Submitted by भारती.. on 8 March, 2013 - 04:26
''सहज भरकटत नजर''
सहज भरकटत नजर थांबली
तुझ्या श्यामले नजरेपाशी
जाळून घ्यावे असे कवडसे
बुडून जावे अशी उदासी
तूही गडे समजून जरा घे
या डोळ्यांची अशब्द भाषा
जागृतीमधल्या रुख्या आकृती
स्वप्नांमधल्या प्रश्निल रेषा
आकळले मज तुलाही येती
अज्ञातातून अखंड हाका
भूगर्भाचे शोषून किती स्तर
विस्तारित तव शाखा शाखा
अनुबंधांच्या शिल्पित शहरी
हरलीस तूही सर्वस्वाने
पुनः नवीनच वेशींपाशी
उभी राहिलीस द्विधा मनाने
त्रिमित गूढ माझ्या कवितेतून
मेघांची सावली सरकली
तुझ्या श्यामले नजरेपाशी
सहज भरकटत नजर थांबली..
('मध्यान्ह' कवितासंग्रहामधून )
-भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जाळून घ्यावे असे कवडसे बुडून
जाळून घ्यावे असे कवडसे
बुडून जावे अशी उदासी >> क्या ब्बात
वाह वा..खूप आवडली...
वाह वा..खूप आवडली...
<<आकळले मज तुलाही
<<आकळले मज तुलाही येती
अज्ञातातून अखंड हाका
भूगर्भाचे शोषून किती स्तर
विस्तारित तव शाखा शाखा>>
खूप सुंदर कविता
शब्दच नाही
शब्दच नाही सुचतय्त..........
__/\__ __/\__ __/\__ __/\__ __/\__ __/\__ __/\__!!!
अनुबंधांच्या शिल्पित
अनुबंधांच्या शिल्पित शहरी
हरलीस तूही सर्वस्वाने
पुनः नवीनच वेशींपाशी
उभी राहिलीस द्विधा मनाने
खुप आवडली .या ओळी फारच..
किती सुंदर..!! व्वा! प्रत्येक
किती सुंदर..!!
व्वा! प्रत्येक कडवं सुरेख!
>> जाळून घ्यावे असे
>>
जाळून घ्यावे असे कवडसे
बुडून जावे अशी उदासी
<<
आवडली कविता.
आवडली कविता
आवडली कविता
शाम,वैभव,अमेय
शाम,वैभव,अमेय ,विक्रांत,स्त्री जाणिवांची ही कविता सहसंवेदनेने समजून घेतल्याबद्दल आभार !
अंजली,स्वाती,जाई,आपण तर अनुभवतो असे अनाम स्नेह अवचित भेटून श्रीमंत करणारे..धन्स.
जाळून घ्यावे असे कवडसे बुडून
जाळून घ्यावे असे कवडसे
बुडून जावे अशी उदासी..........अहा...मस्तच !!
कविता फार आवडली.
कविता फार आवडली.
वाह!
वाह!
वाहवा ! खूप आवडली कविता
वाहवा ! खूप आवडली कविता .
'जागृतीमधल्या रूख्या'जवळ थोडा अडखळलो. 'जागृतीतल्या रूक्ष आकृती' असे केले तर ? वै म कृ गै न. या बदलाशिवायही कविता अप्रतिम आहे.
वाहवा ! खूप आवडली कविता
वाहवा ! खूप आवडली कविता .
'जागृतीमधल्या रूख्या'जवळ थोडा अडखळलो. 'जागृतीतल्या रूक्ष आकृती' असे केले तर ? वै म कृ गै न. या बदलाशिवायही कविता अप्रतिम आहे.
धन्स
धन्स जयवी,शैलजा,समीर,राजीव..
राजीव, 'रुख्या' थोडं बोलभाषेतून आलंय,आणि खरं तर आपोआप आलंय ते तसंच ठेवलंय.
जाणिवेतल्या जगण्यातलं ओसाडपण त्यात अभिप्रेत आहे.'रुक्ष'ही छान बसेल तिथे,पण नादातून ध्वनित होणारं सूक्ष्म अर्थांतर निवेदनाला जरा शिष्टपणा आणतंय असं मला वाटतं