रशियात उल्कापात, ५०० जखमी
0
मटा ऑनलाइन वृत्त । मॉस्को
पृथ्वीपासून सर्वात जवळ अंतरावर उल्कापिंड पाहण्याचा दुर्मिळ योग खगोलप्रेमींसाठी जुळून येणार असल्याचे सांगितले जात असताना आज रशियात कडाक्याच्या थंडीत भीषण उल्कापाताने हाहाकार माजवला. अक्षरश: आगीचे गोळे इमारतींवर बरसल्याने किमान ५०० लोक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून कोणीही दगावल्याचे वृत्त नाही.
मध्य रशियातील युरालजवळच्या चेलियाबिन्स्क शहरात उल्का वर्षावाने घबराट पसरली आहे. हा उल्कांचा स्फोट असल्याचा अंदाज खगोल अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आगीचे गोळे येऊन आदळल्याने कानठळ्या बसवणारा आवाज झाला. सुरूवातीला कोणलाच काही कळले नाही. मात्र थोड्याच वेळात विध्वंस समोर आला. उल्कापातात सहा इमारतींची पडझड झाली आहे. अनेक घरांच्या काचा, गाड्यांच्या काचांचाही चक्काचूर झाला आहे. अचानक कोसळलेल्या या अस्मानी संकटाने संपूर्ण शहरातच आणीबाणीसारखी परीस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोक गंभीररीत्या भाजले असून काचा फुटून हवेत उडाल्यानेही बरेच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत असून सध्या तेथे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे, असे प्रशासनाने सांगितले.
'मी कार चालवत होतो. सुरूवातीला अचानक काळोख झाला आणि पाठोपाठ प्रकाशाचा भलामोठा झोत आला. या प्रकाराने मी हादरूनच गेलो. गाडी जागीच थांबवली,' असे व्हिक्टोर प्रोकोफिव या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. स्थानीक वेळेनुसार सव्वा नऊच्यासुमारास ही घटना घडली. चेलियाबिन्स्क हे रशियातील एक प्रमुख औद्योगिक शहर असून तेथील झिंक प्लांट सुरक्षित असल्याचे प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, लोकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उल्कापिंड दिसणार का?
पृथ्वीपासून २७ हजार ७०० किलोमीटर अंतरावरून आज उल्कापिंड जाईल, असा अंदाज खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. पृथ्वीच्या एवढ्या जवळून जाणारे पहिलेच सर्वात मोठे उल्कापिंड असेल असाही दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पृथ्वीवरून सोडण्यात आलेले अनेक उपग्रहही त्यापेक्षा जादा उंचीवर आहेत. हे उल्कापिंड पृथ्वीवर आदळण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार आज शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १२. ५५ च्या सुमारास हा दुर्मिळ योग खगोलप्रेमींसाठी जूळून येणार आहे. मात्र रशियातील घटनेमुळे सर्वांच्याच पोटात गोळा उठला आहे
बापरे ! असे पण घडते..
बापरे !
असे पण घडते.. ??
http://www.news.com.au/world/meteor-shower-explodes-in-central-russia-an...
हे पर्यावरणामधे का आहे ? ही
हे पर्यावरणामधे का आहे ? ही कशाचीही नांदी नाहि हो. असे उल्कापात आधीही होत आले आहेत नि पुढेही होत राहतील.
SOLDIERS have been sent to
SOLDIERS have been sent to meteor impact sites in Russia, as the injury toll from the strike reaches 950 people.
हे बघा.
हे बघा.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=f1IGK9GdCmU
http://www.youtube.com/watch?v=90Omh7_I8vI
ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे.
ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. या घटनेची माहिती जरूर द्या, पण कृपया अशी सनसनाटी बातमी करू नका. जमल्यास शीर्षक बदला प्लीज. ही कशाचीही नांदी, मुख्य प्रयोग, मध्यंतर, भरतवाक्य इ. नाही आहे. केवळ एक घटना.
मामी, सहमत आहे.
मामी,
सहमत आहे.
ही बहुतेक उल्कापाताची नांदी
ही बहुतेक उल्कापाताची नांदी असावी
,असामी +१
पृथ्वी नष्ट
पृथ्वी नष्ट होणार......:खोखो:
.
.
आजच जेवढे धागे काढायचे तेवढे काढुन घ्या......उद्द्या इथे सुध्दा उल्कापात होईल
ही कशाचीही नांदी, मुख्य
ही कशाचीही नांदी, मुख्य प्रयोग, मध्यंतर, भरतवाक्य इ. नाही आहे.<<<
पण झालेली घटना अतर्क्यच आहे राव! खरंच माणूस काय करणार असे काही झाल्यावर!
