....डोळ्यांनी

Submitted by वैवकु रीटर्न्स on 26 February, 2013 - 07:32

टा़क मिटवून प्यास डोळ्यांनी
तू पुन्हा गोड हास डोळ्यांनी

मी तुला काय , पाहतो आहे?
पाह , घेतोय श्वास डोळ्यांनी !

मी मनानेच पाहतो आता
फक्त दिसलेत भास डोळ्यांनी

हा पहाराय सख्त दुनियेचा
येच , खेळूत रास डोळ्यांनी

स्वप्न विरते तुझे ..बघू जाता
आज धरलाय ध्यास डोळ्यांनी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैवकु आपणास धन्यवाद म्हणायची गरज वाटत नाही आहे आपण प्रतिसादात केवळ एक स्मायली दिली आहे आपण् काय प्रा. देवपूरकर आहात काय असे करायला ??
(असो ;धन्यवाद!!!... एकमेव प्रतिसाद आला आहे तुमचा हेही उपकारच म्हणायचे )

असो

घोर निराशा झाली मायबबोलीवरील गझल्प्रेमीनी माझ्या काव्याकडे इतके दुर्लक्ष केले हे पाहून खूप वाईट वाटले
मी हे सहन करू शकत नाही आहे

काही चुक्लेमाक्ले माफ करावे क्षमस्व

आपलाच् नम्र व कृपाभिलाषी
~नवाच एक कुणीतरी

तुमचा प्रतिसाद पाहिल्यावर आपली गझल वाचली.
आपण नवशिके तर नक्कीच वाटत नाही.
आपण ज्या वृत्ताला हात घातलाय ते माझ्यामते मराठीत मोजक्याच गझलकारांनी यशस्वीरित्या निभावलेय.
जमीन फारच बिकट आहे, आणि त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने फार मजल घेता येणे खूप अवघड आहे.

स्वप्न विरते तुझे ..बघू जाता
आज धरलाय ध्यास डोळ्यांनी

हा शेर आवडला.
काही ओळीही आवडल्या. जसे मी तुला काय , पाहतो आहे?
शुभेच्छा.

धन्यवाद समीरजी

आपला प्रतिसाद पटला व त्यातील बराचसा भाग स्तुतीपर असल्याने आवडलाही Happy

शुभेच्छांसाठी धन्स

अशीच कृपादृष्टी राहू द्यावीत ही प्रार्थना Happy

वैभव सर ,राजीव सर , श्रीवल्लभ सर धन्यवाद
असेच मार्गदर्शन करत रहावे ही विनंती

आपला नम्र्
~नवाच एक कुणीतरी

धन्यवाद बेफिकीरजी
.........

आपण अशीच कृपा करा मजवर सदा बेफिकिरजी
मी आपला प्रतिसाद माझे पुण्य-लक्षण मानतो

खूप खूप आभार !!

असाच कृपाकटाक्ष असू द्या

आपला नम्र
~नवाच एक कुणीतरी

(असो ;धन्यवाद!!!... एकमेव प्रतिसाद आला आहे तुमचा हेही उपकारच म्हणायचे )>>>>>>>>>>>>>>>>

धन्यवाद म्हणून फार मोठे उपकारच केलेत जणू त्यासाठी खरेतर आपलेच धन्यवाद !!! Angry