करंट मस्त...दत्त दत्त...!!!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 9 March, 2013 - 06:42

शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्‍या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार. आणी यात सगळ्यात मिळून क्रम वरखाली का होइना?त्यानी यातल्या कुठल्याही गोष्टीचं महत्व वाढतंही नाही,घटतंही नाही.

तर त्याचं झालं असं की.....

गेल्या शनिवारी...मी,आणी काहि मित्र... असे अचानक डॉट कॉम या संकेतस्थळावर (जमत/उरत) जमलेले साथी सक्काळी सक्काळी पुण्यास्नं निघालो... शनिवारचा दिवस पूर्ण कोपेश्वरलाच(खिद्रापूर) अर्पण केलावता त्यामुळे,,, पुणे-खिद्रापूर/कोपेश्वर वारी अवरता अवरता सांज होत आली.हे मंदिर आणी देवाधिदेव कोपेश्वर नावाच्या अगदी म्हणजे अगदी विसंगत आहेत. मन/बुद्धी/चेतना सर्व म्हणजे सर्व बाजूनी सुप्रसन्न करणार्‍या/थक्क(ही) करणार्‍या या देवळातल्या देवाला कोपेश्वर हे नाव सुचणं हे देवाचंही दुर्दैव आहे... असो!

....त्या दिवशी कोपेश्वराहून आंम्ही रात्रीला कोल्हापूर मुक्कामी गेलो. दुसर्‍या दिवशी सकाळी अवरा आवर झाली आणी आंम्ही आमचं CNG खेचर सुरू करून निघालो,ते थेट आदल्या रात्रीच्या कोल्हापूर मिसळ टेस्ट पूर्वानुभवाच्या काथ्याकुटातून पास झालेल्या फडतरे मिसळ कडे ...पण बाकि काहिही अस्लं ना,तरी एक मात्र नक्की...! हे फडतरे मिसळ गृह अगदी आमच्या पारावरच्या मारुती सारखं साधं/सरळ/शिम्पल हाए. आणी तेव्हढच जागृतपण आहे. आंम्ही गाडी पार्क करून गेलो...वेळंही ८:३० च्या दरम्यानचीच होती,पण तरी आंम्हाला माफक का होइना? दर्शनबारीला थांबावं लागलचं.पण एकदा आत गेल्यावर भायेर हुबं र्‍हायल्याचा कंटाळा पार मंजे पार निघुन गेला. फडतरे मिसळ मधे साधी कोकणातल्या जुन्या हाटेलांसारखी डबल फळकुट श्टाइल आसन व्यवस्था आहे.आणी दर्शन बारी आत स्थानापन्न होइपर्यंत कंटिनिव्ह असल्यामुळे पुण्यातल्या मंगल कार्यालयात(प्राचीन काळी... Wink ) ''जेवत्यापाना मागे खुर्ची धरून ऊभं'' हा जो काहि विलक्षण प्रकार होता... तशी दुसरी श्टाइल आहे. जो या श्टाइलमधे बसला,त्याच्यातच फडतर्‍यांची मिसळ ''बसू'' शकते. एरवी मामला अवघड आहे.

ही मिसळ म्हणजे मूलभूत कोल्हापुरी मिसळ आहे,अगदी आसन व्यवस्थेपासून ते तिथल्या शासन व्यवस्थे पर्यंत. पुढे वारंवार गेलं तर तिथले खास राजकीय शब्दही वळणी पडल्या शिवाय र्‍हात नाहीत... सुकीमिसळ... चिवडा.... पाव प्लेट... कट... भाजी... इ.इ.इ. ह्या शब्दांनाही आपल्याला लागणार्‍या पेक्षा काहि खास तिथले अर्थ आहेत. म्हणूनच तर मी हिला मूलभूत मिसळ म्हणतो... कारण या मिसळीत कोठचेही दिखाऊ/रंगीतपणा आणणारे घटक नाहित आणी हल्लीचा कोल्हापुर बाहेर नेऊन,कोल्हापुरी चविचा नुस्ताच झणका देणारा अभद्र तिखटपणाही नाही. फडतरे मिसळीत जे काहि तिखट आहे,ते हळूहळू फुलत आणी दरवळत जाणार्‍या अंब्याच्या मोहोरा सारखं,शेवटाला पूर्ण आनंद देतं.या मिसळची डायरेक्ट किक बसत नाय,हळूहळू फुलणार्‍या मादक शृंगारा सारखा हिचा मझा वाढतो.

