मी बनवलेली बाजरीची भाकरी (क्लीप)..

Submitted by अर्चना पुराणिक on 23 February, 2013 - 06:42

मी बनवलेली बाजरीची भाकरी (क्लीप).. छान आहे का पहा Happy

http://www.youtube.com/watch?v=uvLeiv6y93Q&feature=youtu.be

SAM_4031.JPGSAM_4032.JPGSAM_4033.JPGSAM_4034.JPGSAM_4037.JPGSAM_4038.JPG

Happy Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग्ग..... अत्ता पाहिजे मला ते पिठलं-भाकरी!!!

दिनेशदा +++++ ११११११

आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर!!!..... उजव्या हातावरचा चटका दिसला.....संभाळून गं बाई.

अशी भाकर बनवणे पहिल्यांदाच पाहीलेय. कौतुक आपले.

आमच्याकडे सगळा महिलावर्ग काटवटीला दोन पाय लावून, दनादन चुलीपुढे भाकरी कुटताना रोज दिसतो. तीळ / हावरीचे सोहळे संक्रातीलाच.

एक सांगू? तुम्ही केलेली भाकरी तर आवडलीच. पण त्याहूनही तुमचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा अतिशयच भावला. खरंतर तुम्हाला पहिल्या कडक भाकरीचा भाग काढून टाकता आला असता पण तसं काही तुम्ही केलं नाहीत. दुसरी भाकरी फुगताना तुम्ही केलेली गोडशी कमेंटही आवडलीच. Happy

मी आता रोज एखादी भाकरी स्वहस्ते करून बघणारच. लवकरच मलाही असा व्हिडियो अपलोड करण्याची संधी लाभो.

आवडली हि सुद्धा क्लिप. तुम्ही घरी दळून आणता का पीठ?

इथे(अमेरीकेत) पीठच खराब म्हणून मी मोकळी होते, पण माझी आई त्या पीठाच्या पण मस्त भाकरी बनवते.
तिथे भारतात आई घरी दळून आणते, तिची थापायची पद्धत वेगळी आहे. पुर्ण हातावरच भाकरी मोठी करते. भारतात गेले की मी प्रॅक्टीस करणार आहे.. हे ठरलेय. Happy

हीही क्लिप सुरेख! फारच कलात्मक भाकर्‍या आहेत ह्या .. आणि बाजरीची भाकरी तर जास्त कठिण असते .. तीही एव्हढी छान फुगली म्हणजे कमालच आहे .. Happy

(मी प्रयत्न करून सुद्धा बहुतेक मला ह्या जन्मी असलं काही जमायचं नाही ..)

मामी +१

गोळे ह्यांचा प्रश्न मलाही .. पाणी आधण की थंड?

मस्त झालीय ही पण भाकरी. तुमचा अगदी हात बसलाय भाकरीवर. थापण्याची पद्धत दोन्ही क्लिप्समध्ये अगदी सारखी आहे.

मामी + १. तुमचे साधे, हसतमुख बोलणेही खूप आवडले Happy

मामीस अनुमोदन. व्हीडीओतला प्रामाणिकपणा व साधेपणा एकदम भावला.
स्वच्छ सुंदर व कागदासरखी पातळ भाकरी.....अर्चना, तव्यावरच भाकरीची दुसरी बाजू भाजण्याचे काही खास कारण आहे का? म्हणजे पारंपारीक पद्धतीनी विस्तवावर म्हणजे जाळावर भाजतात ना दुसरी बाजू?

मस्त....यावेळी सुरुवातीपासून चित्रीकरण केल्याबद्दल खूप आभार्स...:)

यावेळी काउंटरपण गंडला नाहीये...;) .१०० च्या वर आकडा होता...

अर्चना.....तुस्सी तो छा गयी Happy

क्लीप मधे गोड अर्चनाला बघून खूप मज्जा आली Happy

खरंच फार सुरेख झालाय व्हिडीयो Happy

हे बघून वाटायला लागलंय की आपल्याला पण अशी सुरेख भाकरी करता यावी Wink

प्रथम सगळ्यांचे मनापासून धन्यवाद Happy लाजो-आगं ते पिठलं नाहीय,ते ना वांग्याचं भरीत आहे.चटक्याच म्हणशील तर,कधी-कधी होत घाईघाईत पण मी नक्की काळजी घेईन Happy

वॉव ! काय मस्त भाकरी आहेत.
मी स्वतःला भाकरी एक्सपर्ट समजत होते - माझ्याही भाकरी छान गोल अन काठोकाठ टम्म फुगतात. पण तुमच्या भाकरी अमेझिंग आहेत. एवढ्या बारिक अन पटकन नाही जमत.
आमच्याकडे बाईला बारिक भाकरी जमली नाही तर मजेमजेत चिडवतात मग ती मजेतच उत्तर देते " जिना भाकरले दळ तिना नवराले बळ "
भाकरी थापण्याची पद्धत खांदेशी वाटते Happy

मामी-खरतर बाजरीची भाकरी ही फुगत नसते Happy ती कडकच छान लागते त्यामुळे ही भाकरी फुगली नाही तरी वाईट वाटत नाही.

झंपी-मी हे पीठ भारतातुनच आणलंय Happy म्हणजे काय झालं माझ्या सासुबाई आत्ताच भारतातुन आल्या आहेत.येतांना ज्वारीच पीठ,बाजरीच पीठ,ढाळे व हुरडा घेऊन आल्या Happy त्यामुळ ही क्लिप मला बनवता आली Happy

सुमेधाव्ही-तव्यावर भाकरी भाजायचं तसं काही कारण तर नाही,इतकंच की तोपर्यंत दुसरी भाकरी थापायला वेळ मिळतो Happy पण हे फक्त माझं मत आहे बरका Happy विस्तवावर म्हणशील तर माझ्या माहेरी आजुनही आरावर(विस्तवावर)भाकरी भाजतात Happy

प्रिंसेस-माझं माहेर अक्कलकोट जवळ तर सासर तुळजापूर जवळ आहे Happy तिकडे सगळ्यांच्या शेतात ज्वारी,बाजरी,गहु,ऊस,भुईमुगाच्या शेंगा हेच आसत Happy आसो,खूप गप्पा सुरु झाल्या माझ्या Happy

वॉव!

Pages