रशियात भीषण उल्कापात ? ही कशाची नांदी?

Submitted by रमेश भिडे on 15 February, 2013 - 10:39

रशियात उल्कापात, ५०० जखमी

0
मटा ऑनलाइन वृत्त । मॉस्को

पृथ्वीपासून सर्वात जवळ अंतरावर उल्कापिंड पाहण्याचा दुर्मिळ योग खगोलप्रेमींसाठी जुळून येणार असल्याचे सांगितले जात असताना आज रशियात कडाक्याच्या थंडीत भीषण उल्कापाताने हाहाकार माजवला. अक्षरश: आगीचे गोळे इमारतींवर बरसल्याने किमान ५०० लोक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून कोणीही दगावल्याचे वृत्त नाही.

मध्य रशियातील युरालजवळच्या चेलियाबिन्स्क शहरात उल्का वर्षावाने घबराट पसरली आहे. हा उल्कांचा स्फोट असल्याचा अंदाज खगोल अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आगीचे गोळे येऊन आदळल्याने कानठळ्या बसवणारा आवाज झाला. सुरूवातीला कोणलाच काही कळले नाही. मात्र थोड्याच वेळात विध्वंस समोर आला. उल्कापातात सहा इमारतींची पडझड झाली आहे. अनेक घरांच्या काचा, गाड्यांच्या काचांचाही चक्काचूर झाला आहे. अचानक कोसळलेल्या या अस्मानी संकटाने संपूर्ण शहरातच आणीबाणीसारखी परीस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोक गंभीररीत्या भाजले असून काचा फुटून हवेत उडाल्यानेही बरेच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत असून सध्या तेथे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे, असे प्रशासनाने सांगितले.

'मी कार चालवत होतो. सुरूवातीला अचानक काळोख झाला आणि पाठोपाठ प्रकाशाचा भलामोठा झोत आला. या प्रकाराने मी हादरूनच गेलो. गाडी जागीच थांबवली,' असे व्हिक्टोर प्रोकोफिव या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. स्थानीक वेळेनुसार सव्वा नऊच्यासुमारास ही घटना घडली. चेलियाबिन्स्क हे रशियातील एक प्रमुख औद्योगिक शहर असून तेथील झिंक प्लांट सुरक्षित असल्याचे प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, लोकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उल्कापिंड दिसणार का?

पृथ्वीपासून २७ हजार ७०० किलोमीटर अंतरावरून आज उल्कापिंड जाईल, असा अंदाज खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. पृथ्वीच्या एवढ्या जवळून जाणारे पहिलेच सर्वात मोठे उल्कापिंड असेल असाही दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पृथ्वीवरून सोडण्यात आलेले अनेक उपग्रहही त्यापेक्षा जादा उंचीवर आहेत. हे उल्कापिंड पृथ्वीवर आदळण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार आज शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १२. ५५ च्या सुमारास हा दुर्मिळ योग खगोलप्रेमींसाठी जूळून येणार आहे. मात्र रशियातील घटनेमुळे सर्वांच्याच पोटात गोळा उठला आहे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवनी,

>> विस्तृत टिपण वाचायला आवडेल, पण सामान्यजनांना कळेल असे आकृती काढून शिकवा

आकृती काढायला आवडली असती. पण थोडक्यात आटपायचं म्हणून नुसतं शब्दांत लिहितो.

प्रथमत: हे गृहीतक स्पष्ट करूया की, पृथ्वीचा आकार आणि वस्तुमान उल्कापिंडाच्या मानाने अतिप्रचंड आहे. आता त्या उल्कापिंडाचे भवितव्य वेग आणि रोख या २ गोष्टींवर ठरते.

पिंडाचा रोख पृथ्वीकेंद्राच्या दिशेने वा आजूबाजूस असेल तर पिंड सरळ पृथ्वीवर आदळेल. मग त्याचा वेग कितीही असो. मात्र जर पिंडाचा रोख पृथ्वीपासून बर्‍यापैकी दूर असेल तर खालील गोष्टी संभवतात.

१. पिंडाचा वेग प्रचंड असल्याने बाहेरच्या बाहेर पसार होईल. मात्र पृथ्वीच्या आकर्षणात येऊन त्याची कक्षा बदलेल. बदललेली कक्षा हायपरबोला या आकाराची असेल.

२. पिंडाचा वेग एका ठराविक वेगाशी जुळता असेल (V1) तर पसार होण्याची कक्षा पॅराबोला असेल.

३. यापेक्षा वेग कमी असेल तर पिंड पृथ्वीच्या आकर्षणात अडकेल. त्याची कक्षा लंबवर्तुळ असेल.

४. यापेक्षा कमी परंतु एक ठराविक वेग असेल (V2) तर कक्षा बरोब्बर वर्तुळाकार असेल.

५. याहीपेक्षा कमी वेग असेल तर पिंड पृथ्वीभोवती सर्पिलाकार प्रदक्षिणा घालीत अखेरीस तिच्यावर आदळेल. बहुधा पहिल्या प्रदक्षिणेतच त्याचा कपाळमोक्ष होईल.

वरील सर्व कक्षांची नाभी (फोकस) पृथ्वीकेंद्र आहे.

असो.

V1 आणि V2 या वेगांची आकडेमोड करण्याची सूत्रे मिळाली नाहीत. प्रत्यक्ष उत्पन्न करणं वेळखाऊ आहे. बहुधा aschig यावर अधिक प्रकाश चटकन टाकू शकतील. Happy

आ.न.,
-गा.पै.

याहीपेक्षा कमी वेग असेल तर पिंड पृथ्वीभोवती सर्पिलाकार प्रदक्षिणा घालीत अखेरीस तिच्यावर आदळेल. बहुधा पहिल्या प्रदक्षिणेतच त्याचा कपाळमोक्ष होईल>> स्कायलॅब पडलेली तेव्हा हेच झालेलं.
गणित चुकलं होत म्हणे.. (हो म्हणेच, आमच्या जन्माच्याही आधी घडलेली घटना)
गामा पैलवान यानी लिहिलेले प्रतिसाद वाचुन मन बारावीच्या ट्युशनच्या वर्गात जाउन आलं.
आमचे जोशी मास्तर आठवले. Happy

Pages