यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

Submitted by अत्रुप्त आत्मा on 21 February, 2013 - 14:37

http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc7/487859_553207024704322_294282854_n.jpg
(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी>>--- गेली चार वर्ष मी या शिवाजी ट्रेलच्या दुर्गपुजा अभियानाचा एक भाग झालेलो आहे.गेली पंधरा वर्ष ही संस्था हा दुर्गविकसनाचा एक अतिशय उपयुक्त कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहे.ही संस्था दरवर्षी एक गड दत्तक...होय दत्तकच घेते..आणी मग वर्षभर गडावरची सगळी डागडुजी,रोपिंग,पाण्याच्या टाक्या साफ करणे/सु-रक्षित करणे,पायर्‍या दुरुस्त करणे/आवश्यक आणी शक्य तिथे नव्या बनवणे...अशी अनेक कामं,अचाट परिश्रम,आणी अभंग निष्ठेनी करत असते.आणी हे सगळ काम चालतं ते कुठेही जाहिरातबाजी न करता,लोकांनी काम आणी ही गडकोटांप्रती असलेली ममता/निष्ठा पाहुन आपणहुन दिलेल्या वर्गणीतुन..या शिवाय जो उरलेला खर्चाचा मोठ्ठा भाग असतो,तो शिवाजी ट्रेलचे सभासद स्वतःच्या खिशातुन पूर्ण करतात...या कामातला ''आर्थिक'' भाग मी मुद्दाम आधी सांगितला,कारण शिवाजीचं नाव घेऊन राजकारण करणार्‍या/सत्तेवर येणार्‍यांना ही कामं करणं(आर्थिक दृष्ट्या) खरतर कित्ती सोप्पं,पण जिथे राजकीय मलिदा मिळत नाही,तिथे ही लोकं कधी ढुंकुनही बघत नाहीत... अश्या परिस्थितित या संस्थेनी येणारा पैसा आणी क्षीरसागर सरांच्या अफाट मॅनेजमेंट मधुन दरवर्षी वाढत्या संख्येनी जमणारी कार्यकुशल लोकं,,,एवढ्या बळावर शिवबाच्या या महाराष्ट्रातले पंधरा गड आज येण्यालायक/रहाण्याजोगे केलेले आहेत...

वर्षभर खपुन डागडुजी केलेल्या अश्या प्रत्येक गडावर फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी सत्यनारायण असतो.आणी क्षीरसागर सरांच्या एका शब्दावर वय वर्ष ७ ते वय वर्ष ७० ची अनेक मंडळी हजेरी लावत असतात.हा एक रविवार म्हणजे वर्षभर केलेल्या मेहेनतीचा खराखुरा लोकार्पण सोहळाच असतो.
http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc6/226950_422456194507339_2033091106_n.jpg
अश्या या खर्‍याखुर्‍या सामाजिक उपक्रमातल्या,या सोहळ्याला सर्व दुर्गप्रेमींन्नी सस्नेह यावे... हे आग्रहाचे निमंत्रण.

खाली शिवाजीट्रेलचा हॉटलाइन नं टाकत आहे... तसेच येऊ इच्छिणार्‍यांनी याच आवाहन धाग्यावर कळवावे... काहि शंका असल्यास विचारावे ही विनंती. ...(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
http://sphotos-d.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/525569_422456387840653_1975327803_n.jpg
शिवाजीट्रेलचा हॉटलाइन नं- ८८८८५०००५५ (कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
================================================================
या खाली दिलेल्या फेसबुक लिंकवर-घनगड पायथ्याथी आणी इतरत्र केलेल्या-(करत असतानाच्या) कामाचे फोटो आहेत.
http://www.facebook.com/media/set/?set=a.555848947773463.126052.10000045...

http://sphotos-g.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/60708_422456107840681_596300126_n.jpg
====================================================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर्षी मी गेलो होतो माझी पहिलीच पूजां खूप छान अनुभव होता आणि क्षीरसागर काकांचे आभार कारण ते हे दुर्गसंवर्धनाचे काम निस्सीम भक्तीने करतात

GHANGAD_0.JPG

अतुप्त आत्मा यांनी तेथे घातलेली पूजां व काढलेली रांगोळी
DHANGAD PUJA.JPG