ये रविवारा !

Submitted by राजीव मासरूळकर on 25 February, 2013 - 13:11

===ये रविवारा===

ये रविवारा !
सप्ताहातील कष्टाचा शिण
घालव सारा
ये रविवारा !

लवकर उठुनी तयार व्हावे
दोन घास पोटी ढकलावे
दिनभर काबाडकष्ट करावे
माथ्यापासून वाहत जाती
घामाच्या धारा
ये रविवारा !

पाच दिसांच्या बडग्यानंतर
शनिवारच्या हाफ डे नंतर
तणाव चिँता हो छुमंतर
समुद्रावरिल अनुभवावा
उनाड वारा
ये रविवारा !

ऑफिसातली खोटी वटवट
मुर्ख बॉसची तर्कट कटकट
टंकक की बोर्डाची खटखट
श्वास मोकळा घेण्यासाठी
फोडून ही कारा
ये रविवारा !

हट्ट मुलांचा सहलीकरीता
सौ कंटाळे टी व्ही बघता
मीही बोर ते तेची खाता
शिळे जाहले जीवन देवा
फुंकर तरी मारा ,
ये रविवारा !

बसेन म्हणतो फेसबुकावर
कमेंट लाईक करेन वर वर
मैत्रिणींशी च्याटेन भरभर
स्वप्नांसाठी तरी संपावा
कामाचा भारा
ये रविवारा !

- राजीव मासरूळकर
दि १४ . १०. २०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रविवाराला छान आवाहन केलंय.

माझ्यासारखे रिटायर्ड लोक मात्र रविवार-सुखा पासून वंचित असतात.
सगळेच दिवस रविवार Happy

मनःपूर्वक आभार , भिडे सर !

>>>माझ्यासारखे रिटायर्ड लोक मात्र रविवार-सुखा पासून वंचित असतात.
सगळेच दिवस रविवार
Happy
Happy
तुम्ही अधिकच सुखी आहात मग .

स्वप्नांसाठी तरी संपावा
कामाचा भारा>>>>>>>>>>>> वा मस्तय कविता

उकाका सहमत ..........माझ्यासारख्या रिकामटेकड्यांसाठी सुद्ध्हा सेम टू सेम असतं बघा !!!