चित्र

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 March, 2013 - 01:50

हलके हळवे
धूसर धुकट
चित्र उमटते
पुसट पुसट .
चित्र लडिवाळ
मधाळ लाजरे
चित्र नखरेल
नाजूक नाचरे .
चित्र थिरकते
लयीत फिरते
चित्र मनातील
गझल बोलते .
कधी उन्हातील
ओले रिमझिम
कधी जलातील
शारद चमचम .
कधी श्वासातील
धगधग उष्ण
कधी वेळूतील
तगमग कृष्ण .
प्रियतम तरी
जाते निसटत
रंग नभातील
डोही हरवत .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर . . . . . चित्र .
डोळ्यांसमोर झळकते वाचताना .

धन्यवाद राजीवजी,शशांक,वैभव,शाम ..चिखाल्याजी भारतीताईची कविता वाचली होती .तुमचे चित्र पहिले नव्हते .आवडले .धन्यवाद

एकाच 'चित्र' नावाने आलेले हे एका महिन्यातले तिसरे लिखाण>>>>>

वा चिखल्या सूक्ष्म नीरीक्षणशक्ती
अजून सूक्ष्म करून पहा
..........तीनही धाग्यांवर माझा प्रतिसाद असणेच ;. हा कॉमन पॉईण्ट आहे !!!!!!! Happy

धन्यवाद भारतीताई ,
<<,तीनही धाग्यांवर माझा प्रतिसाद >>>चित्र त्रयीवर वैभव झालासे कळस Happy