कोडी सोडवणं थांबवलंय...

Submitted by प्रेरीत on 20 February, 2013 - 08:53

संपले आहेत आता शोक.
पण व्रण मात्र ठोक पडलेत...
त्या वाटांना समाजाचा चेहरा नाही;
आणि जगात त्यांचे अस्थित्व आहे.

उदरनिर्वाह सोपा की
ह्रदयनिर्वाह...मेंदू या दुविधेत...
अन रस्त्यावरची गर्दी;
वाढतच आहे गती देण्यासाठी..गर्दीला...!

दुपारच्या शांततेला कड आहे.
सायंकाळी वावटळ येणे शक्य...
वादळच यावे-थेट सोक्ष-मोक्ष;
वावटळी उगाच पसरवतात समज!

विरघळणार्‍या विश्वासात,
मला दिसते चिंता आसमंताची!
विकला जात नाही मेघ कल्लोळ;
जग मात्र पाण्यात वणवणते...!

थांबवलय कोडी सोडवणं.
'कां','पण कां?' याला माझी
दुरुत्तरं येतील....!
आणि वाटेल की जग मलाच उद्दाम बोललं वगैरे...!?
म्हणून साभार मौन!

--०२/१०/२००६
--सांगली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users