रमेश भिडे,
२७,७०० किलोमीटर उंचीवरून जाणारे उल्कापिंड गुरुत्वाकर्षणने पृथ्वीकडे का खेचले जाणार नाही याचीही कृपया जमल्यास माहिती द्यावीत. मला कुतुहल आहे म्हणून विचारत आहे. ते आदळणार नाही हा दावा चार पाच दिवसांपासून वाचत आहेच. पण का आदळणार नाही हे लक्षात येत नाही आहे. त्यातील इनर्शिअल मोमेंटम इतके आहे का की त्यावर ग्रॅव्हिटीचा आवश्यक तो फोर्स लागू होणार नाही?
धन्यवाद
२७,७०० किलोमीटर उंचीवरून
२७,७०० किलोमीटर उंचीवरून जाणारे उल्कापिंड गुरुत्वाकर्षणने पृथ्वीकडे का खेचले जाणार नाही याचीही कृपया जमल्यास माहिती द्यावीत <<<<<<< बहुदा एक तर त्याचा वेग प्रचंड आहे १ सेंकदाला ८-९ किलोमीटर... दुसरे म्हणजे इतक्या उंचीवर गुरुत्वाकर्षण बल इतके जास्त नसेल... अन्यथा त्या भागात असणारे आपले उपग्रह पृथ्वीवर आदळतील... पुढची भेट देण्याची वेळ त्या उल्कापिंडाची २०१९ साली आहे.. त्यावेळेला त्याची उंची २७००० पेक्षा कमी असणार...त्या वेळेला कदाचीत गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव होईल त्यावर
बेफिकीर, >> ते आदळणार नाही हा
बेफिकीर,
>> ते आदळणार नाही हा दावा चार पाच दिवसांपासून वाचत आहेच. पण का आदळणार नाही हे लक्षात येत
>> नाही आहे.
उदयन.. यांचे वरील स्पष्टीकरण ढोबळमानाने बरोबर आहे. अधिक अचूकपणे सांगायचं झालं तर दोन कारणे आहेत.
१. पिंडाची कक्षा अशी आहे की त्याचा रोख पृथ्वीच्या केंद्राकडे (वा आजूबाजूस) नाहीये. हे कारण असफल झाल्यास पिंड सरळ पृथ्वीवर आदळेल.
२. हे कारण असफल झाल्यास पिंड पृथ्वीवर आदळू शकतो किंवा आपल्या पृथ्वीभोवती (लंब)वर्तुळाकार कक्षेत फिरता राहू शकतो.
पृथ्वीच्या आकर्षणातून सुटण्यासाठी एखाद्या छोट्याश्या वस्तूस जी गती प्राप्त व्हावी लागते.तिला मुक्तगती (escape speed) म्हणतात. प्रस्तुत उल्कापिंडाचे पृथ्वीपासून किमान अंतर २७७०० किमी आहे. एव्हढ्या अंतरावर मुक्तगती ४८३४ मीटर्स प्रतिसेकंद (४.८३४ किमी/से) आहे. त्याचा वेग ७८०० मीटर्स प्रतिसेकंद (७.८ किमी/से) इतका आहे. हा वेग मुक्तीवेगापेक्षा जास्त असल्याने तो पृथ्वीच्या आकर्षणात आला तरी तो पृथ्वीला पूर्णपणे बांधला जाणार नाही. पूर्णपणे बांधले जाणे म्हणजे पृथ्वीभोवती (लंब)वर्तुळाकार कक्षेत बंदिस्त होणे.
मात्र पृथ्वीच्या आकर्षणामुळे त्याचे आपल्या नियोजित कक्षेपासून जरासे विचलन होऊ शकते.
असो. खाली थोडी आकडेमोड दिली आहे:
मुक्तगती साठी इथे एक सूत्र दिले आहे.
G = गुरुत्वीय स्थिरांक = 6.67×10^−11 m^3 kg^−1 s^−2,
M = पृथ्वीचे वस्तुमान = 5.97219 × 10^24 kg.
r = वस्तूचे पृथ्वीच्या केंद्रापासूंचे अंतर = वस्तूची उंची + पृथ्वीची त्रिज्या = 27700 km + 6400 km = 34100 km = 3.41 * 10^7 m
आता हे आकडे घालून मुक्तगती काढल्यास ती 4833.564667 ms^-1 म्हणजे ४.८३३६ किमी प्रति सेकंद येते. उल्कापिंडाची गती (७.८ किमिप्रसे) याहून कितीतरी अधिक आहे.
असा एकंदरीत प्रकार आहे..
आ.न.,
-गा.पै.
