तु दिलेल्या फुलांचा सुवास अजूनही बाकी आहे

Submitted by Trushna on 4 March, 2013 - 20:35

2663075555_a0e76bd6e1.jpg

तु दिलेल्या फुलांचा सुवास अजूनही बाकी आहे
तुझा तो प्रेमळ सहवास अजूनही बाकी आहे
मनातले बालिशपण अजूनही बाकी आहे
ओंजळीतले रिते पण अजूनही बाकी आहे
हृदयातला गारवा पापण्यान आड लपून आहे
तुझ्या मिठीतला तो मंद श्वास अजूनही बाकी आहे
स्पर्श तुझा तो सुखाचा अजूनही शहारतो आहे
तू गेलास असा निघून पण परतण्याची आस अजून बाकी आहे
कारण, तु दिलेल्या फुलांचा सुवास अजून बाकी आहे .............तृष्णा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त