Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 March, 2013 - 01:50
हलके हळवे
धूसर धुकट
चित्र उमटते
पुसट पुसट .
चित्र लडिवाळ
मधाळ लाजरे
चित्र नखरेल
नाजूक नाचरे .
चित्र थिरकते
लयीत फिरते
चित्र मनातील
गझल बोलते .
कधी उन्हातील
ओले रिमझिम
कधी जलातील
शारद चमचम .
कधी श्वासातील
धगधग उष्ण
कधी वेळूतील
तगमग कृष्ण .
प्रियतम तरी
जाते निसटत
रंग नभातील
डोही हरवत .
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर . . . . . चित्र
सुंदर . . . . . चित्र .
डोळ्यांसमोर झळकते वाचताना .
मस्त..आवडली
मस्त..आवडली
छान आहे आवडली
छान आहे आवडली
एकाच 'चित्र' नावाने आलेले हे
एकाच 'चित्र' नावाने आलेले हे एका महिन्यातले तिसरे लिखाण
उर्वरित २ इथे.
http://www.maayboli.com/node/41245
http://www.maayboli.com/node/41160
सुंदर, सुंदर....
सुंदर, सुंदर....
धन्यवाद
धन्यवाद राजीवजी,शशांक,वैभव,शाम ..चिखाल्याजी भारतीताईची कविता वाचली होती .तुमचे चित्र पहिले नव्हते .आवडले .धन्यवाद
'चित्र' त्रयीची कम्माल. खूप
'चित्र' त्रयीची कम्माल. खूप सुंदर कविता विक्रांत.
एकाच 'चित्र' नावाने आलेले हे
एकाच 'चित्र' नावाने आलेले हे एका महिन्यातले तिसरे लिखाण>>>>>
वा चिखल्या सूक्ष्म नीरीक्षणशक्ती
अजून सूक्ष्म करून पहा
..........तीनही धाग्यांवर माझा प्रतिसाद असणेच ;. हा कॉमन पॉईण्ट आहे !!!!!!!
धन्यवाद भारतीताई , <<,तीनही
धन्यवाद भारतीताई ,
<<,तीनही धाग्यांवर माझा प्रतिसाद >>>चित्र त्रयीवर वैभव झालासे कळस