यातही सुपर गोंधळ होऊ शकतो.
>>>
यासाठी लाखो करोडो मोदक
माझंही सेम असच आहे
आजकाल तर मी....

तुम्ही माझ्या जवळच्या व्यक्तींपैकी आहात का?
असल्यास मला आवाज ओळखता येत नाहीत ये तुम्हाला माहित असेलच तेंव्हा हा असला फालतू खेळ खेळायची गरज काय? नसल्यास तुमचा आवाज मी ओळखण्याचा संबंधच कुठे येतो?

असलं बेक्कार आणि उद्धट उत्तर देते Angry
खुप वेळा हे अनेकांनी सतत हे केल्यामुळे आता पुन्हा कोणी मस्करी म्हणुन जरी माझ्याशी हा खेळ खेळला तर मला संताप येतो अक्षरशः!
अवांतराबद्दल सॉरी पण परत मला ते सगळं आठवुन राग आला आणि मी इथे भडास काढली... आता शांत शांत वाटतय Proud

१५०

खालच्या २ प्रश्नांची उत्तरं मी भारतात आहे का अमेरिकेत ह्याप्रमाणे बदलतात, पण स्कोअर फार बदलत नाही त्यामुळे ठीक आहे.

३ - मित्रमैत्रीणी घरी येण्यासाठी पत्ता विचारत असताना तुम्ही -
अ - नकाशा काढून देऊन पूर्ण खाणाखुणा सांगता किंवा किंवा दुसर्या कोणाला समजावायला सांगता
ब - त्यांना जवळपासचे काय माहित आहे विचारून तिथून कसे यायचे ते सांगता
क - इथून इथे या, मग असे वळून असे मग इथे वगैरे माहिती तोंडीच देता
भारतात - ब (५)
अमेरिकेत - क (-५)

८ - तुम्ही नवीनच एखाद्या जागी आहात व कोणी तुम्हाला उत्तर दिशा विचारली तर तुम्ही -
अ - तुम्हाला माहीत नाही हे प्रांजळपणे कबूल करता
ब - थोड्या विचारांती ही असावी अशी शक्यता वर्तवता
क - विनासायास बरोबर सांगता
भारतात - अ(१५)
अमेरिकेत - क (-५)

म्हणजे अमेरिका तुम्हाला जास्त masculine बनवते Proud

अरूंधती, तुमचा स्कोर माझ्या अंदाजापेक्षा खूपच जास्तं आला Happy

आनगापै, मामी, रिया,
पुरूषांना नेमक्या कोणत्या प्राण्याचा आवाज आहे हे ओळखता येते शिकारीच्या अनुभवांमुळे.. नेमकं आपलं बाळ रडतय की दुसर्याचं हे समजण्यासाठी स्त्रीयांना नेमका आवाज समजतो Happy
चेहरे लक्षात ठेवणे यासाठी पुस्तकात एका प्रयोगाचे उदाहरण दिलेय. - हाॅस्पिटलमधे नवजात शिशू वेगळ्या खोलीत हाताला लावलेले नंबरटॅग न दिसतील असे ठेवले असता तुमचं बाळ ओळखा सांगितल्यावर आई-आजी लोकांना बाळ ओळखणे सोपे गेले बाबा-आजोबा लोकांपेक्षा..

१५० न्युट्रल नी फेमिनाईनच्या बॉर्डरलाईनला... नी Masculine च्या कुठेतरी अधेमधे.. Uhoh

काही काही प्रश्नांसाठी तर तिन्ही पर्याय बरोबर वाटत होते... Uhoh

कोणाशी वादविवाद करताना सर्वात जास्त त्रास होतो तो -
अ - दुसरी व्यक्ती शांत राहिली किंवा काहीच प्रतिसाद देत नसेल तेव्हा
ब - जेव्हा तुमचा मुद्दा दुसरे समजूनच घेत नाहीत
क - त्यांचे प्रतिवाद व उचकवणारे प्रश्न ऐकून ( probing and challenging questions)