हे सगळं झालं ते मिसळीच्या रंगरूप आणी सौंदर्याबद्दल...अता देहस्वभावाकडे जाऊ... मिसळीच्या मूलभूत देहस्वभावाची पहिली खूण तिच्या ठाई,म्हणजे प्लेटमधे हळद/मिठात मुरलेली मटकी आहे की नाही? यात आहे. नंतर नंबर येतो तो पोह्यांचा/बटाटा भाजी इत्यादी पर्यायी पदार्थांचा. ते तर या मिसळीत आहेतच. पण पुढे बहुसंख्य मराठी मुलुखात मिसळीत-जी जागा फरसाण नावाच्या बालेकिल्ल्याची आहे,ती इथे बदललेली आहे. फडतरे मिसळीत त्या जागी शेव/दगडी पोह्यांचा चिवडा वर्णी लाऊन जातो. मग त्यावर पात्तळ भाजी आणी कट आणी थोडं सायट्याचं दही...वरती सही केल्यासारखं टाकून येका प्लेट मदे कांदा/लिंबू/मिसळ वाटी येते...कडेनी छोट्या प्लेट मधे मिसळीसाठी अत्यावश्यक अश्याप्लेन चविचे स्लाइस येतात.

.........त्यानंतर जेव्हढा तुमचा ग्रुप असेल,त्या हिशोबात ५ ते १० एक्शट्रा पावांची लादि येउन पडते.हे सगळं टेबलावर लागे पर्यंत कडेला काऊंटर वरची चाललेली मिसळ लावण्याची गर्दी खरोखरच बघण्या सारखी असते. आणी नंतर एकदा साधनेला सुरवात झाली ,की आपल्याला सभोवतालचा (आपला.. Wink ) मित्र परिवार सोडला,तर फक्त भाजी...पाव...कांदा... ''ए खाली चिवडा लाव रे...'', ''कट दे तिकडं...'', ''तुमची किती लोकं??? मग...थांबा कि जरा...!!!'' एव्हढेच आवाज ऐकू येतात... मधून मधून येणारा रस्स्सा तुंम्ही खास वेगळी वाटी मागून ''घेतलात'' तर, आपल्या स्वतःच्या वेगळ्या जगतात गेल्याचीही अनुभूती येते. (आंम्ही तर ती कुठेही गेलो,तरी हमेशा घेतोच... Wink ) ...मिसळीचं मूळ तिच्या रश्यात असतं,हे फडतर्‍यांच्या मिसळीला चाखताना शेवट शेवट अगदी पूर्ण पटायला लागतं... कारण हा रस्सा फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करून गरम गरम ओढताना,सुरवातीला मज्जा येते,पण नंतर चांगला श्टेनगन करंट बसायला लागतो...आपल्या कपाळावर जसा घाम चढतो,तसा मागं उभ्या ठाकलेल्या लाइनच्याही...!!! पण ''ते'' आपल्याला उठायची घाई ही करत नाहित,हेही तेव्हढचं खरं हां...!