गामा याच कारणासाठी मला गणित
गामा याच कारणासाठी मला गणित हा विषय आवडत नाही
ह्या चेयाबिन्स्कमध्ये पुढल्या
ह्या चेयाबिन्स्कमध्ये पुढल्या ३-४ वर्षात एक सहा-आठ महिन्याचे प्रोजेक्ट करायचे आहे
काल तिथल्या काही लोकांशी बोललो तर ते म्हणाले बाहेरच जास्त दंगा झालाय ह्या घटनेचा. इथे फार दंगा नाहिये.
ऐकावं ते नवलंच टण्याभाऊ!
ऐकावं ते नवलंच टण्याभाऊ!
आ.न.,
-गा.पै.
उदयन.., >> गामा याच कारणासाठी
उदयन..,
>> गामा याच कारणासाठी मला गणित हा विषय आवडत नाही
म्हणजे काय बुवा?
बरं ते जाउद्या!
मला वाटतं की बेफिकीर भुक्कड पूर्ण करणार लवकरच. म्हणून तर मी गणिती मेंदू लावला. पण एक अडचण आलीये. उपरोक्त घटनेत पृथ्वी त्या उल्कापिंडाच्या मानाने महाप्रचंड आहे. याउलट भुक्कडमधले तारे आणि ग्रहगोल म्हणजे तुल्यबळ लढती आहेत. त्यामुळे माझ्या वरील स्पष्टीकरणाचा फारसा उपयोग नाही. म्हणूनच तुमची 'अगणित' मदत कामी येईल असा गाढ विश्वास वाटतो!
आ.न.,
-गा.पै.
गामा फिकर नॉट...... मला गणित
गामा फिकर नॉट...... मला गणित असे ही आवडत नाही उगाच आकडेमोड..
.
.
टक्कर जी काही होण्याची शक्यता आहे जी १०० पैकी२० %च आहे ती २०१९ साली आहे जेव्हा हाच उल्कापिंड स्वतःची प्रदक्षिणा पुर्ण करुन परत पृथ्वी जवळ येईल तेव्हा त्याचे अंतर २०००० किमी पेक्षा ही कमी असेल.. आणि वेग सहाजिकच कमी होईल
एस्केप व्हेलॉसिटी हा मुद्दा
एस्केप व्हेलॉसिटी हा मुद्दा माहीत होता. (अर्थात, गुरुत्वीय स्थिरांकही मला माहीत होता). पण हेच डोक्यात घुसलेले होते की पृथ्वीवरून भिरकावलेली किंवा सोडलेली वस्तू (पर्पेंडिक्युलर) पृथ्वीच्या कक्षेबाहेर जायला त्या व्हेलॉसिटीपेक्षा अधिक व्हेलॉसिटी लागते. आता एखादा मुळातच बाहेरून कक्षेत आलेला पदार्थही पुन्हा कक्षेच्या बाहेर जाईल (एस्केप व्हेलॉसिटी अधिक असल्यामुळे) हे डोक्यात येऊ शकले नाही. अर्थात, या चर्चेपुरतेच बोलायचे तर एस्केप व्हेलॉसिटी या मुद्यामुळे असे होणार आहे इतकेही डोक्यात आलेले नव्हते. फक्त असे वाटले होते की उल्कापिंडाचा एकुण वेग अतीप्रचंड असल्याने (ज्याला मी इनर्शिअल मोमेंटम म्हणालो) ते सटकून जाईल.
गामा, तुम्ही किंवा अस्चिग यांच्याकडून अश्याच उत्तराची अपेक्षा होती. मनापासून धन्यवाद. हे असे शिकायला मिळाले की आनंद वाटतो. मागेही एका लेखाखाली आपण बरीचशी तांत्रिक व गणिती माहिती दिलेली होतीत. तीही आधी वाचलेली असूनही तुमच्या सहजसुंदर शैलीमुळे खास आवडली होती.
धन्यवाद
उल्कापिंडाचा एकुण वेग
उल्कापिंडाचा एकुण वेग अतीप्रचंड असल्याने >>>>>>>> रशियावर आदळली तिचा वेळ ३० किमी प्रती सेकंद पेक्षा जास्त होता...आणि तिचा स्फोट काही किमीवर आकाशात झालेला ... नाहीतर जास्त नुकसान निव्वळ तिच्या वेगामुळे झाले असते
धन्स गामा,
धन्स गामा,
बेफिकीर, अनुकूल
बेफिकीर,
अनुकूल प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तुमचा इनर्शियल मोमेंटमचा मुद्दादेखील ढोबळमानाने बरोबर आहे!
परंतु गणिती रीतीने शोधायचं झालं तर मुक्तगतीची संकल्पना बरी पडते.