२० - जीवनामधे ढोबळपणे काय असावे तुम्हाला वाटते ?
अ - मित्रमैत्रीणी असणे व आजूबाजूच्या लोकांबरोबर आनंदाने राहणे
ब - इतरांबरोबर खेळीमेळीने रहावे पण त्याबरोबरच वैयक्तिक स्वातंत्र्यही असावे
क - आपली उद्दिष्टे सफल करावी, इतरांकडून मान कमवावा व आपले असे एक स्थान मिळवावे

२१ - पर्याय दिल्यास कसे काम करायला तुम्हाला आवडेल?
अ - समजून घेणार्या पूरक अशा सहकार्यांबरोबर
ब - इतरांबरोबर पण त्याबरोबरच तुमची स्वतःची स्पेस असावी
क - एकट्याने काम करायला
त्यामुळे बर्‍याच ठिकाणी ब हा सोयीस्कर पर्याय निवडला...

मी १६०.. पण वर सगळे म्हणले तसे काही प्रश्नात सगळे पर्याय बरोबर वाटतात..
पण मग तरिही त्यातला एक फायनली स्विकारण्यात स्त्री अन पुरुष मेंदु भुमिका बजावत असेल काय?

२५० Proud

एका उत्तम पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

जरुर वाचणार.

आपली मूळ किती खोलवर रुजलेली असतात नाही....

-३५

अंशा, सर्वात जास्तं स्कोर.. सही है... मला पण वाटायला लागलय माझा स्कोर काढावा असं Happy
बागुलबुवा, नक्की वाचा पुस्तक.. मजा येते..
इब्लिस, उशिराने हजेरी... येस, किती मायनसमधे तेच बघायचं होतं Wink

>>>>-३५
मेंदू असावा असा संशय घ्यायला जागा आहे. <<<
तुमचा तुम्हालाच संशय येण्याइतपत मेंदू नक्कीच आहे Wink Proud

>>> हे Masculine - ० ते १५० असे हवे आहे का? की माझीच काहीतरी गल्लत होते आहे? <<<
नाही.
Highly masculine - शून्याहून कमी = आत्यंतिक पुरुषी व्यक्तिमत्व (भले प्रत्यक्षात पुरुष अथवा स्त्री असेल - पण बहुधा पुरुषच हे निवडतील)
Masculine - ० ते १८० = केवळ पुरुषी व्यक्तिमत्व (भले प्रत्यक्षात पुरुष अथवा स्त्री असेल पण बहुधा पुरुषच हे निवडतील)
Neutral - १५० ते १८० (overlap) = स्त्री व पुरुषी व्यक्तिमत्व मिक्स (स्त्री वा पुरुष दोन्हीही या थरामधे येऊ शकतात)
Feminine - १५० ते ३०० = केवळ स्त्री व्यक्तिमत्व (भले प्रत्यक्षात पुरुष अथवा स्त्री असेल पण स्त्रीयाच जास्तकरुन)
Highly feminine - ३०० च्या वर = केवळ स्त्री व्यक्तिमत्व (भले प्रत्यक्षात पुरुष अथवा स्त्री असेल, पण स्त्रीयाच जास्तकरुन)