आणी अश्या तर्‍हेनी एक परिपूर्ण मिसळ साधना झाल्यावर,तुंम्ही फडतरे मधून बाहेर आलात...तर तसेच जाऊ नका...हा आपला माझा फुकाचा सल्ला हो... मग करा काय??? तर शिर्षकात म्हटलेला करंट मस्त!!! आपण आत अनुभवलेला असतो... पण राहिलेला अविभाज्य दत्त दत्त!!! पहायचा असेल... तर फडतरे मिसळच्या तोंडावर उभ्या असलेल्या मिसळभक्तांच्या पाठमोर्‍या दर्शनात तो पहावा...!!! गेलात कोल्हापुरला,तर सकाळी सकाळी जरूर दर्शनाला जाऊन या...खात्रिनी सांगतो,पुण्य गाठीशी बांधुन याल.कुठचिही मिसळ नम्र आहे,की...जहाल...हे तिच्या भक्तांवरून ओळखावं असं म्हटलय,ते अगदीच खोटं नाही...
=======================================================================
१) ही बगा बगा तयारी...
http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/482443_429842607102031_1938822428_n.jpg
२) हा मिसळीचा प्राण...मटकी-भाजी-पोहे
http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc7/r90/386181_429843403768618_400819291_n.jpg
३) ह्याला आमी म्हन्तो... गर्दी... ''होणे''
http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/5626_429843883768570_1238936059_n.jpg
४) ए .... कट लाव रे...
http://sphotos-b.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc7/r90/601090_429843263768632_993591226_n.jpg
५) अस्सं लायनीत र्‍हायला पायजे...!
http://sphotos-h.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/164436_429886830430942_820122233_n.jpg
६)ही बगा आली टेबलावर...
http://sphotos-f.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc7/487496_429844317101860_116493826_n.jpg
७)तिसरी वाटी निम्मी ग्येल्याव ह्यो फोटू काहाडायचं ध्येनात आलं बगा Wink
http://sphotos-h.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/r90/65533_429844833768475_817712852_n.jpg
८) हा वाटिवरला तरंगणारा लाल/लाल ''कट'' फक्त कोल्हापुरलाच शिजतो... :-p
http://sphotos-b.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/65511_429844810435144_718975043_n.jpg
९) आणी ही भटारखान्याच्या मागं येका छोट्या जागेत... आमच्या करंटची हात-भट्टी लागलीया बगा...लय फ्फाटं फ्फाटं हुटून लावत्यात हिला...
http://sphotos-f.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/164407_429843310435294_34159784_n.jpg
१०) करंट बादलीत आलाय बगा.... Wink
http://sphotos-d.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash4/481803_429843357101956_23530042_n.jpg
११) करंट झाला...त्यामुळं आता... दत्त...दत्त...!!! Happy
http://sphotos-b.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash4/482614_429887137097578_1958412800_n.jpghttp://sphotos-c.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc7/382208_429887447097547_435432677_n.jpg
=============================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फोटु दिसत्याती, पण लई मोट्ट हायेत. लई जागा व्यापुन टाकली त्यांनी वामनाच्या पावलावानी. वो आत्माराव जरा डायेट करा की त्या फोटुंच म्हंते मी.:फिदी:

लेख भारी हाय, आता कोल्हापुरास्नी जाऊनशान मिसळ खावी लागेल.

फोटू खरेच फार मोटू आहेत.

बाकी मिसळ आपली पण जगात फेवरेट, कोल्हापुरी तर खासच Happy

तिखट झणझणीत तवंग बघून आज घरचा डाळभात काही घश्याखाली जात नाही असे दिसतेय.. Wink

फक्त ते स्लाईस ब्रेड आपल्याला जमत नाहीत राव Sad

खुलासा--- हे एक सांगायचं र्‍हाऊनच गेलं, शीर्षकातल्या ओळी ह्या ''देऊळ'' चित्रपटातील फोडा दत्त नाम टाहो.... या गाण्याच्या एका कडव्यातील आहेत... ते असं---''एकच सत्य ...दत्त दत्त... करंट मस्त...दत्त दत्त'' . तिथे जरी ते गाणं धर्माचा आशय विडंबनात्मक करून मांडलेलं असलं तरी,नीटपणे पाहिल्यास एक गोष्ट दिसते,ती...ही,की.. भक्ति ,मग ती कोणत्याही प्रांतातली-- गाण्यातली/खाण्यातली/धर्मातली...असो...भक्त तिच्या भजनी लागतो,कारण चालना देणारा ''करंट'' तिथं मिळतो... शब्द/रचना या मुळे वाइट वाटलं,तरी हि गोष्ट नाकारता येत नाही,हे ही तितकच खरं! Happy

अक्षी बराबर अंड्या! सिलेसपाव न्हाई जमणार. तितं लादीपावंच पायजेलेत!

