पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका
कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥
जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥
सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥
रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता... ॥
- गंगाधर मुटे
------------------------------------------------------------
जबराट .
जबराट .
वा जाम भारीये इचिबैन= ?
वा जाम भारीये
इचिबैन= ?
व्वा , वर्हाडी ठसका
व्वा , वर्हाडी ठसका मस्तच.
मजा आया.
इचिबैन= ? खास वर्हाडी शब्द.
नितांतसुंदर !! काय 'पलंगतोड'
नितांतसुंदर !!
काय 'पलंगतोड' सपान पडलं राव तुम्हास्नी. अन काय ही शैली..मस्त मस्त मस्त !!
मस्तय
मस्तय
धन्यवाद सर्वांचे. वैवकु,
धन्यवाद सर्वांचे.
वैवकु, इचिबैन हा खास वर्हाडी शब्द असून पुणेरी आयला, च्यायला, च्यामारी सारखा वापरतात.
सह्हीच आहे. वर्हाडी भाषेत
सह्हीच आहे. वर्हाडी भाषेत लिहिल्याने अधिकच खुललीये हे नक्की.
देविदास सोटेंची आठवण आली ,
देविदास सोटेंची आठवण आली , मुटेभौ सोटे आहेत का ? कारण मी शाळेत असतानाचे सोटे पन्नाशीचे आठवतात.
मुटे
मुटे साहेब,
जबरदस्त,.............
विपुतुन संपर्क केलाय, पहाल का ?
इचिबैन -------> Super
इचिबैन -------> Super devaa....
विवेक नाईकजी, दुष्काळाची
विवेक नाईकजी,
दुष्काळाची दाहकता पूर्व विदर्भात तशी कमी आहे.
दुष्काळाच्या संदर्भात मी 25 November, 2009 ला लिहिलेली कविता
http://www.maayboli.com/node/12239
येथे आहे.
मस्त जमलीये!
मस्त जमलीये!
नागपुरी तडका - ई पुस्तक ई
नागपुरी तडका - ई पुस्तक
ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने "नागपुरी तडका" हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय, त्याबद्दल मी "ई साहित्य प्रतिष्ठान" चमूचा आभारी आहे.
* * * *
PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता चित्रावर क्लिक करा.
प्रकाशकाचे दोन शब्द
मराठी अमृताहून गोड भाषा. पण तिच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आणि मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही. कोकणची खुमासदार मालवणी घ्या किंवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी किंवा मिठ्ठास खानदेशातली अहिराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार केला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृतीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कवितांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे.
पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे.
गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.
PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता येथे क्लिक करा.
---------------------------------------------------------------------------------
खूप आवडली पलंगतोड स्वप्नांची
खूप आवडली पलंगतोड स्वप्नांची कविता .
मस्त तडका !
मस्त तडका !
मुटेजी, नेहमीप्रमाणेच मस्त
मुटेजी,
नेहमीप्रमाणेच मस्त तडका.
e-पुस्तकाबद्दल अभिनंदन.
सुंदर होउन राहिली....!!!
सुंदर होउन राहिली....!!!
अभिनंदन मुटेजी!! तुमच्या
अभिनंदन मुटेजी!! तुमच्या कविता खरोखर हृदयातुन उतरलेल्या असतात. ह्याला नागपूरीच काय कोल्हापुरी पण तडका म्हणता येईल असा झणझणीत आहे.
अशी वर व्यक्त केलेली स्वप्ने खरी झाली तर मात्र आपल्यासारखे नशीबवान आपणच असु.
एक नंबर कडक सुंदरी आपल्या
एक नंबर कडक सुंदरी आपल्या गांजाखेत गोळीबार मधली.
मुटेजी खरंच जबरदस्त.
हा असला तडका मुटेजींच्या
हा असला तडका मुटेजींच्या तोंडून ऐकायला अजूनच धमाल येते.
बिपाशाले लुगडं आणि बोम्ली आठवली.
जबरी तडका.
मुटेजी: पुस्तक प्रकाशित
मुटेजी:
पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन.
अभिनंदन मुटेजी पुस्तक
अभिनंदन मुटेजी पुस्तक प्रकाशनासाठी अन या खमंग तडकेबाज कवितेसाठी.पु.ले.शु.
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
------------------------------------------------
विप्राभाऊ, सोटेंची १९८४ मध्ये एक कविता त्यांच्या तोंडून ऐकली होती. त्यानंतर पुढे काहीच माहिती नाही. बहुतेक ते हयात नसावेत. माहिती घेऊन सांगतो.
बढिया
बढिया