या लेखावरुन मला मी वाचलेल्या एका पुस्तकाचे अंशतः परीक्षण आठवले -
_________________
"The Female Brain" पुस्तक वाचते आहे. यात स्त्री-पुरुष प्रेमात कसे पडतात त्याचे एक उदाहरण घेतले आहे. मेलिसा नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर तिला एक दीर्घकालीन रिलेशनशिप हवीशी वाटू लागली. तिने "डेटींग" साइटवर नावही नोंदवले. पुढे काही महीने फसलेल्या डेटींगमध्ये गेले. आज तिला लेस्ली तिच्या मैत्रिणीने पबमध्ये बोलावले आहे. अन तयार होऊन ती गेली आहे. तिथे थोड्याच वेळात तिच्या दृष्टीस रॉब पडतो... केस सॉल्ट-पेपर, आत्मविश्वास अन एक सुखवस्तू व्यक्तीमत्व आहे त्याचे. पहाताक्षणी तिच्या पाठीतून एक शिरशिरी जाते अन ती लेस्लीकडे वळून म्हणते "ऐक ना तो पुरुष पाहीलास का?"
.
लेस्ली पहाणार तोच, प्रत्यक्ष रॉब त्यांच्याकडे येताना दिसतो. पुढे रॉबच पुढाकार घेऊन दोघींशी गप्पा मारु लागतो. तो किंचीत नर्व्हस आहे. मेलीसामध्ये testosterone, fire up होते, हे कामोत्तेजनेस पूरक संप्रेरक आहे. परंतु तिचा amygdala जास्त कार्यरत झाला आहे जो anxiety अन सावधानतेचे नियंत्रण करतो. हा विशेषतः परक्या व्यक्तींच्या सहवासात अधिक कार्यरत होतो.
.
पुढे दोघेजण डान्स फ्लोअर वर डान्स करतात. लेखिकेने म्हटले आहे की - कोणती व्यक्ती, शरीरयष्टी, रुप, त्या व्यक्तीच्या लकबी आपल्याला आवडतील हे मेंदूत चक्क hard wired झालेले असते. व त्यामुळे आपण विशिष्ठ व्यक्तींकडेच आकर्षित होतो.नंतर स्त्री-पुरुषांचा दोघांचा chase-lure खेळ विस्तृत लिहीला आहे. नेहमी पुरुष हाच chaser असतो व स्त्री lure करणारी असे सरसकट विधान केले आहे. स्त्री ही नेहमी अधिक सावध असते कारण एक तर तिच्यापाशी थोडीच बीजांडे आहेत त्यातून तिला एका सशक्त, निरोगी व पुढे वंश चालवू शकेल अशा अपत्याला जन्म द्यायचा आहे. याउलट पुरषाकडे अमर्याद शुक्राणू, अन ते ही संपूर्ण जीवनभर असतात.अर्थात दोघेही दीर्घकालीन सहवास इच्छितात पण स्त्री नेहमीच इच्छिते, जास्त इच्छिते, पुरुषाला जास्त gauge करते, अधिक वेळ घेते. She takes her sweet time before giving in.
.
स्त्रिया त्यांच्यापेक्षा वयाने अधिक पुरुष पसंत करतात. तसेच स्त्रियांचा भर पुरुषांच्या दिसण्यापेक्षा, पुरुषाच्या मान-हुद्दा-संपत्ती आदिंवर जास्त असते. कारण "उत्क्रांती" मध्ये आहे. तिच्या अपत्यास अधिक संरक्षण, चांगले resources, स्थिरता देणारा पुरुष तिला आकर्षक वाटतो. जरी आजकाल स्त्रिया स्वतंत्र कमावणार्‍या असल्या तरी त्यांना पुरुष "Provider" देखील असावा असे वाटते. अजुनही आपल्या मेंदूची अनेक कार्ये "Stone age" मधील तत्वांवर चालतात.
.
याउलट पुरुषांचा भर दिसण्यावर असतो - स्त्रीचा शेप, भरीव ओठ, चमकदार डोळे व केस, activity level, चापल्य हे गुण म्हणजे अक्षरक्षः स्त्री fertile व निरोगी असण्याच्या निकषांवर असतो. त्यामुळेच प्रथमदर्शी प्रेमात पुरुष, स्त्रियांहून जास्त पडतात.
.
अन यातच (उत्क्रांती) पुरुषांच्या रसिकतेचे व स्त्रीच्या व्यवहारीपणाचे रहस्य दडलेले आहे.
.
पुढे प्रेमात पडलेला मेंदू कसा असतो त्याचे वर्णन येते. प्रेमात मेंदू हा चक्क illogical बनतो. मेंदूत अनेक इतर अनेक संप्रेरके कमी होतात अन फक्त सुखद भावना होते. चक्क प्रेमपात्राचे shortcomings (दोष) यांचेकडे कानाडोळा केले जाते. : )

Pages