आत्माराव, पत्ता द्येनार का दुकानाचा?

आ.न.,
-गा.पै.

अत्रुप्तं आत्म्या, अरे काय सुर्रेख लिहिलाय हा लेख. खरच आज घरचं जेवण (त्यात ते मी बनवलेलं म्हणजे काय म्हणतात त्यातली गत).. घशाखाली उतरताना मारामार आहे. हा लेख नवर्‍याच्य आणि लेकाच्या नदरंला न पडेल असं वाचण्याच्या प्रय्त्नात आहे.
भारी लिहिता राव तुम्ही. भारतात येण्यापूर्वी तुम्हाला संपर्कं करावा अशी खाशी इच्छा आहे. त्याविना इतक्या "स्थानां"ची अन देव-देवतांची कशी काय यात्रा होणार?... आणि नुस्ता भक्तं (मागून-पुढून-साईडनं) बघून मन भरणार्‍याइतकी आमच्या भक्तीची मजल गेली नाहीये... डायरेक्ट अ‍ॅथॉरिटी पायजेलाय दर्शनाला.... आदी पोटाबाचा इटोबा...

वा... चमचमीत,भयंकर टेस्टी वर्णन्...वाचून तोंपासु झालंय..
पुण्याला एकदा काटाकिर्र खाल्ली होती...तिची चव आठवली फोटो पाहून... स्लर्प!!!!!

आत्माराव, कल्लापुराला जवाकवा यिऊ आमी तवा आदुगरपासून म्हाईत पडलं तं बरं! हितं पाहा गुग्गुळाचार्य काय दाखीवतात.

fadtare_misal.JPG

येवडी पापुलर मिसळ हाये, पण त्येनलाबी पत्त्याच न्हाई! आता तुमी सांगा शोभतं का हे? Wink
आ.न.,
-गा.पै.

पक्का कोल्हापूरी या नात्याने तुम्हांस्नी योक सजेश्र्चन्‌ देतावं. बिंदूचौकाच्या सामोरी योक बारका बोळ हाय. त्या बोळातून म्होर गेलं की तेथे ठोंबरेंची मिसळ लागतीया. बारकं खोपटं हाय त्यामुळे एक वेळ आठ लोकचं बसतात. योक डाव वेळ काढूनशान ती खाऊन बघा. आयच्यान सांगतो परत फिरून दुसरी कोन्ती मिसळ हाणणार नाही.

@आयच्यान सांगतो परत फिरून दुसरी कोन्ती मिसळ हाणणार नाही.>>> सलाम....!!! नक्की जानार बगा,म्होरल्या टायमाला Happy

सहीच

आमी ह्यो धागा पायलाच न्हाय...
आमी ह्ये फटू पायलेच न्हायती....
आमची लाळ गळलीच न्हाय्ये.... Lol

हल्लीचा कोल्हापुर बाहेर नेऊन,कोल्हापुरी चविचा नुस्ताच झणका देणारा अभद्र तिखटपणाही नाही.

या वाक्यासाठी, फेटा वर फेकून दाद ! लेख तर लई झॅक !

कारण या मिसळीत कोठचेही दिखाऊ/रंगीतपणा आणणारे घटक नाहित आणी हल्लीचा कोल्हापुर बाहेर नेऊन,कोल्हापुरी चविचा नुस्ताच झणका देणारा अभद्र तिखटपणाही नाही. फडतरे मिसळीत जे काहि तिखट आहे,ते हळूहळू फुलत आणी दरवळत जाणार्‍या अंब्याच्या मोहोरा सारखं,शेवटाला पूर्ण आनंद देतं.या मिसळची डायरेक्ट किक बसत नाय,हळूहळू फुलणार्‍या मादक शृंगारा सारखा हिचा मझा वाढतो>>>>>>>>>>>..

जोरदार टाळ्यांसहीत अनुमोदन. Happy