Submitted by राजीव मासरूळकर on 25 February, 2013 - 13:11
===ये रविवारा===
ये रविवारा !
सप्ताहातील कष्टाचा शिण
घालव सारा
ये रविवारा !
लवकर उठुनी तयार व्हावे
दोन घास पोटी ढकलावे
दिनभर काबाडकष्ट करावे
माथ्यापासून वाहत जाती
घामाच्या धारा
ये रविवारा !
पाच दिसांच्या बडग्यानंतर
शनिवारच्या हाफ डे नंतर
तणाव चिँता हो छुमंतर
समुद्रावरिल अनुभवावा
उनाड वारा
ये रविवारा !
ऑफिसातली खोटी वटवट
मुर्ख बॉसची तर्कट कटकट
टंकक की बोर्डाची खटखट
श्वास मोकळा घेण्यासाठी
फोडून ही कारा
ये रविवारा !
हट्ट मुलांचा सहलीकरीता
सौ कंटाळे टी व्ही बघता
मीही बोर ते तेची खाता
शिळे जाहले जीवन देवा
फुंकर तरी मारा ,
ये रविवारा !
बसेन म्हणतो फेसबुकावर
कमेंट लाईक करेन वर वर
मैत्रिणींशी च्याटेन भरभर
स्वप्नांसाठी तरी संपावा
कामाचा भारा
ये रविवारा !
- राजीव मासरूळकर
दि १४ . १०. २०१२
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रविवाराला छान आवाहन केलंय.
रविवाराला छान आवाहन केलंय.
माझ्यासारखे रिटायर्ड लोक मात्र रविवार-सुखा पासून वंचित असतात.
सगळेच दिवस रविवार
मनःपूर्वक आभार , भिडे सर
मनःपूर्वक आभार , भिडे सर !
>>>माझ्यासारखे रिटायर्ड लोक मात्र रविवार-सुखा पासून वंचित असतात.
सगळेच दिवस रविवार
तुम्ही अधिकच सुखी आहात मग .
राजीव. सुरेख आहे आवडली.
राजीव. सुरेख आहे आवडली. रणजितच्या काऊंट डाऊन कवितेची आठवण झाली.
मजेशीर लिहिलंय की...
मजेशीर लिहिलंय की...
स्वप्नांसाठी तरी
स्वप्नांसाठी तरी संपावा
कामाचा भारा>>>>>>>>>>>> वा मस्तय कविता
उकाका सहमत ..........माझ्यासारख्या रिकामटेकड्यांसाठी सुद्ध्हा सेम टू सेम असतं बघा !!!
ऑफिसातली खोटी वटवट मुर्ख
ऑफिसातली खोटी वटवट
मुर्ख बॉसची तर्कट कटकट
मनकवडे आहात ,छान .
सर्वांचे मनापासून आभार !
सर्वांचे मनापासून आभार !