!! बाप !!
बाप हणजे, बाप हणजे, बाप हणजे, बाप असतो !
कधी संथ तेवणा-या समईतली वात असतो !
तर कधी धगधगणा-या मशालीची ज्योत असतो !
बाप हणजे, बाप हणजे, बाप हणजे, बाप असतो !! १ !!
कुटुंब हणजे घर, तर बाप त्याचा मुख्यं खांब असतो !
बापाविना संसार हणजे समुद्रात भरकटलेलं जहाज असतं !
कुटुंबाच्या सुखासाठी बाप आपल्या दुख्खाना झाकत असतो !
वात्सल्यरुपी कासव प्रमाणे आपल्या कुटुंबाकडे तो पाहात असतो !
बाप हणजे, बाप हणजे, बाप हणजे, बाप असतो !! २ !!
मुलांसाठी बाप असतो, बायकोसाठी नवरा असतो, कुटुंबासाठी कर्ता असतो !
एकाचवेळी मुकाटपणे तो विविध नाती सांभाळत असतो !
बाप हा उदबत्तीसारखा स्वतः जळून दसु-याला सुखावत असतो !
कुटुंबाच्या सुखासाठी बरंच काही त्यागत असतो !
बाप हणजे, बाप हणजे, बाप हणजे, बाप असतो !! ३ !!
बाहेरून फणसा सारखा काटेरी, पण आतून ग-यासारखा गोड आणि प्रेमळ असतो !
कधी संथ वाहणा-या नदी सारखा, तर कधी तो खळाळणा-या धबधब्यासारखा होतो !
कधी त्याचा स्वभाव लोण्य़ा सारखा मऊ, तर कधी तो दगडा प्रमाणे कठीण बनतो !
कधी तो अंगार ओकणा-या निखा-या सारखा, तर कधी थंडगार बर्फा सारखा होतो |
बाप हणजे, बाप हणजे, बाप हणजे, बाप असतो !! ४ !!
कधी केलेल्या चुकीबद्दल पाठीत धपाटा देणारा बाप, त्याच पाठीवर शाब्बासकीची थापही देतो !
बायकोसाठी पगाराच्या दिवशी गजरा आणणारा बाप, मुलांच्या वाढ दिवसा वेळी गुपचूप भेटवस्तूही आणतो! मान-अपमान सहन करणारा बाप, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तारेवरची कसरत करतो |
मुलांचे छंद जोपासून, त्याना नवी स्वप्ने दाखविणारा बाप, खरंच कीती ग्रेट असतो !
बाप हणजे, बाप हणजे, बाप हणजे, बाप असतो !! ५ !!
भरपूर दिले तुम्ही आम्हाला विसरुनी अपुला स्वार्थ !
तुमच्या विना जीवनाला नाहीच काही अर्थ !
सुखासाठी अमुच्या लापाविलीत आपुली दुखः !
सेवा करुनी तुमची, आम्ही बजावू आमुचा हक्क !
जरी म्हणते सारी दुनिया "स्वामी तिन्ही जागाचा आई विना भिकारी " !
सांगेन मी तयाना "स्वामी तिन्ही जागाचा बापा विना अभागी ",
"स्वामी तिन्ही जागाचा बापा विना अभागी " !! ६ !!
***************
विजय म. जोशी
व्व्व्वा ! थेट भिडल्या भावना
व्व्व्वा ! थेट भिडल्या भावना !
आवडली कविता .
<<<<जरी म्हणते सारी दुनिया
<<<<जरी म्हणते सारी दुनिया "स्वामी तिन्ही जागाचा आई विना भिकारी " !
सांगेन मी तयाना "स्वामी तिन्ही जागाचा बापा विना अभागी ",
"स्वामी तिन्ही जागाचा बापा विना अभागी " >>>> अगदि खरं आहे !
राजीवजी आणि प्रज्ञा ताई
राजीवजी आणि प्रज्ञा ताई धन्यवाद