Submitted by kaaryashaaLaa on 19 October, 2008 - 23:49
नाही नाही, ही अर्थातच कार्यशाळा प्रवेशिका नाही. :)
ही कार्यशाळेला आपले एक मायबोलीकर श्री. म. ना. कुलकर्णी यांनी दिलेली सप्रेम भेट आहे.
त्यासाठी त्यांचे आणि हिमांशु कुलकर्णी यांचे शतशः आभार!! :)
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे मी कधी शिकलोच नाही
वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिर्हाइत
सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही
कैकदा कैफात माझ्या मी वीजांचे घोट प्यालो
हाय! पण तरीही प्रकाशा मी कधी पटलोच नाही
संपल्यावर खेळ माझा आंधळ्या कोशिंबिरीचा
लोक मज दिसले अचानक मी मला दिसलोच नाही
गझलकार - सुरेश भट
संगीतकार - म. ना. कुलकर्णी (manaku1930)
गायक - नरेंद्र कुलकर्णी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात
क्या बात है !!!
वाह! क्या
वाह! क्या बात है!!
अद्दापही
अद्दापही सु-याला माझा सराव नाही,
अद्दापही पुरेसा हा खोल घाव नाही,
एथे पीसुन माझे काळीज बैसलो मी,
आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही,
ते दु:ख राजवरखी हे दु:ख मोरपंखी,
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही,
उच्यारणार नाही कोनिच शाप वाणि,
ऐसा ऋशिमुणिंचा लेखी ठराव नाही,
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे,
हा थोर गांडुळांचा भोन्दु जमाव नाही,
ओठि तुझ्या न आले अद्दाप नाव माझे,
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही...
श्रि.सुरेश भट..
अगदी अगदी..
अगदी अगदी.. वरची गझल वाचनात आली नव्हती.. आवडली..
तनजा, तू दिलेली गझल माझी खूप आवडती त्यात अजून २-३ शेर आहेत.. मन्याने इथे दिली होती ही गझल..
धन्यवाद
मस्त ..
मस्त .. तिकडे नेट ला स्पिड नसते त्यामुळे आज ऐकली ही गजल.
हिम्या निरोप पोचता कर रे!
श्यामली
श्यामली तुमच शीक्षण स्.भु ला झालयना मग आपन शेजारी झालोत आता शेजारी म्हटलंकी उधार पाधार आलच
कुठे मीळाला तर सुरेश भटांचा एल्गार हा कवीता संग्रह वाचा...नाहीच सापडला तर सांगा ये़खादी कॉपी पाठ्वुन देयील.....
झकास!
झकास! गझलीची चाल मस्त जमून आलीये. आणि चांगली गायलीयेदेखील.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
अप्रतिम
अप्रतिम चाल.... मी कालच ऐकली... तेव्हापासुन तीच गुण्गुणतो आहे.
व्वा...
व्वा... मस्तच !!!
--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault...
इथली गझलेची audio link गायब
इथली गझलेची audio link गायब झालीये का... काहीच दिसत नाहिये.
Khup Chan.
Khup Chan.