खरंतर मुक्तगती ही संकल्पना देखील जरा गोंधळात टाकणारी आहे. वरील घटना अधिक अचूक रीतीने गणिताद्वारे व्यक्त करायची झाल्यास परत इनर्शियल मोमेंटमकडे वळावं लागतं. त्यास कायनेटिक एनर्जी अशी तांत्रिक संज्ञा आहे. तुम्हाला निश्चितच ही संज्ञा माहीत असणार. त्याबद्दल विस्तृत टिपण करेन. अर्थात, आपल्याला वाचायला आवडणार असेल तरंच!
आ.न.,
-गा.पै.
गा मा, विस्तृत टिपण वाचायला
गा मा,
विस्तृत टिपण वाचायला आवडेल, पण सामान्यजनांना कळेल असे आकृती काढून शिकवा
गामा, मस्त लिहिलंयत. फक्त r =
गामा, मस्त लिहिलंयत.
फक्त
r = वस्तूचे पृथ्वीच्या केंद्रापासूंचे अंतर = वस्तूची उंची + पृथ्वीची त्रिज्या = 27700 km + 6400 km = 34100 km = 3.41 * 10^7 m हे कळलं नाही.
>>>> पूर्णपणे बांधले जाणे म्हणजे पृथ्वीभोवती (लंब)वर्तुळाकार कक्षेत बंदिस्त होणे.
>>>> असं झालं तर आपल्याला अजून एक बालचंद्र मिळेल का?
मामी ते किमी चं मीटर मध्ये
मामी ते किमी चं मीटर मध्ये लिहिलयं ३.४१ x 10^7 M
श्री, सॉरी चुकून अर्धवटच
श्री, सॉरी चुकून अर्धवटच कॉपी-पेस्ट झालं होतं. मला हे संपूर्ण समीकरण कळलं नाही. विशेषतः
वस्तूचे पृथ्वीच्या केंद्रापासूंचे अंतर = वस्तूची उंची + पृथ्वीची त्रिज्या हा भाग. हे समीकरण जर वस्तु पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभी असेल तरच लागू होईल ना? माझ्या विज्ञानात भरपूर अज्ञान आहे त्यामुळे अगदी बाळबोध वाटणारा प्रश्न असला तर माफ करा.
अशनी हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा
अशनी हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा तीव्र
वृत्तसंस्था , चेल्याबिन्स्क
मध्य रशियात धूमाकूळ माजविलेल्या भीषण अशनीपाताच्या तडाख्यात हजारो रशियन नागरिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर आदळलेल्या अशनीची तीव्रता १९४५मध्ये जपानमधील हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा ३० पटीने अधिक असल्याचे ' नासा ' च्या संशोधकांनी म्हटले आहे. ५५ फूट उंचीची आणि सुमारे दहा हजार टनी वजनाचा अशनी शुक्रवारी उरल माउंटन भागात आदळला. या आघातानंतर चेल्याबिन्स्क परिसरातील घरांची काचेची तावदाने फुटली आणि कारचे अलार्म सुमारे अर्धातास वाजत होते.
मामी, असं बघा की, पृथ्वीचे
मामी,
असं बघा की, पृथ्वीचे केंद्र आपल्या पायाखाली ६४०० किमी अंतरावर आहे. कारण पृथ्वी गोल आहे आणि आपण तिच्या बाह्य पृष्ठभागावर उभे आहोत. म्हणूनच हा आकडा म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आहे.
तो पिंड पृथ्वीपासून २७७०० किमी उंचीवरून गेला. म्हणजे आपल्या डोक्यावर तो २७७०० किमी उंचीवर होता. आता पृथ्वीकेंद्र आपल्या पायाखाली आणि तो पिंड आपल्या डोक्यावरती. म्हणून या दोघांतले अंतर म्हणजे ६४०० + २७७०० =३४१०० किमी होईल.
आ.न.,
-गा.पै.
म्हणून या दोघांतले अंतर
म्हणून या दोघांतले अंतर म्हणजे ६४०० + २७७०० =३४१०० किमी होईल.
आ.न.,
-गा.पै.
आता सगळ्यांचि उत्सूकता जागी झालेली आहे तर एक थेरोटिकल शंका.
पिंडाची त्रिज्यादेखिल त्यात मिसळायला हवी का?
धन्यवाद गापै.
धन्यवाद गापै.
अविनाश१, >> पिंडाची
अविनाश१,
>> पिंडाची त्रिज्यादेखिल त्यात मिसळायला हवी का?
तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर हो. पण पिंड पृथ्वीच्या मानाने इतका चिमुकला आहे की त्याच्या त्रिज्येने काही फरक पडणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
Pages