स्वमग्न

Submitted by मंजूताई on 15 February, 2013 - 06:46

माझ्या एका परिचीताचा चार वर्षाचा भाचा स्वमग्न (ऑटिस्टीक) आहे. सध्या तो नागपूरमध्ये 'संवेदना' शाळेत शिकतो आहे. त्याच्या भाच्याचे स्वमग्नतेचे निदान झाल्यावर हा कुठल्या प्रकारचा दोष आहे हे त्याला वय वर्ष २६-२७ व त्याच्या आजोबांना (८०) कळलं. त्याला ह्या विषयावर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे. हा का होतो? अनुवंशिक आहे? वेगैरे दाखवायचे नाहीये त्यापेक्षा स्वीकार करुन त्याला काही प्रमाणात सक्षम कसे बनवता येईल, काही केस स्टडीज दाखवून ह्याबाबतीत जागरुकता आणण्याचे प्रयत्न ह्या माध्यमातून करायचे आहेत. अजून काय दाखवले पाहीजे, आपली मतं, सूचवण्यांच स्वागत!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विलेपार्ले येथे ऑटिझम असलेल्या मुलांसाठी एक शाळा आहे "आशियाना" नावाची.
त्यांना विचारून पाहिलेत तर बरीच माहिती मिळू शकेल. 022-26845062

>>ती शाळा माझ्या मते सुहसिनी मालदे यांची आहे, त्यांच एक पुस्तकही आहे 'एक इझम निरागस' या नावाचं.
मी हेच पुस्तक वाचलेले आहे, पण आत्ता पुस्तकाचे आणि लेखिकेचे नाव आठवत नव्हते.