नाचणीची इडली आणि अक्रोड चटणी

Submitted by सावली on 24 February, 2013 - 01:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नेहेमीच्या इडलीत तांदुळ घालतो त्या ऐवजी नाचणी घालायची.
मधुमेहात तांदुळ चालत नाहीत पण नाचणी चांगली असते म्हणुन तांदळा ऐवजी नाचणी वापरुन इडलीचा प्रयोग केला तर तो सक्सेसफुल झाला. कोलेस्टरोल साठी खोबरे न वापरता अक्रोड वापरुन चटणी केली तीच्याही चवी / रुपात फारसा फरक नाही वाटला. फार काही नाविन्य नाही पण शोधायला सोपी जावी म्हणुन नवी रेसिपी म्हणुन देत आहे.

इडली साठी

  • दोन वाट्या नाचणी
  • दोन वाट्या उडीद डाळ

चटणी साठी:

  • मुठभर अक्रोड
  • मिरच्या दोन तीन
  • भरपुर कोथिंबिर
  • मीठ चवीपुरते
  • जीरे
क्रमवार पाककृती: 

इडली

सकाळी वेगवेगळे भिजवुन ठेवा. संध्याकाळी वेगवेगळेच मिक्सरला वाटून घेऊन एकत्र करुन थोडावेळ ढवळुन ठेवा.
दुसर्‍या दिवशी सकाळी पिठ फुगुन वर आले असेल ( भारतीय हवेत )
नेहेमीसारख्या इडल्या करा.

चटणी

सर्व जिन्नस थोडे पाणी टाकुन मिक्सरला वाटुन घ्या. नेहेमीसारखी चटणी तयार होते.

अधिक टिपा: 

-लागणार्‍या वेळात पिठ तयार करायचा वेळ अर्थातच लिहिला नाहीये.

माहितीचा स्रोत: 
रेडिमेड नाचणी इडलीचे पॅकेट दुकानात पाहिलेले ते आणण्याऐवजी घरी प्रयोग करुन पाहिला. चटणी - प्रायोगिक ( खोबरे मिळत नसल्याने जपानमधे इतर विविध पदार्थ टाकुन चटणी करुन पाहिली होती त्यात अ‍ॅवोकडोची आणि अक्रोडची चांगली वाटली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages