देवा.............

Submitted by मी मी on 5 March, 2013 - 12:16

वऱ्हाडी बोली भाषेत लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न.......

वारे देवा तुया न्याय बडा न्यारा
गरीब तुले टोचे अन पैसेवाला प्यारा

गरीबाले खायले अन्न नाही पुरे
अन थो आपली तिजोरी सोन्यानं भरे

गरीबाच पोरगं शेतामंदी राबे
श्रीमंताच पोर पाय एसी मंदी झोपे

गरीबाची झोळी.. दिली गड्डे करून
अन पैसेवाल्यापाशी झोळ्याच झोळ्या भरून

गरीब बिच्चारा काट्यात बिना पायताणं फिरे
पैसेवाल्याच्या गळ्यात सोनसाखळी अन हिरे

देवा तुले असा लय पुळका त्याईचा
गरीबांकडं लक्ष द्यायले वेळ न्हाई जरासा

त्यायले दे भरून मले न्हाई वाद
पण इकडे बी मरेपर्यंत पाहू नको वाट

खूप नाही मांगत आर स्वाभिमानानं जगतो
हाथ ठेव डोक्शावर बसं एवढंच तुले मागतो

त्यायले दिले भरून मले दे वरून
पाउस पाड बेताचा अन पिकं दे भरून

पोट भरण लोकायचं अन मी पोटान खाईन
इतकं दिलं तरी देवा मी सुखानं र्हाइन

इतकं दिलं तरी देवा मी सुखानं रहाइन !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thnx Happy

मस्त