एक मुलगा बारका

Submitted by समीर चव्हाण on 25 February, 2013 - 01:46

एक मुलगा बारका
फिरतो वा-यासारखा...

धुमाकूळ तो घालतो
वेड घराला लावतो
अवघ्या चिंता सारतो
सगळ्यांचा तो लाडका

गप्पा मोठ्या थाटतो
तत्वज्ञानी वाटतो
प्रश्न होउनी ठाकतो
गोड उत्तरासारखा

एक मुलगा बारका
तोच त्याच्यासारखा

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..

हे हे हे हे हे मस्त, छान.....खरं तर आजची मुलं खूप संवेदनशील झालीयत.
त्यांच्या बालसुलभतेने मोठ्या लोकांसारख्या गप्पा मारताना किंवा तत्वज्ञान सांगत असताना त्याना पाहिलं न कि खूप मज्जा वाटते. आणि हेवा सुद्धा वाटतो, आमच्यावेळी असं नव्हतं हो.

धन्यवाद.
माझा मुलगा कबीर वर्षाचा असताना पहिल्या दोन ओळी सुचल्या होत्या.
शशांक पुरंदरेंच्या बालकविता पाहून लिहायचा मोह झाला, आणि कविता झाली.

समीर

सगळीच कविता, अगदी अगदी!
सध्याच्या बहुतेक लहान मुलांना हे वर्णन लागू होईल...:)

सगळ्यांचे आभार.
ही कविता पूर्ण करताना आणि नंतरही मी मनापासून enjoy केली.
वाटलं नव्हतं की असं काही जमेल म्हणून.
धन्यवाद.